मानसिक आरोग्य
सहजतेने मानसिक आरोग्य जपण्यासाठी आश्चर्यकारक रहस्ये जाणून घ्या!
जागतिक आरोग्य संघटना (WHO) नुसार, मानसिक आजाराच्या समस्येने जगभरातील अंदाजे ३५ कोटी लोक प्रभावित आहेत. दुर्दैवाने, बरेच लोक हे कबूल देखील करत नाहीत की ते उदासीन (निराश) आहेत आणि जवळजवळ ५० टक्के गंभीर नैराश्यावर उपचार केले जात नाहीत.
नकारात्मक भावनांना कसे हाताळायचे हे आम्हाला ना शाळेत शिकवले जाते ना घरी. आपण दातांची डेंटल केअर शिकवतो पण मानसिक मेंटल केअर शिकवायला विसरतो. नुसते बोलून किंवा सल्ला देऊन तणाव दूर होत नाही. तणावातून मुक्त होण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी आपल्याला काही प्रक्रिया आणि साधने शिकण्याची आवश्यकता आहे. एखादी व्यक्ती उदासीन कां होते? एखादी व्यक्ती भूतकाळात अडकलेली असते किंवा अति महत्वाकांक्षी आणि भविष्याबद्दल चिंताग्रस्त असते त्यामुळे नैराश्य येऊ शकते. परंतू जीवन तर निरंतर 'सोडून द्या' ही एक गोष्ट शिकण्याची प्रक्रिया आहे. आपण संपूर्ण विश्वाशी जोडलेले आहोत यांची बरेचदा जाणीव नसते आणि आपणास असे वाटते की आपण फक्त एक लहान व्यक्ती आहोत, ज्याला छोट्या छोट्या गोष्टी पाहिजे आहेत. या संकुचित मनातून आपण कसे बाहेर पाडायचे? आपण आपल्या अस्तित्वाच्या गाभ्यात शिरून शोध घ्यायला हवा.
आयुष्य बदलवणारा अनुभव
योग आणि ध्यान शिबिरे
आपल्या जीवनातील समस्यांसाठी सर्वसमावेशक उपाय
ऑनलाईन मेडिटेशन अँड ब्रेथ वर्कशॉप
*तुमच्या योगदानामुळे अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो
श्री श्री योग क्लासेस (लेवल १)
*तुमच्या योगदानामुळे अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो
हॅपीनेस प्रोग्राम
*तुमच्या योगदानामुळे अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो