
श्री श्री योग रिट्रीट्स
शरीर शुद्ध आणि मन स्पष्ट बनवा.
विराम • अल्प विश्राम • शांती.
या शिबिरातून मला काय मिळेल?
श्री श्री योग रिट्रीट मध्ये विविध उपचार पद्धती अनुभवण्यास मिळतील. ज्यामध्ये योगाचे प्राचीन ज्ञान, आयुर्वेद आणि निसर्गोपचार असतील , ज्यामुळे शरीराचे शुद्धीकरण होऊन निरोगी आणि ऊर्जावान राहू शकू.

ऊर्जावान राहण्यासाठी योग आणि ध्यान
योगाच्या प्राचीन परंपरेनुसार त्यामध्ये हठ, राज, ज्ञान आणि भक्ती योग सामावले आहेत, जे आपणास शरीर, मन आणि आत्मा यांचे एकत्रीकरणचा अनुभव देतात.

वैशिष्टपूर्ण मालिश पद्धती
आयुर्वेदिक आणि नैसर्गिक प्रक्रिया निवडून, मालिश उपचार पद्धतीमुळे आपल्या शरीराला सुख द्या. या प्राचीन प्रक्रियांमुळे संपूर्ण विश्रामाची अनुभूती मिळवा.

नाडी परीक्षा
ही अशी एक अचूक आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे, ज्यामध्ये आपला शारीरिक प्रकार, प्रकृती तसेच शारीरिक, मानसिक आणि भावनिक असमतोल समजतो. आणि आजाराचे निदान होण्यासाठी आपल्या शरीलाला आवश्यक ते सर्वकाही प्राप्त होते.

आयुर्वेदिक आहार
शरीर पुनरुज्जीवित करणे, त्यात नव चैतन्य आणणे आणि समतोल राखणे यासाठी पौष्टिक आहार. तुमच्या प्रत्येकाच्या वैशिष्ठ्यपूर्ण शरिरासाठी आवश्यक असा आहार, स्थानिक आणि सेंद्रिय जमिनीमध्ये पिकवलेल्या धान्यापासून बनवला जातो.
योग आणि ध्यान यांच्या एकत्रीकरणामुळे माझे मन आणि शरीर खूप विश्राम होऊन पूर्णत्वाचा अनुभव आला. योगाबद्दलचे आणि आपल्या शरीराच्या माध्यमातून मनाला कसे हाताळावे याचे जे ज्ञान मला मिळाले ते मला…
पूजा
सांता क्लारा, कॅलिफोर्निया
मी गाढ झोपू शकले आणि मी दिवसभर पूर्वीपेक्षा उपयोगी आणि सजग झाले आहे याची मला जाणीव झाली. योग म्हणजे निव्वळ आसने नव्हेत – तर या प्रोग्रॅममधून योग म्हणजे काय याचे…
कॅरेन
लॉंग आयलंड
मला गुडघे दुखी होती. पण या प्रोग्रॅमनंतर त्यातील ताठरपणा कमी होऊन तो बरा झाला. ज्ञान आणि जीवनशैली, दोन्हीबध्दलचे मार्गदर्शन सुंदर होते. यातील आसनांच्या क्रमाचा मी माझ्या दैनंदिन सरावामध्ये समाविष्ट करू…
एमीत्त
ऍटलांटा, जीए
संस्थापक
गुरुदेव श्री श्री रवि शंकर
गुरुदेव श्री श्री रविशंकर हे जागतिक मानवतावादी, अध्यात्मिक नेते आणि शांतीदूत आहेत. तणाव मुक्त, हिंसा मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अभूतपूर्व अशा जागतिक चळवळीचे नेतृत्व ते करतात.
आणखी जाणून घ्याआपली श्री श्री योगा रिट्रीट शोधा

सुखम्
परिपूर्ण सुटका
आयुर्वेद, आसने, प्राणायाम आणि मार्गदर्शक ध्यानाचा परिपूर्ण मिलाफ. सुखम् मुळे गहऱ्या विश्रामामध्ये डुंबून जाल. दैनंदिन ताण तणावापासून मुक्ती प्राप्त होऊन आनंदी होण्यासाठी ह्या आरोग्यपूर्ण रिट्रीट ची निर्मिती केली आहे.
- आयुर्वेद उपचार बाबत वैयक्तिक सल्ला
- चैतन्यदायी योग आणि ध्यान
- स्वादिष्ट आयुर्वेदिक आहार
- वैयक्तिक मसाज उपचार

शुद्धी
आपले मन, शरीर आणि आत्मा यांचे नुतनीकरण करा
योगिक शुध्दीच्या शक्ती द्वारे स्वच्छ शरीर, स्पष्ट मन आणि तुमच्या पंच महाभूतांमध्ये समतोल प्राप्त करा. आजवर शरीरात जमा झालेल्या विषारी द्रव्याची स्वच्छता होण्यास मदत होऊन शरीर, मन आणि आत्मा यांचे पुनर्रुजीवन होऊन नव चैतन्य प्राप्त व्हावे अशी या शुद्धीकरण रिट्रीट ची रचना आहे.
- आयुर्वेद उपचार बाबत वैयक्तिक सल्ला
- वैयक्तिक शुद्धीकरण उपचार पद्धती
- चैतन्यदायी योग आणि ध्यान
- आयुर्वेदिक शुद्धीकरण आहार पद्धती

कायाकल्प
नैसर्गिकरित्या आपले वजन नियंत्रित करा
आपल्यासाठी बनवलेल्या विशेष जीवनशैली आणि आहार यांच्या सहाय्याने आमचे तज्ञ आपले शारीरिक वजन अगदी सहज नियंत्रित करण्यात तुम्हाला मदत करतील. या योगा रिट्रीट मुळे आपले ज्यास्त वजन नैसर्गिकरित्या कमी करून त्याचे दूरगामी परिणाम प्राप्त होतील.
- आयुर्वेद उपचार बाबत वैयक्तिक सल्ला
- खास बनवलेल्या शुद्धीकरण प्रक्रिया
- चैतन्यदायी योग आणि ध्यान
- आयुर्वेदिक शुद्धीकरण आहार