थकवा
थकवा दूर करण्यासाठी आश्चर्यकारक रहस्ये जाणून घ्या !
सर्व काही थकवणारे आहे. आहे नां? आपण थकलेले आहात कां? यावर विचार करा. आपण रोज थकता, हो नां? जेव्हा आपण थकता तेव्हा आपल्याला चांगली झोप येते. आपण थकलेले नसाल तर आपल्याला नीट झोपही येत नाही, हे आपल्याला माहित आहे का? थकवा येण्यासाठी काय करावे? थकवा येण्याचेही अनेक प्रकार आहेत. एक म्हणजे शारीरिक थकवा. हे समजण्यासारखे आहे. आपण कसरत करता, थकवा येतो, चांगली झोप लागते. जर आपण पायी चालला असू, किंवा नुसता आपण ट्रेडमिलवर थोड़ा व्यायाम केलात, तर आपली थोडी उर्जा कमी होते आणि आपण थकुन जातो.
पण आपल्याला माहित आहे कां की विचार करून आणि विचार करून आणि विचार करून आणि आणखी जास्त विचार करून आणि हा जास्त विचार केल्याने येणारा मानसिक थकवा आपल्याला जास्त थकवतो.
हा सर्वात भयंकर प्रकारचा थकवा आहे जो आपण आपल्या आयुष्यात अनुभवू शकता, मानसिक थकवा, आणि आपल्ला भावनिक थकवा आणखी वाईट आहे. आपल्याला माहिती आहे, छातीत जळजळ, भीती, चिंता. पण या सगळ्याचा कंटाळा आलाय कां? आपण विचार करून थकलात का? विचार करून कंटाळा आला तर बरे. आपण चिंताग्रस्त झाल्यामुळे कंटाळले आहात का? जरा आपल्या स्वतःच्या आयुष्यात मागे वळून बघा, आपल्याला किती वेळा चिंता वाटली तरीही अस्तित्वात आहातच ना, अजूनही आपण शाबूत आहोत, अजूनही झोपत आहात, बरोबर? खात आहात, जिवंत आहात. आपण फक्त स्वतःचा अनुभव बघून या भावनिक थकव्यातून, बौद्धिक थकव्यातून बाहेर कां पडू नये? यातून बाहेर पडण्याचे मार्ग आहेत.
आयुष्य बदलवणारा अनुभव
योग आणि ध्यान शिबिरे
जीवनातील समस्यांसाठी सर्वसमावेशक उपाय
ऑनलाईन मेडिटेशन अँड ब्रेथ वर्कशॉप
*तुमच्या योगदानामुळे अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो
श्री श्री योग क्लासेस (लेवल १)
*तुमच्या योगदानामुळे अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो
हॅपीनेस प्रोग्राम
*तुमच्या योगदानामुळे अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो