प्रतिकारशक्ती
प्रतिकार शक्ती कशी प्राप्त होते ?
जाणून घ्या अचंबित करणारी रहस्ये !!
जे लोक अन्नाबाबत फारच चोखंदळ किंवा काटेकोर असतात, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत जाते. जेव्हा प्रतिकारशक्तीला आव्हानात्मक काहीतरी दिले जाते तेव्हा तिला काम करण्याची संधी मिळते. म्हणून अधून मधून, एकदातरी, रोगप्रतिकारक शक्तीला आव्हान दिले पाहिजे. मग आपली अंगभूत स्वसंरक्षणाची शक्ती जागृत होईल. अन्यथा खूपच चिकित्सक असल्याने वैफल्य येते व रागही येतो. आपली शरीरप्रकृती बदल स्वीकारणारी आणि परिस्थितीशी जुळवुन घेणारी असावी "आपण जे अन्न खाणार आहोत त्याचा आपल्या शरीरावर फारसा विपरीत परिणाम होणार नाही" असे जेव्हा आपण मनातून पक्के ठरवता, तेव्हाच हे होऊ शकते. याचा अर्थ अनारोग्यकारक किंवा दूषित अन्न खाणे असा नाही. परंतु याचा अर्थ अन्न आणि अन्नाच्या गुणवत्तेबद्दल खूपच काटेकोर होऊ नका. मध्यम मार्ग निवडा.
काही लोकांमध्ये ही गोष्ट अंगभूत असते की त्यांचे शरीर कोणत्याही प्रकारचे पाणी, कोणत्याही प्रकारचे हवामान, कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकते. जे लोक झोपडपट्टीत राहतात, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती बंगल्यात राहणाऱ्यांपेक्षा खूप मजबूत असते. समजा आपण फिल्टर न केलेले पाणी प्यायलात, तर चार दिवस अंथरुणावर पडून रहावे लागेल. पण त्या लोकांना या गोष्टीने काहीच फरक पडत नाही. ते खूप मजबूत आहेत. आपले शरीर वेगवेगळे हवामान, तापमान आणि परिस्थितीशी जुळवून घेऊ शकते. ते खूप लवचिक, जुळवून घेणारे.
आयुष्य बदलवणारा अनुभव
योग आणि ध्यान शिबिरे
आपल्या जीवनातील समस्यांसाठी सर्वसमावेशक उपाय
ऑनलाईन मेडिटेशन अँड ब्रेथ वर्कशॉप
*तुमच्या योगदानामुळे अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो
श्री श्री योग क्लासेस (लेवल १)
*तुमच्या योगदानामुळे अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो
हॅपीनेस प्रोग्राम
*तुमच्या योगदानामुळे अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो