श्री श्री योग डीप डाईव्ह (लेवल २)
तुमच्या शरीराला ताजेतवाने करणारे बटन दाबा.
*तुमच्या योगदानाचा तुम्हाला आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो.
नोंदणी करा!या शिबिरातून मला काय मिळेल?
जीवनशैलीमुळे होणारे आजार दूर करा
ही कार्यशाळा वजन कमी करण्यास मदत करते, बद्धकोष्ठतेसारख्या पाचन समस्यांचेनिराकरण करते आणि सायनसायटिस आणि ऍलर्जीचा सामना करण्यास मदत करते.
स्पष्टता आणि एकाग्रता सुधारेल
ही कार्यशाळा शरीराला गहिऱ्या ध्यानासाठी तयार करते आणि शरीर व मनाला स्थिरता आणि शक्ती देते.
अधिक साध्य करा
अधिक फायदा म्हणजे तुमचे शरीर हलके होते आणि तुमची उर्जा वाढते आणि त्यामुळे तुम्ही अधिक काही साध्य करण्यासाठी तयार होता.
निरोगी जीवनासाठी वचनबद्धता
या शिबिरामुळे तुम्हाला सकस आहार घेणे आणि जीवनशैलीच्या चांगल्या सवयी टिकवणे सोपे होऊ शकते.
उत्तम अशी योगिक शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया
आपल्या वेगवान २१ व्या शतकातील जीवनशैलीमुळे आपल्याला आपल्या शरीराकडे आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळच उरला नाहीये. श्री श्री योग लेवल २ हे शिबिर आपल्या शरिराला झालेले नुकसान भरून काढण्याची खात्री देतो. या शिबिरातील प्रभावी योगिक प्रक्रियांमुळे अनेक वर्षांपासून तुमच्या शरीरात साचलेले विषारी द्रव्य- ज्यामुळे शरीर आणि मनातील सुस्ती, ऊर्जाकमी होते आणि मंदपणा येतो त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी मदत करतो.
माझी पाठदुखी आणि खांदेदुखीवर श्री श्री योगने एखाद्या चमत्कारासारखा परिणाम केला. आत्ता मी खूप सामर्थ्यशाली आणि तंदुरुस्त आहे.
कृतिका कृष्णन
कार्यकारी पीआर
आपल्या शरीराची नैसर्गिक उपचार यंत्रणा सक्रिय करा
सखोल योगिक शुद्धीकरण
शंख प्रक्षालन आणि जल नेति तुमच्या पचनसंस्थेला आणि श्वसनसंस्थेला पुनरुज्जीवित करतात आणि तुमच्या शरीरात आणि तुमच्या प्राणिक प्रणालीमध्ये जमा झालेल्या विषारी पदार्थांचा निचरा करतात.
प्राणायाम आणि आसने
नवीन प्राणायाम आणि योगासने शिका जी तुम्हाला तुमची साधना अधिक सखोल होण्यास मदत करतील.
बळकटीकरण आणि उपचार
एक अनोखे तंत्र जे हाडांना आणि स्नायूच्या संस्थेला बळकट करते आणि अवयवांमधील अडथळे दूर करते, ज्यामुळे प्राण शरीरात मुक्तपणे वाहू शकतो.
संस्थापक
गुरुदेव श्री श्री रवि शंकर
गुरुदेव श्री श्री रविशंकर हे जागतिक मानवतावादी, अध्यात्मिक नेते आणि शांतीदूत आहेत. तणाव मुक्त, हिंसा मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अभूतपूर्व अशा जागतिक चळवळीचे नेतृत्व ते करतात.
आणखी जाणून घ्या