नैराश्य
नैराश्या कडून अंतिम समाधाना पर्यंत
जीवन हा एक संग्राम आहे. डॉक्टर रोगांशी लढा देत आहेत. वकील अन्यायाविरुद्ध लढतात. शिक्षक अज्ञाना विरुद्ध लढत आहेत. जेव्हा आपली लढण्याची इच्छा नाहीशी होते तेव्हा नैराश्य येते. अर्जुन निराश झाला होता आणि त्याला युद्ध करण्याची इच्छा नव्हती. त्याचे धनुष्य त्याच्या हातातून गळून पडले आणि त्याची बोटे भीतीने थरथर कापत होती. कृष्णाने त्याला जागृत व्हायला सांगितले व युद्धासाठी प्रवृत्त केले. युद्धासाठी सज्ज झाल्यावर अर्जुनाचे नैराश्य दूर झाले, तद्वत लढण्यासाठी तयार होण्याचा तुमचा निर्णय तुमचे नैराश्य दूर करू शकतो. जेव्हा तुम्ही सुदर्शन क्रिया करता आणि तुम्ही ध्यान करता, तेव्हा भूतकाळातील ज्या घटनांमुळे तुम्हाला त्रास होतो, जीवन दुःखी होतं, असे जखमांचे व्रण विनाविलंब दूर होतील.
नैराश्यातून कसे बाहेर पडायचे ?

जबाबदारी घ्या
मानसिक नैराश्य हे आर्थिक मंदीपेक्षा भयंकर आहे. यातून मार्ग काढण्याची आणि आजूबाजूच्या इतरांना मदत करण्याची आपण जबाबदारी घेतली पाहिजे. म्हणून नैराश्याबाबत तरी ते तुमचे कर्म आहे असे समजू नका. आपण याबद्दल नक्कीच काहीतरी करू शकता.

तुमचे जीवन अनमोल आहे हे जाणून घ्या
तुमचे जीवन खूप मौल्यवान आहे. ते गमावू नका. जेव्हा तुम्ही ध्यान करता, तेव्हा तुम्हाला त्रास देणारे आणि तुमचे जीवन दुःखी करणारे भूतकाळातील जखमांचे व्रण विनाविलंब नाहीसे झालेले असतील. जगातील इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा तुम्ही स्वतःला अधिक महत्त्व दिले पाहिजे कारण तुम्हीच तुमच्या जगाचे केंद्र आहात.

बसून फक्त विचार करत राहू नका
म्हणून बसून फक्त स्वतःचा विचार करत राहू नका. 'माझं काय होणार?', 'तुमचं काय होणार आहे?' तुम्ही हा विचार करत राहता आणि निराश होता. तुम्ही या जगात समाजासाठी काही काम करण्यासाठी आला आहात. देवाचे कार्य करण्यासाठी तुम्ही या जगात आला आहात. हे समजून घ्या आणि कोणत्याही सेवा कार्यात सामील व्हा. नियमित सुदर्शन क्रिया आणि ध्यान करा. काही काळ सुदर्शन क्रिया करत राहा आणि बघा किती बदल होतो ते!

जागे व्हा
तुम्ही कशाबद्दल उदास आहात? जागे व्हा आणि बघा. तसेही आपण सर्व मरणार आहोत, देह इथेच टाकणार आहोत. उरलेला जेवढा वेळ मी या पृथ्वीतलावर आहे तोवर मी आनंदी राहू नये का आणि तो आनंद माझ्याभोवती पसरवू नये का? मला काहीतरी हवे या ऐवजी, मी दुसऱ्यांना काही देऊ शकतो का, काही नाही तर मी निदान प्रत्येकाला आशीर्वाद देऊ शकतो. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात काही चांगली गोष्ट करण्याचा निश्चय करता आणि काही चांगली स्पंदने पसरवता, तेव्हा तुमचे नैराश्य दूर पळून जाते.
नैराश्य आणि ऊर्जा यांना सांधणारा छुपा दुवा
जेव्हा ऊर्जा कमी असते, तेव्हा नैराश्य येते. ऊर्जेची पातळी खाली येते तेव्हा तुम्हाला कशातही स्वारस्य वाटत नाही. ज्यावेळी ती आणखी खाली जाते, तेव्हा तुमची जगण्याची इच्छाच नाहीशी होते!
प्रत्येक गोष्टीत प्राण किंवा ऊर्जा असते. खरे तर आपण प्राणाच्या महासागरात तरंगत आहोत. ती आपल्यातील जीवनशक्ती आहे. दगडांना प्राणाचे एक युनिट मिळाले आहे. पाण्याला प्राणाची दोन युनिट्स मिळाली आहेत. आगीला प्राणाची तीन युनिट्स आहेत. वायुला प्राणाची चार युनिट्स मिळाली आहेत. वनस्पतींमध्ये प्राणाची पाच युनिट्स असतात. प्राण्यांमध्ये प्राणाची सहा युनिट्स असतात. मनुष्यप्राणी ७ ते १६ युनिट्स प्राण धारण करण्यास सक्षम आहे. प्राणाची अभिव्यक्ती म्हणजे हे संपूर्ण विश्व!
जेव्हा प्राण कमी असतो, तेव्हाच तुम्हाला उदास वाटते. जेव्हा प्राण आणखी खाली जातो, तेव्हा आत्महत्येचे विचार येतात. जेव्हा प्राण जास्त असतो तेव्हा तुम्हाला उत्साही वाटते. जेव्हा प्राण खूप जास्त असतो, तेव्हा तुम्हाला उत्साही आणि आनंदी वाटते. म्हणूनच जेव्हा लोक नैराश्यात असतात तेव्हा फक्त समुपदेशन देऊन काम होत नाही. प्राणाची पातळी वाढवण्यासाठी जे काही करावे लागेल त्याची गरज असते.
व्यायाम, योग्य आहार, ध्यान, प्राणायाम आणि सुदर्शन क्रिया याद्वारे तुमच्यातील प्राण वाढवा. यामुळे तुमची ऊर्जा वाढेल. जेव्हा ऊर्जा जास्त असते तेव्हा तुम्हाला अधिक आनंद होतो. तुम्हाला उत्साह वाटतो. ऊर्जा पूर्ण भरात येते तेव्हा तुम्हाला परमानंद होतो .
योग आणि ध्यान शिबिरे
ध्यान ही नैराश्य दूर करण्याची गुरुकिल्ली आहे

