![yoga for backpain backache](https://www.artofliving.org/in-en/app/uploads/bis-images/25365/2023/09/yoga-for-backpain-backache-720x480-f42_40.jpeg)
स्पाईन केअर योग अँड पोश्चर प्रोग्रॅम
शारीरिक ऊर्जेत वाढ • तत्परता व स्मरणशक्ती सुधारते • तंदुरुस्त पाठीचा कणा • दुखणे व वेदना होणे कमी होते.
ऑनलाईन / प्रत्यक्ष दोन्ही प्रकारांत सर्व वयोगटातील लोकांसाठी
*आपल्या योगदानाचा आपल्याला आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो.
नोंदणी करा!मला या कार्यशाळेतून काय मिळेल?
या कार्यशाळेचे उद्धीष्ठ लोकांना निरोगी बनवण्याचे, तसेच खासकरून पाठीच्या कण्याचे दुखणे मुळासकट नष्ट करण्याचे आहे.
![icon](https://www.artofliving.org/in-en/app/uploads/2023/10/Group-18084.png)
शारीरिक ऊर्जा वाढते.
![icon](https://www.artofliving.org/in-en/app/uploads/2023/10/Group.png)
तत्परता व स्मरणशक्ती सुधारते.
![icon](https://www.artofliving.org/in-en/app/uploads/2023/10/Group-3804.png)
तंदुरुस्त पाठीचा कणा.
![icon](https://www.artofliving.org/in-en/app/uploads/2023/06/Group-3805.png)
दुखणे व वेदना होणे कमी होते.
पाठीच्या कण्याविषयी थोडे जाणून घेऊयात
पाठीचा कणा हा एकावर एक रचलेल्या ३३ स्वतंत्र हाडांनी बनला आहे. पाठीचा स्तंभ हा आपल्या शरीराचा मुख्य आधार आहे. आपण उभे असताना, वाकताना किंवा वळताना हा स्तंभ आपल्या कण्याला दुखापतींपासून संरक्षण देतो. मजबूत स्नायू व हाडे, लवचिक स्यायुबंध व अस्थीबंध, संवेदनशील मज्जातंतू हे सर्व मिळून एक मजबूत पाठीचा कणा बनतो.
या कार्यशाळेचे विद्यार्थी म्हणतात की येथे शिकलेल्या तंत्राचा रोज नियमित सराव केल्याने त्यांच्यावर व त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडला.
प्रौढासाठी कार्यशाळा
ऑफलाइन शिबिरे
कालावधी - ४ दिवस (रोज अडीच तास)
मूल्य - रु ३,००० /-
ऑनलाईन शिबिरे
कालावधी - ३ दिवस (रोज २ तास)
मूल्य - रु २,००० /-
निवासी शिबिरे
कालावधी - २ दिवस
मूल्य - रु ३,५०० /- (जेवण व राहण्यासहित)
लहान मुलांसाठी शिबिरे
जास्त वजन, कमकुवत स्नायू, कमकुवत स्नायूबंध यांमुळे फक्त पाठीचा कणाच नाही तर संपूर्ण शरीराचे संतुलन बिघडते. त्यामुळे ताण वाढतो, दुखापती व आजार होण्याची चिन्हे वाढतात.
शारीरिक असंतुलन पाठीच्या कण्यावर खूप ताण निर्माण करते. चांगल्या स्थितीत उभे रहायला, चालायला, बसायला, झोपायला शिकल्याने हालचाली करताना किंवा वजन उचलताना कमी ताण येतो. अयोग्य स्थितीत उठल्या बसल्याने मानसिक ताण तणाव, लॅक्टोस असंतुलन, चिडचिडपणा आणि इरिटेबल बॉवेल सिंड्रोमअसे सामान्य विकार संभावतात.
ऑनलाईन
कालावधी - २ दिवस (रोज दीड तास)
मूल्य - रु ६०० /-
ऑफलाइन
कालावधी - २ दिवस (रोज दीड तास)
मूल्य - रु १००० /-
खूपच साधी सोपी पण प्रभावी प्रक्रिया आहे. मी पहिल्यांदाच गिरक्या घेतोय, असे वाटण्याइतके हलके वाटले. माझा स्लिप डिस्कचा त्रास कमी झाला. या प्रोग्रॅमच्या प्रशिक्षकांचे हृदयापासून आभार!
