वेलनेस प्रोग्रॅम फॉर सब्स्टन्स यूजर्स
एक कार्यशाळा ज्यामध्ये कोणत्याही रासायनिक औषधांचा वापर न करता प्रभावशाली प्राणायामाच्या पद्धतीने व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली इलाज केला जातो.
मादक पदार्थ आणि दारू सोडा • आजार बरे करा • स्वच्छ रहा.
या कार्यशाळेत मला काय मिळेल?
मादक द्रव्यपासून दूर रहायला शिका.
जर तुम्ही कोणत्याही प्रकारची मादक द्रव्य घेत असाल जसे की दारू, गांजा, इंजेकशन मार्फत किंवा नाकातून श्वासाद्वारे घेण्याचे मादक पदार्थ या सर्वांपासून मुक्त व्हायला शिका. आम्ही तंबाखू सेवन करणाऱ्यांसाठी एक स्वतंत्र कार्यशाळा देखील घेतो.
तुम्हाला आतून चांगले वाटेल आणि आरामदायी वाटेल.
प्राणायामच्या पद्धतीने व ध्यान केल्याने आपल्याला संपूर्ण विश्राम मिळतो आणि खूप चांगले देखील वाटते ते पण कोणतेही मादक द्रव्य न घेता. तसेच ध्यान व प्राणायामाचे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.
मादक द्रव्यांचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. या कार्यशाळेत अनेक तंत्र आहेत ज्यांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हृदयाच्या विकाराची शक्यता कमी होते, ऊर्जा वाढते.
ताण तणाव, चिंता व निद्रानाश यांपासून मुक्तता
या कार्यशाळेमध्ये आपण ताण तणावापासून मुक्त होतो. ताण तणाव आपल्याला मादक द्रव्य घेण्याचे कारण ठरतो. तसेच काही पडताळलेल्या पद्धतीने आपण मादक द्रव्य न घेतल्याने होणारी चिंता व निद्रा नाश यांपासून दूर राहतो.
सुदर्शन क्रिया
सुदर्शन क्रिया ही लयबद्ध श्र्वासोश्वासची एक प्रक्रिया आहे. जी या कार्यशाळेत शिकवली जाते. सुदर्शन क्रियेचे शास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्ध झालेले अनेक फायदे आहेत. मादक द्रव्य सेवन करणाऱ्यांनी ही क्रिया केल्यास जीवनाचा स्तर उंचावण्यास मदत होते.
पुनरावृत्ती टाळण्यास मदत होते.
पुनरावृत्ती टाळणे हे दररोज मादक द्रव्य घेणाऱ्यांसाठी खूप आव्हानात्मक असते. या कार्यशाळेत आपण काही नैसर्गिक पद्धती शिकतो ज्याने आपल्याला लालसा आणि पुनरावृत्ती नियंत्रित करता येते.
८२ लोकामधून, ६ दिवसात ६५% जन तंबाखू विना राहिले. उर्वरित लोकांनी ५०% – ९०% कमी करण्याची तयारी दर्शविली.
द प्रिन्सिपल्स ऍन्ड प्रैक्टिस ऑफ़ योगा इन हेल्थ केयर
मानसिक आजारांचे परावलंबित्व असणाऱ्या कैद्यांच्या आरोग्यात सुधारणा झाली, त्यांच्या चिंता घटल्या.
एसीन जर्नल ऑफ सायकीयाट्री
तंबाखूच्या सेवनावर नियंत्रण राखण्यास मदत झाली.
डिपार्टमेंट ऑफ ओन्कोलॉजी, आयआरसीएच, न्यु दिल्ली
मादक द्रव्या संदर्भात काही गैरसमज
डॉ नीरज नागाईच, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि हेपटोलॉजिस्ट, फोर्टिस हॉस्पिटल, जयपूर
लाल वाईन हृदयासाठी चांगली असते.
दारू ठराविक प्रमाणात घेणे सुरक्षित आहे.
बियर ही धोकादायक नाहिये.
अति प्रमाणात दारू पिणे ठीक आहे.
आमचे या कार्यशाळेचे सल्लागार मंडळ
डॉ. राजेश धोपेश्वरकर
कारडिओलॉजिस्ट, ई पी(EP) तज्ज्ञ, हार्ट रिधम आणि हार्ट फेल्युअर क्लिनिक, पुणे.
यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (All India Institutes of Medical Sciences ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस संक्षिप्त एम्स (AIIMS), दिल्ली येथून पदव्यूत्तर शिक्षण घेतले आहे, तसेच १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे, डॉ राजेश धोपेश्वरकर हे पुण्यातील सर्वात मोठया ३ कारडिओलॉजिस्ट पैकी एक आहेत. ते नियमितपणे आजच्या जीवनशैलीतील त्रुटी आणि ताण तणाव व्यवस्थापन या विषयांवर व्यवसाय क्षेत्रातील लोकांसाठी सत्र घेत असतात.
डॉ. नीरज नागाईच
ज्येष्ठ सल्लागार, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, फोर्टिस रुग्णालय, जयपूर.
हे एका नामांकित वैद्यकीय जनरल चे संपादक आहेत आणि त्यांचे बरेच संशोधन पत्रे प्रकाशित होत असतात. डॉ नीरज हे वेगवेगळ्या नामांकित संस्थांशी जोडले गेलेले आहेत, ज्यामध्ये इंडियन सोसायटी ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलॉजी देखील आहे.
डॉ. दीपक गांधी
आयुर्वेदिक सल्लागार, निरंजनी चिकित्सालय, पुणे
डॉ. दीपक हे गेल्या आठ वर्षांपासून आयुर्वेद, पंचकर्म, पंचभौतिक चिकित्सा याची सेवा देत आहेत. प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक औषधे, पथ्य आणि जीवनशैली, वंध्यत्व आणि असंसर्गजन्य विकार यांसाठी आयुर्वेदिक उपचार, कर्करोग्यांची जीवनातील गुणवत्ता वाढवणे या विषयांत ते विशेष पारंगत आहेत.
डॉ बेलिंडा वाज
त्वचाशास्त्र सल्लागार, मुंबई
डॉ बेलिंडा यांना ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत आणि त्यांचे बरेच संशोधन प्रबंध प्रकाशित आहेत. जेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्वचेचे विकार उद्भवण्यावर मनाचा खूप मोठा हात आहे तेव्हा त्या आश्चर्य चकित झाल्या. त्या त्वचेचे विकार कमी करण्यासाठी पथ्ये , व्यायाम आणि काही ताण तणाव व्यवस्थापन करण्याच्या पद्धती सांगतात.
डॉ. अंजु धवन
प्राध्यापक, भारतीय ड्रग डिपेंडन्स ट्रीटमेंट सेंटर,ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस संक्षिप्त एम्स (AIIMS), नवी दिल्ली.
या व्यसन मानसशास्त्रात गेली तीस वर्षे काम करीत आहेत आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ञ् समितीनच्या सदस्य आहेत. त्यांनी विविध प्रकाशनांमध्ये, विशेष प्रबंधामध्ये, विख्यात मासिकांमध्ये लिखाण केले आहे. त्या पौगंडा अवस्थेतील व्यसनाधीन लोकांसाठी एम्स (AIIMS) मध्ये उपचार केंद्र चालवतात, ज्यात त्यांची खासियत आहे.
डॉ एकता
सल्लागार, सत्व आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म केंद्र, औरंगाबाद.
यांनी रोगनिदान - विकृती विज्ञान या विषयात महाराष्ट्र विद्यापीठ हेल्थ सायन्स - सुमतिभाई शाह आयुर्वेद महाविद्यालय ( साने गुरुजी रुग्णालय ) पुणे येथे पदाव्यूत्तर शिक्षण घेतले आहे. डॉ एकता या एक आयुष मंत्रालय, भारत सरकार द्वारा प्रमाणित योग शिक्षिका आहेत.त्यांच्या व्यस्त जीवनातून त्या नेहमीच सामाजिक कार्यासाठी आणि समाजाच्या सुधारणेसाठी वेळ काढत असतात.
मला ही कार्यशाळा करायची आहे पण...
ऑनलाईन कार्यशाळा अजून चालू आहे का?
हो, चालू आहे.
या कार्यशाळेचा कालावधी किती आहे? वेळा काय आहेत?
ही कार्यशाळा१५ तासांची आहे. ( ५ दिवस रोज ३ तास ). तुम्ही कार्यशाळेची वेळ तुमच्या सोयीप्रमाणे शोधू शकता.
मला याची भीती वाटते की कुणी मला या कार्यशाळेत बघितलं तर त्यांना कळेल की मी तंबाखू सेवन करतो.
आमच्या गोपनीयता धोरणाने आम्ही सर्व विद्यार्थ्यांची माहिती गुपित ठेवतो. तसेच तुम्ही ऑनलाईन असल्याने आपल्या घरातच असाल, तुम्ही हेड फोन वापरू शकता.
मी एकाजागी खूप वेळ बसू शकत नाही. ध्यानासाठी बसायचा संयम माझ्याकडे नाही.
प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा करताना असे होऊ शकते. पण एकदा सुदर्शन क्रिया आणि ध्यान केले की तुम्हाला खूप वेळ बसायला अजिबात त्रास होणार नाही याची प्रचिती येईल.
माझ्या मादक द्रव्य सेवनाबद्दल सविस्तरपणे दुसऱ्या व्यक्तीला सांगायला मला तितकेसे चांगले वाटत नाही.
काळजी करू नका. आम्ही वचन देतो आम्ही तुमच्या वयक्तिक जीवनात ढवळाढवळ करत नाही , तसेच तुमच्या सवयीचे सांत्वन किंवा विरोध करत नाही. तुम्हाला चांगले वाटणे हे आमच्यासाठी महत्वाचे आहे.
सुदर्शन क्रिया ही प्राणायाम पद्धत केल्याने माझ्या आरोग्यात सुधारणा होईल?
हो. अनेक अभ्यास आणि वैयक्तिक अनुभव असे आहेत की सुदर्शन क्रिया केल्याने अयोग्य आणि एकूणच जीवनशैलीत सुधारणा झाली आहे. मग ती व्यक्ती मादक द्रव्य घेणारी असो किंवा नसो. हे सिद्ध झाले आहे की सुदर्शन क्रिया केल्याने झोप चांगली लागते, ताण तणाव कमी होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि असे बरेच फायदे आहेत. तुमच्या प्रशिक्षकास तुमच्या सध्याच्या आरोग्याच्या स्थिती विषयी सविस्तर माहिती द्या आणि आम्ही तुम्हाला वैयक्तिक आणि सटीक सल्ले देऊन तुमचा अनुभव उंचावू शकू.