सहज समाधी ध्यान योग
*तुमच्या योगदानामुळे अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो

ऑनलाईन मेडिटेशन अँड ब्रेथ वर्कशॉप
*तुमच्या योगदानामुळे अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो

हॅपीनेस प्रोग्राम
*तुमच्या योगदानामुळे अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो
आयुष्य बदलवणारा अनुभव
‘जीवन स्थिर, न बदलणारे आहे’ असा समज होणे हे नैराश्याचे लक्षण आहे. जेव्हा तुम्हाला असे वाटते की जीवनात सर्व काही निर्जीव; स्थिर आहे, आयुष्याला काहीच अर्थ नाही, कुठेही जाणे नको; तेव्हा तुम्हाला नैराश्य आले आहे असे समजा ! जेव्हा एखाद्या व्यक्तीची झगडण्याची इच्छा नाहीशी होते, तेव्हा असे होते. अध्यात्म म्हणजे ध्यान, सेवा, ज्ञान आणि शहाणपणा यांच्याद्वारे आत्म्याचे उत्थान करणे. त्याद्वारे नैराश्यावर मात करता येते.”
- गुरुदेव श्री श्री रविशंकर
जीवन परिवर्तन करणारी श्वसन प्रक्रिया
सुदर्शन क्रिया™
आर्ट ऑफ लिविंग शिबिराची आधारशिला असणाऱ्या सुदर्शन क्रिये™ ने जगभरातील लाखो लोकांचा मानसिक ताण तणाव कमी होऊन त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारली आहे. येल विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठ तसेच विविध देशांमध्ये प्रसिद्ध झालेल्या विविध संशोधन आणि सर्वेक्षणातून हे सिद्ध झाले आहे कि सुदर्शन क्रिया, ताण तणाव निर्माण करणारे संप्रेरक (कॉर्टिसॉल) चे प्रमाण घटवण्यापासून ते एकंदरीत जीवनातील समाधान वृद्धिंगत होण्यापर्यंत लाभदायक ठरत आहे.
आणखी जाणून घ्याआत्महत्येच्या प्रवृत्तींना कसा प्रतिसाद द्यावा ?
इतर कोणाच्या हिंसे एवढीच स्वत: विरुद्ध हिंसा ही वाईटच आहे. त्यामुळे हे जग एका बाजूला सामाजिक हिंसाचार आणि दुसऱ्या बाजूला आत्महत्येच्या प्रवृत्तींमध्ये अडकले आहे. केवळ अध्यात्मच त्यांना केंद्रस्थानी आणू शकते आणि त्यांना या दोन्ही टोकाच्या भूमिकांपासून मुक्त करु शकते. जर किंचितही आत्महत्येची प्रवृत्ती आहे असे कोणीही तुम्हाला आढळले, तर त्यांना योग्य त्या वैद्यकीय मदतीसह चांगल्या लोकांच्या सहवासात आणा, त्यांना गायला आणि नाचायला लावा आणि त्यांना समजून घ्यायला सांगा की जीवन काही भौतिक गोष्टींपेक्षा बरेच महत्वाचे आहे. आयुष्य हे एखाद्याकडून दोषारोप किंवा कौतुक मिळण्यापेक्षा बरेच काही आहे. जीवन हे नातेसंबंध किंवा नोकरीपेक्षा बरेच काही आहे. आत्महत्येचे कारण म्हणजे नातेसंबंधातील अपयश, नोकरीतील अपयश आणि जे मिळवायचे आहे ते मिळवता न येणे. तुमच्या चेतनेमध्ये, तुमच्या मनात उपजणाऱ्या छोट्या छोट्या इच्छांपेक्षा आयुष्य खूप जास्त आहे. म्हणून आवश्यकतेनुसार योग्य ती वैद्यकीय मदत घ्या, जीवनाकडे मोठ्या दृष्टीकोनातून पहा आणि स्वतःला काही सेवा कार्यात गुंतवून घ्या!