परिपूर्ण संबंध बनवण्याची गुरुकिल्ली
जर आपणास नाव/होडी कशी वल्हवायची हे माहित असेल तर आपण कोणतीही नाव वल्हवू शकतो. परंतु जर आपणास नाव कशी वल्हवायची हेच माहित नसेल तर विविध नाव बदलून काही उपयोगाचे नाही. त्याचप्रमाणे ज्यांच्याशी संबंध जोडायचे आहेत, त्यांनाच बदलून समस्या सुटणार नाहीत. तेंव्हादेखील आपण, दुसऱ्या संबंधात सुद्धा त्याच परिस्थितीत राहणार आहोत, कारण कोणत्याही संबंधात आपण आपल्या भावना, आपले मन, आपली स्वतःमध्ये बदल न करण्याची क्षमता, आणि व्यापक दृष्टीकोनातून गोष्टी पाहण्याची आपली स्वतःची क्षमता आपण स्वतःला समजून घेणे सर्वात महत्वाचे आहे. आणि यासाठी व्यवहार ज्ञान महत्वाचे आहे, कारण हेच व्यवहार ज्ञान आहे जे आपणास सामर्थ्य, स्थैर्य आणि जीवनाबाबत व्यापक दृष्टीकोन देते
बहुतेक वेळा, आपण परिपूर्ण सकस नातेसंबंध इतरत्र शोधतो ; खूपच कमी लोक स्वतःच्या आत डोकावत असतील, जेथे त्यांचे मूळ आहे. दुसऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी, आपणास प्रथम आपल्याशी स्वतःशी कसे संबंध आहेत हे पाहण्याची आवश्यकता आहे. आपण आपल्या आत डोकावणे आवश्यक आहे.
सकस नातेसंबंध कसे असावेत आणि मग त्या दिशेने कसे जावे याबद्दल काही रहस्ये येथे देत आहोत.
दृढ नातेसंबंध निर्माण होण्यासाठी ६ सर्वोत्तम पद्धती
#१ नियंत्रण सोडून द्या
अनेकांना नियंत्रण सोडून देणे अवघड जाते. याचा परिणाम असा की चिंता आणि अस्वस्थता येते आणि त्यामुळे नातेसंबंध बिघडतात.
जागे व्हा आणि बघा, खरंच आपले नियंत्रण आहे कां? आपल्या नियंत्रणात काय आहे? कदाचित आपल्या जागृत अवस्थेचा छोटासा भाग!
- आपण झोपलेले असताना किंवा स्वप्न पाहताना आपले नियंत्रण नसते.
- आपणास येणारे विचार आणि भावनांवर आपले नियंत्रण नसते.
त्याचप्रमाणे, आपल्या आयुष्यातील किंवा जगात घडणाऱ्या सर्व घटनांवर आपले नियंत्रण आहे असे आपणास वाटते का? जेंव्हा आपण या नजरेने गोष्टी पाहता, तेंव्हा आपणास नियंत्रण गमावण्याची भीती बाळगण्याची गरज नाही, कारण आपले काही नाहीच!
#२ आदराची भावना ठेवा
आपण ज्याचा आदर करता, ती आपल्यापेक्षा मोठी होते. आपल्या नातेसंबंधा बद्दल जेंव्हा आपल्या मनात आदर असतो, तेंव्हा आपली स्वतःची चेतना विस्तारत असते. मग, अगदी लहान गोष्टीही महत्त्वाच्या आणि महान जाणवू लागतात. अगदी लहान जीवही आदरार्थी वाटू लागतो. प्रत्येक नात्यातील आदरच त्या नात्याला जोपासत असतो.
बहुदा आपल्या मालकीच्या वस्तूबद्दल आपल्या मनात आदर नसतो तसेच तो आदर गमावणे नकळत घडते. स्वामित्वा बद्दलचा आदर आपणास लोभ, मत्सर आणि वासना यातून मुक्त करतो. जीवनातल्या प्रत्येक क्षणाबद्दल आदर बाळगण्याचे कौशल्य जोपासा.
