पाठदुखी

वेदनारहित पाठीसाठी आश्चर्यकारक रहस्ये जाणून घ्या !

जेव्हा वेदना होतात तेव्हाच आपल्याला आपले शरीर जाणवते. डोके दुखल्या शिवाय डोक्याची जाणीव होत नाही तसेच काही तरी. आता आपण बसलेले आहात आणि जेव्हा पाय दुखू लागतो तेव्हा आपल्याला आपल्या पायांची जाणीव होते. जेव्हा, जेथे वेदना होतात तेव्हा तेथे आपले लक्ष जाते. वेदना ही एखाद्या लहान बालकासारखी असते जी पालकांचे लक्ष वेधून घेत राहते. आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही तेव्हा ते दुखू लागते. जेव्हा आपण आपले लक्ष तेथे घेऊन जाता, तेव्हा ते दिलेले लक्षच त्या शरीराच्या भागाला ऊर्जा देते. आपण आपल्या शरीराची काळजी घेत नाही, पुरेसा व्यायाम करत नाही. आपण जे अन्न घेतो त्यात खूप रसायने, कीटकनाशके, खते असतात आणि ते सर्व आपण खातो. ती सर्व कीटकनाशके शरीरात जातात आणि या सर्व वेदनांना कारणीभूत ठरतात, एकदा आपण स्वत: ला निर्विषित (विषमुक्त) केले की ही वेदना कशी दूर होईल ते दिसेल.

योग आणि ध्यान शिबिरे

आपल्या जीवनातील समस्यांसाठी सर्वसमावेशक उपाय