वर्तमान क्षणात कसे जगायचे ? | How To Live in Present Moment in Marathi

भूतनाथाला (शिव) प्राप्त करून घ्यायचे असेल तर भूतकाळातील सर्व घटनांना स्वप्न समजावे लागेल. आणि ते काही फारसे कठीण नाही. यासाठी थोडी सजगतेची गरज आहे.

वर्तमान क्षणात जगा ( Live in present moment)

  • वर्तमान क्षणाच्या अस्तित्वाला पूर्णपणे समजून घेणे तेंव्हाच शक्य होईल जेंव्हा भूतकाळातील सर्व घटनांना आपण स्वप्न समजू. घडलेल्या सर्व घटनांना स्वप्न समजून सोडून देऊ तेंव्हा आपण खुल्या मनाने सत्य जाणू शकतो.
  • भूतकाळाच्या आपल्या मनाच्या पगड्यामुळे तर आपले मन हताश, निराश झाले आहे. या भुतापासून पिच्छा सोडवल्याशिवाय भूतनाथ प्राप्त होऊ शकत नाहीत. भूतनाथांना प्राप्त करून घेण्यासाठी गत घटनांना स्वप्न समजले पाहिजे ज्यासाठी थोड्याश्या सजगतेची गरज आहे.

आपण कुत्र्या मांजरांना पाहतो की ते पाण्यातून किंवा मातीतून उठल्यावर आपले अंग झटकून अंगाला चिकटलेले सर्व त्यागून निघून जातात. तसेच समजा की आपण पाण्यात, चिखलात खेळत आहोत. मात्र थोड्या थोड्या वेळाने उभे राहून अंग झटका आणि सजग व्हा. तेव्हा अनुभूती होईल की भगवान शिव ‘आत्ता-येथे, या क्षणात’ आहेत.

जेव्हा हे तुम्ही सातत्याने करत राहाल तेंव्हा सजगता निर्माण होऊन हि अनुभूती गहरी बनेल.

आपले मनोबल जाणा​ ( Power Of Subconscious Mind)

  • खूप वेळा लोक हताश होऊन म्हणतात की, ‘मला कशातच रस येईना झाले आहे.’ कशामध्ये ही मन लागण्यासाठी आपल्या मनामध्ये भरलेल्या इतर विचारांकडे दुर्लक्ष करावे लागते. मनामध्ये भूतकाळातील घटना भरल्यामुळे आपल्याला कशातही रस येत नाही.
  • चांगल्या वा वाईट घटना असोत, मित्र वा शत्रू असोत ते आपल्या मनाला व्यस्त ठेवतात आणि मनाला जड बनवतात. आपल्या मनात त्यांनी असे घर केलेले असते जणू त्यांना आपण आपले मन त्यांना भाड्याने दिलेले आहे. भूतकाळ आपल्या मनात घर करून बसलेला असतो परंतु बदल्यात आपल्याला काहीही प्राप्त होत नाही. या सौद्यात नुकसान च नुकसान आहे.

म्हणून थोड्या थोड्या वेळाने तुम्हाला उभे राहून सांगावे लागेल की, ‘हे माझे घर आहे’. आणि भूतकाळाला बाहेर झटकावे लागेल. नाहीतर भूतकाळाचा पगडा तुमच्या मनावर राहील आणि ते ठणकाऊन सांगत राहतील की तुमचा वेळ ‘तुमचा राहिला नाही’. म्हणून भूतकाळाला तुमच्या मनाला मारून त्याला अस्ताव्यस्त करून दुखी करू नका.

जेंव्हा घडलेल्या घटनांना स्वप्न समजून सोडून देता तेंव्हा खुल्या मनाने वर्तमान क्षणातील सत्य समजू शकता.

म्हणून भूतकाळात चांगले वा वाईट जे काही घडले होते ते एक स्वप्न होते, ही सजगता येते तेंव्हा जीवनातील कोणत्याही प्रसंगाशी सामना करण्याचे बळ येते. तेंव्हा या घटनांमुळे दबून राहिलेल्या आपल्या चेतनेच्या उर्जेचे तरंग आणि विस्ताराची अनुभूती होईल.

भूतकाळ आत्ता राहिलेला नाही. जे आपण बोललोय, जे आपण केलेय ते आत्ता आपण बदलू शकत नाही. परंतु वर्तमानात आपल्याकडे आपले विचार, शब्द आणि कार्याची निवड करण्याची क्षमता आहे. जेंव्हा आपल्याकडे परिवर्तन करण्याची क्षमता आहे तेंव्हा विचार करत काय बसायचे?

तेंव्हा थोड्या थोड्या वेळाने उभे रहा-भूतकाळातील स्वप्नांना झटका. हेच साधनेचे सार आहे.

साधनेचा अर्थ दूर कोठे जंगलात जाऊन बसायचे असा नाही. ‘साधना म्हणजे आपली कर्तव्ये करणे आणि जबाबदाऱ्या पार पाडत असताना यांच्यापासून अलिप्त राहणे आणि वेळोवेळी त्या सर्वोच्च सत्याप्रती जागरूक राहणे.’ यामुळेच आपण आपल्या चेतनेच्या परम सत्याप्रती जागृत करत राहतो.

जेव्हा आपण वेळोवेळी आपल्या चेतनेला जागृत करत राहतो तेंव्हा आपले समस्त जीवन फक्त आपलेच नाहीतर आपल्या आसपासच्या सर्वांसाठी अद्भुत बनते. आसपासच्या लोकांना देखील शांती आणि प्रसन्नता अनुभवास येते. आपल्या आसपास खूप सकारात्मक ऊर्जा आणि चांगल्या लहरी आहेत. आपल्या आंतमध्ये आणि आसपास या सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा हाच मार्ग आहे.

‘आत्ता’ मध्ये स्थापित होणे म्हणजे साधना​

प.पु.श्री श्री रविशंकरजी यांच्या ज्ञानचर्चेतून

श्री राजीव नंबियार द्वारा संकलित