सुदर्शन क्रिया फॉलोअप
आपली साधना अधिक गहिरी करा.
सकारात्मक व आध्यात्मिक लोकांच्या सहवासाचा आनंद घ्या. प्राचीन ज्ञानाबद्दल चर्चा करा. आपल्या दैनंदिन साधनेद्वारे जीवनात योग्य मार्गावर राहण्याची प्रेरणा मिळवा.
* महत्त्वाचे: फॉलो-अप फक्त त्यांच्यासाठी खुले आहेत ज्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रमाणित प्रशिक्षकाद्वारे आयोजित आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्समध्ये सुदर्शन क्रिया शिकली आहे.
देशभरात प्रत्येक शहरात मोफत सराव सत्र ( फॉलो-अप) घेतले जातात.
फॉलो अप केंद्र शोधाफॉलोअप सत्रा मध्ये सहभागी होऊन मला कसा फायदा होईल?
सुदर्शन क्रियेचा सराव होतो
हॅपीनेस प्रोग्राममध्ये शिकलेल्या तंत्राचा सराव करा. फॉलोअप केंद्र हे तुमच्या दररोजच्या साधनेला प्रेरणा देण्यासाठी आणि स्वंयप्रेरित होण्याचे उत्तम ठिकाण आहे.
व्यावहारिक ज्ञान
प्राचीन ज्ञानावर चर्चा करा आणि आधुनिक जीवनाच्या कठोरतेवर ते लागू करण्यास शिका.
सामाजिक बांधिलकी
जगभरातील १८० देशांमधे कोणत्याही शहरात सकारात्मक विचारसरणीच्या, आध्यात्मिक अशा समुदायाच्या सहवासाचा आनंद घ्या.
आर्ट ऑफ लिव्हिंग फॉलो-अप म्हणजे काय ?
आर्ट ऑफ लिव्हिंग हॅपिनेस प्रोग्राम किंवा येस प्लस प्रोग्राम पूर्ण केलेल्या सर्वांसाठी जगभरातील आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रांवर एकत्र येऊन साप्ताहिक सामूहिक सुदर्शन क्रिया फॉलो-अप होतात.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक हे सत्र विनामूल्य घेतात.
सामूहिक सरावसत्र - ज्याला 'सत्संग' म्हणून देखील संबोधले जाते. हे एक असे ठिकाण आहे जिथे तुम्ही श्वासोच्छवासाच्या या विशेष तंत्राचा अनुभव परत ताजा करु शकता. आपल्या घरगुती साधनेस बळकटी देऊन सहसाधकांसह समुदायात एकत्र रहाण्याची ही एक संधी आहे.
आयुष्य बदलवणारा अनुभव
संस्थापक, आर्ट ऑफ लिव्हिंग
गुरुदेव श्री श्री रवि शंकर
"खूप काही करायचे आहे मात्र वेळ कमी आहे, ऊर्जा अपुरी आहे, याचा परिणाम म्हणजे ताण तणाव. यातून बाहेर येण्यासाठी व्यक्तीला साधनेची गरज आहे."
गुरुदेव श्री श्री रविशंकर हे जागतिक मानवतावादी, अध्यात्मिक नेते आणि शांतीदूत आहेत. मानसिक आरोग्य आणि सर्वांगीण आरोग्याद्वारे वैयक्तिक आणि सामाजिक परिवर्तन या गुरुदेवांच्या लक्ष्यामुळे आज १८० पेक्षा जास्त देशांमध्ये जागतिक चळवळ प्रज्वलित होऊन ५ करोडपेक्षा जास्त लोकांचे जीवनमान उन्नत झाले आहे.