#३ समान ध्येये ठेवा
जेंव्हा दोन रेषा एकमेकांना समांतर जात राहतात तेंव्हा त्या कायम एकत्र पुढे जाऊ शकतात. परंतु जेंव्हा दोन रेषा एकमेकांच्या दिशेने केंद्रित असतात, तेंव्हा त्या एकमेकांना ओलांडून दूर जातात. नातेसंबंधांच्या बाबतीतही असेच आहे. जेंव्हा दोन्ही जोडीदारांमध्ये जीवनातल्या ध्येयाबद्दल एकवाक्यता असते, तेंव्हा त्यांचे नाते दीर्घकाळ टिकणारे बनते आणि यामुळे दोघांत अधिक चांगला सुसंवाद निर्माण होतो. पण जेंव्हा त्यांचे एकमेकांवरच लक्ष केंद्रित असते, तेंव्हा ते एकमेकांकडे बोट दाखवतात; ते प्रेम आणि द्वेष करतात आणि वादावादी होऊ लागते.
#४ संघर्ष नष्ट करा
जेंव्हा आपण सुसंवादी वातावरणात असतो तेंव्हा आपले मन वाद करण्यासाठी कोणते ना कोणते निमित्त शोधते. अगदी छोटेसे कारण मोठा संघर्ष निर्माण करण्यासाठी पुरेसे असते. याकडे कधी लक्ष गेले आहे कां?
जेंव्हा आपल्या जीवावर बेतलेली असते, तेव्हा आपली तक्रार नसते की आपल्यावर कोणी प्रेम करत नाही. पण जेंव्हा आपण सुरक्षित आणि संरक्षित असतो, तेंव्हा आपण लोकांचे लक्ष वेधून घ्यायला लागतो. अनेक लोक लक्ष वेधून घेण्यासाठी वाद निर्माण करतात. म्हणून हा प्रश्न स्वतःलाच विचारा: आपण हरएक परिस्थितीत सुसंवाद शोधतो कां? की मतभेद वाढवून माझेच बरोबर हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो?
#५ हे जाणून घ्या की आपल्या पात्रतेपेक्षा जास्त प्रेम आपल्याकडे आहे
आपणास सतत वाटले पाहिजे की आपणास मिळणाऱ्या प्रेमासाठी आपण तेवढे पात्र नाहीत. असा विचार करा की आपणास मिळणारे प्रेम हे आपल्या पात्रतेपेक्षा खूप जास्त आहे. ही नम्रतेची भावना आपल्यात असली तर मग आपणास सर्व गोष्टींमध्ये आढळेल आणि त्यांच्याप्रती सन्मानाच्या भावनेने वागाल. आपण भूतकाळात रेंगाळणार नाही, तर वर्तमान क्षणात जगाल, आपण दुसऱ्याच्या मतांचा आदर कराल, आपणास दुसऱ्याच्या अडचणी समजतील; ती विशालता आपल्यात आतून बहरू लागेल.
मी या प्रेमाला पात्र नाही हे जर आपण लक्षात ठेवले तर आपण प्रेमाची मागणी करणार नाही. आणि जेंव्हा आपण आपल्या आयुष्यात प्रेमाची मागणी करत नाही, तेंव्हा ते प्रेम वाढतच राहते.
#६ दुसऱ्याला देण्यासाठी काही वाव असू द्या
नातं म्हणजे तडजोड, आपल्याकडून देण्याची भावना. पण त्याच वेळी, आपल्या जोडीदाराला देण्यासाठी काही जागा सोडा. यासाठी थोडी कुशलता गरजेची आहे – दुसऱ्याने मागणी न करताच आपले योगदान द्यावे यासाठी त्याला प्रेरित करण्याची. आपण मागतच राहिल्यास, नाते दीर्घकाळ टिकणार नाही. मागणी आणि दोषारोप प्रेम नष्ट करतात.