yogal-kamlesh-ruchi-upscale

श्री श्री योग क्लासेस (लेवल १)

तुमच्या क्षमतांचा विस्तार करा.

शरीर बळकटी • शरीराची लवचिकता आणि स्वास्थ्य • मजबूत आणि समतोल मन

एकूण १० तास, ४ ते ६ दिवस

*तुमच्या सहभागामुळे तुम्हांला आणि आर्ट ऑफ लिव्हिंग च्या सामाजिक उपक्रमांना मदत होते.

श्री श्री योग निराळे आहे.

मुख्य प्रवाहातील योगामध्ये असलेली स्पर्धात्मकता आणि उथळपणा याचा कंटाळा आला आहे?

श्री श्री योग केवळ तुमच्या शरीराची ताकद, लवचिकपणा आणि स्वास्थ्य वाढवीत नाही तर, योगाच्या परिपूर्ण दृष्टीकोनामुळे तुमची स्वत: ची सजगता आणि केंद्रितपणा वाढवतो.

स्वत:ला स्वीकारण्यासाठी पोषक वातावरण

श्री श्री योग च्या आश्वासक वातावरणात तुम्ही स्वतःच्या क्षमतेनुसार वेदनामुक्त स्पर्धाविरहित आसने करता. योगा स्टुडिओ च्या स्पर्धात्मक वातावरणात तुम्हाला गहिऱ्या अध्यात्मिक अनुभूतीचा अनुभव घेण्यात अडथळे येतात.

फक्त योगासनांपेक्षाही बरेच काही जास्त!

लोक योगाचा संबंध फक्त योगासनांशी जोडतात परंतु योगामध्ये त्या व्यतिरिक्त ही अनेक गोष्टी आहेत. श्री श्री योगा मध्ये तुम्ही योगाचा सर्वंकष अनुभव घेऊ शकता. ज्यामध्ये पारंपारिक आसने, सोपे प्राणायाम, मार्गदर्शित ध्यान आणि योगा विषयी माहितीचा समावेश होतो.

ह्या शिबिरातून मला काय मिळेल ?

ह्या शिबिरात तुम्हांला शरीर पुनः बळकट करणाऱ्या योगासनांच्या माध्यमातून मन, शरीर आणि आत्मा यांचा समन्वय आणि उत्साहपूर्ण राहण्याचे तंत्र शिकता येईल.

icon

योगासने : ताकद आणि समतोल

योगासनांमुळे मेद आणि मज्जापेशीजाल (कोलेस्टेरॉल) कमी होते.स्नायू मजबूत आणि पिळदार बनतात. तसेच शारिरीक हालचाली आणि शरीराचा लवचिकपणा सुस्थितीत ठेवण्यास मदत होते.

icon

ध्यान आणि विश्राम : गहिरी विश्रांती

हया शिबिरामध्ये योग निद्रा शिकण्यास मिळते जे सजग राहून विश्राम करण्याचे अतिशय विस्मयकारक तंत्र आहे. योगनिद्रेमुळे शरीर आणि मन शांत होऊन ध्यानाचा गहिरा अनुभव घेता येतो.

icon

ऊर्जा : योगिक श्वसन (प्राणायाम)

प्रगत श्वासोच्छवास तंत्रामुळे तुमचा श्वास लयबद्ध होतो आणि तुमच्या मन आणि शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवसभर तुम्हाला उत्साही ठेवते.

icon

योगातून मिळालेली शिकवण

मन आणि शरीराचा स्वाभाविक गुणधर्म आणि निवांत, समाधानी, आयुष्य कसे जगावे याविषयीची योगाची विलक्षण शिकवण अनुभवा.

संस्थापक

गुरुदेव श्री श्री रवि शंकर

गुरुदेव श्री श्री रविशंकर हे जागतिक मानवतावादी, अध्यात्मिक नेते आणि शांतीदूत आहेत. तणाव मुक्त, हिंसा मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अभूतपूर्व अशा जागतिक चळवळीचे नेतृत्व ते करतात.

आणखी जाणून घ्या