सुदर्शन क्रिया™
श्वासोच्छवासाचे एक प्रभावशाली तंत्र ज्याने जगभरातील लाखो लोकांचे जीवन बदलले आहे
मला शिकायचे आहेसुदर्शन क्रिया™ यांत विशिष्ट नैसर्गिक लयींमध्ये श्वासोछ्वास घेतला जातो, ज्यामुळे शरीर, मन आणि भावनांमध्ये सुसूत्रता येते. हे अनोखे श्वासोच्छ्वास तंत्र तणाव, थकवा तसेच क्रोध, निराशा आणि नैराश्य यांसारख्या नकारात्मक भावना दूर करते, ज्यामुळे आपण शांत अजुन उर्जावान, एकाग्र आणि आरामशीर होतो.
संशोधनात असे आढळले आहे की श्वास हा मन आणि शरीर यांच्यामधील एक अत्यावश्यक दुवा आहे. प्रत्येक भावनेनुसार श्वासोच्छ्वासाची एक विशिष्ठ लय असते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण रागावतो तेव्हा श्वास लहान होतो आणि जेव्हा आपण दु:खी असतो तेव्हा श्वास दीर्घ होतो.
याच्या विरुद्ध सुद्धा होते, की एखाद्या विशिष्ट लयी मध्ये श्वास घेतल्यास संबंधित भावना उद्भभवू शकते. त्यामुळे आपल्या भावनांनी भारावून जाण्याऐवजी आपण श्वासोच्छवासाच्या विशिष्ट तंत्रांचा वापर करून त्यात बदल घडवून आणू शकतो. सुदर्शन क्रियेच्या माध्यमातून आपण श्वासाचा कौशल्याने वापर करून आपल्या भावना बदलण्यास शिकू शकतो, त्यामुळे क्रोध, चिंता, नैराश्य आणि काळजी यासारख्या तणावास कारणीभूत असलेल्या नकारात्मक भावना बाहेर पडतात, ज्यामुळे मन पूर्णपणे आनंदी, निवांत आणि ऊर्जावान राहते.
“बौद्धिकदृष्ट्या तुम्हाला सर्व काही माहित आहे, पण जेव्हा नकारात्मकता एखाद्या पुरासारखी येते, तेव्हा ती आपल्यावर सत्ता गाजवते. काय करावं? येथे, सुदर्शन क्रिया™ आणि ध्यान यासारख्या श्वासोच्छ्वासाच्या तंत्रांमुळे आपल्याला भावनांच्या त्या महापुरावर मात करण्यास मदत होते.”
- गुरुदेव श्री श्री रवि शंकर
सुदर्शन क्रिया™ बद्दल अधिक माहिती
एक सोपी श्वसन प्रक्रिया जिच्यामुळे आपली चिंता ४४% नी कमी होते.
शरीरामध्ये सुसंवाद बिंबवण्यासाठी सुदर्शन क्रिया मदत करते.
जीवन परिवर्तनीय