तणाव

तणावमुक्त मन हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे

आपल्या विचारांवर, वागण्यावर आणि भावनांवर तसेच आपल्या आयुष्यावर ताण तणावाचा प्रभाव पडतो. ताण तणाव वाढल्याने आयुष्य कठीण व दुःखदायक होते. लोकांना यातून बाहेर पडणे खूप अवघड होते. आपल्या मेंदूला हे माहित असते की " आपण दुःखी झाले नाही पाहिजे, चिडचिडे नाही झाले पाहिजे, आपल्याला राग आला नाही पाहिजे " पण प्रत्यक्ष जीवनात आपण हे उतरवू शकत नाही. मग त्या क्षणी एक नकारात्मकता येते व ती जोर धरते आणि आपले मानसिक संतुलन बिघडते.

आपल्या घरून किंवा शाळेतून कोणीही आपल्याला यातून मार्ग कसा काढायचा हे शिकवले नाहिये. पण यातून बाहेर पडण्यासाठी सुदर्शन क्रिया™ आपल्याला कमालीची मदत करते. आपल्याला भावनांच्या डोंगरातून बाहेर पडण्यास मदत होते. हे एका स्वयंचलित यंत्रा सारखे आहे. आपसूक आपल्या आत एक भिंत तयार होते जी आपल्याला नकारात्मक भावनांपासून सहज वाचवते.

ताणतणाव बाबत काही गुपित सत्ये

सायकल चालवता येण्याचे रहस्य काय आहे? संतुलन म्हणजेच मध्यभागी राहणे. उजवीकडे किंवा डावीकडे पडून न देणे. जेव्हा सायकल एका बाजूला झुकते तेव्हा आपण संतुलन साधतो. जेव्हा सायकलीचा तोल जायला लागतो तेव्हा आपल्याला एक जाणीव येते, आपण त्याचा स्वीकार करतो व त्यावर कार्य करतो आणि तोल सावरतो.

icon

नकारात्मक्तेचे मूळ

तुम्ही कधी विचार केला आहे का की नकारात्मक विचार आपल्याला कुठून येतात? जर आपण नकारात्मक विचारांचे मूळ शोधले तर आपल्याला लक्षात येईल की ते येण्याचे कारण मानसिक ताण तणाव आहे. एका शांत, आनंदी व्यक्तीला नकारात्मक विचार येणार नाहीत. आपण जेवढे जास्त दुःखी होतो तेवढे जास्त नकारात्मक विचार येतात.

icon

प्रोत्साहन देत नाही

ताण तणाव लोकांना काहीतरी नवीन करण्यासाठी किंवा काहीतरी जास्त करण्यासाठी प्रोत्साहित करत नाही. काही लोक म्हणतात की तणाव असला तर नवीन शोध लागतात. पण तसे असते तर अफगाणिस्तान, लेबनोन हे देश जिथे गेली ४० वर्षे खूप तणावयुक्त परिस्थिती आहे, तिथे भरपूर नवीन शोध लागले असते. पण तसे झालेले दिसत नाही.

icon

छोटया गोष्टींत गुंतवून ठेवतो

जेव्हा आपल्या मनात ताण तणाव असतो तेव्हा आपले मन विशाल व खुले रहात नाही. ते छोटया गोष्टींत गुंतून रहाते व बारीक सारीक गोष्टींचा खूप विचार करते ज्या गोष्टी सारख्या बदलत राहतात.

योग आणि ध्यान शिबिरे

ध्यान आपल्याला कार्यक्षम, उत्साही, तणावमुक्त आणि आनंदी बनवते.

तणाव तेव्हा येतो जेव्हा आपल्याला कमी वेळात, कमी ऊर्जेत खूप काम करायचे असते. एकतर तुम्ही काम कमी करता जे आजकालच्या जगात शक्य नाही, किंवा कामासाठी लागणार वेळ वाढवता. ते सुद्धा फारसे उपयोगी होत नाही. त्यामुळे आपल्याला एकच पर्याय उरतो की आपली ऊर्जा वाढवणे.

- गुरुदेव श्री श्री रविशंकर

ताण तणावपासून मुक्त कसे व्हायचे?

जसे तुमची ऊर्जेची पातळी वाढते तसे आपोआप तणाव कमी होतो.

healthy food habits to maintain wellness

पुरेसा आहार ठेवणे.

आपला आहार खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नसला पाहिजे. आहार संतुलित असला पाहिजे. ज्यात पुरेसे कार्बोदक आणि प्रथीने असली पाहिजेत.

Home Remedies for Sleep or Insomnia

रोज पुरेशी झोप घेणे.

आपली रात्रीची झोप ६ ते ८ तास असली पाहिजे. त्यापेक्षा कमी किंवा जास्त नको.

meditation during happiness program

प्राणायाम करणे

रोज प्राणायामाचा सराव केल्याने ऊर्जा वाढते.

people meditating outdoors in a lawn

ध्यान करणे

फक्त काही मिनिटे ध्यान केल्याने आपल्याला सर्व प्रकारच्या ताण तणावापासून विश्राम मिळतो. ध्यान आपल्याला कार्यक्षम, ऊर्जावान, तणावमुक्त आणि आनंदी ठेवते.

तणावमुक्त राहून यश मिळवणे

सायकल चालवता येण्याचे रहस्य काय आहे? संतुलन म्हणजेच मध्यभागी राहणे. उजवीकडे किंवा डावीकडे पडून न देणे. जेव्हा सायकल एका बाजूला झुकते तेव्हा आपण संतुलन साधतो. जेव्हा सायकलीचा तोल जायला लागतो तेव्हा आपल्याला एक जाणीव येते, आपण त्याचा स्वीकार करतो व त्यावर कार्य करतो आणि तोल सावरतो.

icon

संतुलित राहणे

तुमचा कामाचा वेळ आणि स्वास्थ्य राखण्याचा वेळ यात संतुलन ठेवा. आहार आणि व्यायामाकडे लक्ष दया आणि ध्यानासाठी व विश्रांती साठी थोडा वेळ द्या.

icon

कलेमध्ये आवड निर्माण करा.

डावा मेंदू व उजवा मेंदू यात ताळमेळ ठेवण्यासाठी रंगकाम, गायन, कविता करणे किंवा अशाच कोणत्याही प्रकारचे छंद जोपासा.

icon

लोकांची सेवा करा

आपल्या आसपास च्या लोकांसाठी उपयोगी बना. जेव्हा आपण कोणतेही चांगले कार्य करतो आणि सेवा करतो तेव्हा आतून समृद्ध व पुनरुत्तेजित होतो.

आयुष्याच्या खऱ्या यशाचे रहस्य आहे की आयुष्यातील सर्व गोष्टींचे त्यांच्यात गुंतून न रहाता किंवा प्रतिकार न करता संतुलन साधणे.