अजय कुमार पांडे
मॅनेजर, पॉवर प्लँट, झारसुगुदा, ओडिशा
मी तीन दिवसीय स्पाईन केअर प्रोग्रॅम केला. सतत खुर्चीवर बसून दीर्घ काळ पर्यंत काम करावे लागत असल्याने मला पाठ दुखीचा त्रास सुरु झाला होता, जिचा दुष्परिणाम माझ्या कामावर होऊ लागला…
एस. क्यू. अख्तर जमाल
डेप्युटी कमांडर, सीआरपीएफ, श्रीनगर
या प्रोग्रॅमचे खूप खूप आभार! जरी तो ऑनलाईन असला तरी आमच्यावर वैयक्तिक लक्ष होते. तीन दिवसातच खुपसे विषय हाताळले गेले. आणि हा प्रोग्रॅम खूप सुंदर आणि उच्च दर्जाचा आहे! स्वतःविषयी…
सत्या झा
रेडीओलॉजीस्ट, जोधपुर, राजस्थान
मला हे शिबिर करायचे आहे पण....
जे तंत्र आपण या कार्यशाळेत शिकतो ते मला कायमस्वरूपी उपयोगी पडेल का? या कार्यशाळेनंतर मला माझ्या दुखण्यांपासून व वेदनेपासून संपूर्ण आराम मिळेल का?
होय, नक्कीच. साधारण ७५ % लोकांना त्यांच्या दुखण्यातून बाहेर पडायला खूप उपयोग झालाय. ह्या कार्यशाळेचे परिणाम हे प्रत्येकाच्या आरोग्याच्या स्थितीनुसार कमी जास्त होतात. तसेच आजार किती जुना किंवा तीव्र आहे त्यावर अवलंबून असतात.
मला स्लिप डिस्क चा आजार आहे. हा आजार दूर करण्यासाठी मला मदत होईल का?
या कार्यशाळेत तुम्हाला पाठीच्या कण्यासंबंधित समस्यावर उपाय मिळेल. तरीही तुमच्या वैद्यांशी बोलून त्यांचा सल्ला घ्यावा.
माझ्या गोळ्या औषधे चालू आहेत. मी ही कार्यशाळा करावी का?
हो. तुम्ही घरात हिंडू फिरू शकताय तर नक्कीच तुम्ही ही कार्यशाळा करू शकता व कार्यशाळेचे फायदे मिळवू शकता.
माझे स्क्रीनवर खूप वेळ कामकाज चालू असते. त्यामुळे खूप पाठीच्या कण्याला आराम मिळण्यासाठी मला या कार्यशाळेचा उपयोग होईल का?
हो नक्कीच. आणि तुम्हाला स्क्रीनच्या समोर चांगल्या स्थितीत कसे बसायचे हे देखील शिकता येईल. तसेच तुम्हाला कोणत्याही कार्यशाळेत किंवा ऑफिस मध्ये कसे बसायचे हे देखील शिकवले जाते.
मला ही कार्यशाळा करताना काही खाण्याची पथ्य पाळावी लागतील का?
नाही.
मी ही कार्यशाळा माझ्या मुलांना सोबत घेऊन करू शकते का?
ही कार्यशाळा वय वर्षे १८ च्या पुढील लोकांसाठी आहे. लहान मुलांसाठी हीच कार्यशाळा खास वेगळ्या पद्धतीने घेतली जाते. त्यात त्यांच्या शारीरिक वाढीवर लक्ष केंद्रित केले जाते. हाडे वाढण्याची क्रिया ही १८ व्या वर्षापर्यंत होते.
मी सध्या तंदुरुस्त आहे. ही कार्यशाळा मला उदभावणाऱ्या संभाव्य पाठीच्या समस्यांपासून वाचवते की फक्त पाठीची स्थिती सुधारण्यास मदत करते?
हो. तुम्ही तंदुरुस्त असलात तरी ही कार्यशाळा करू शकता. ही कार्यशाळा संभाव्य दुखण्यांपासून वाचवते तसेच सध्याची पाठीची स्थिती बरोबर करते.
ही कार्यशाळा मला खांदेदुखी आणि गुडघेदुखी वर उपयोगी पडेल का?
हो. या कार्यशाळेत शरीराचा ढाचा सुधारतो तसेच विविध स्नायुंची वजन उचलण्याची क्षमता वाढते. जिथे जिथे गरज आहे तिथे शारीरिक स्थिती बरोबर रहाते. त्यामुळे दुखणे व वेदना कमी होतात.