आपण सर्व जाणते अजाणतेपणी काही अशा गोष्टीचे पालनपोषण करतो की ज्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य टिकू शकते किंवा बिघडू शकते. सकारात्मक भावना जीवनाकडे, लोकांकडे वा समस्यांकडे बघण्याचा योग्य दृष्टिकोन देते. नकाकारात्मक धारणा आपल्या आशा आणि स्वसन्मान यांत कमतरता आणते. तसेच अनेक नकारात्मक भावनांचे पोषण करते. इथे अशा काही सामान्य समजुती देत आहोत की ज्या मानसिक आरोग्याकरिता सोडून देणे गरजेचे आहे.
माझे स्वतः बद्दलचे मत, लोकांच्या अभिप्रायावर अवलंबून असते
लोकांचे अभिप्राय बदलत रहातात. इतकेच नव्हे तर आपले स्वतः बाबत चे मत सुद्धा बदलत असते. आपले स्वत:बद्दलचे मत दुसऱ्यांच्या अभिप्रायाशी जोडणे म्हणजे ते सतत बदलणाऱ्या मोसमाशी जोडण्यासारखे होईल. आपण स्वतःच्याच समजुतींमुळे, स्वसन्मानाला नुकसान पोहचवतो. आपल्या यशापयशा वरून आपण आपली किंमत ठरवा . लोक काय म्हणतात यावरून नव्हे. योग्य दृष्टिकोन प्राप्त होण्यास ध्यान करा आणि आपल्या अंतरीक शक्तीच्या स्त्रोताशी संपर्क साधा.
मला नेहमी सुखी रहायचे असते
गुरुदेव श्री श्री रवि शंकर जी म्हणतात, ” ‘नेहमी’ हा शब्द काढून टाकला की आनंद मिळणे शक्य होईल”. खरे असे की सुख आणि दुःख या चंचल भावना असतात. अवास्तव अपेक्षा बाळगल्याने जास्त दुःख होते. सुखासाठी आपण ठरवून घेतलेल्या आपल्या आरामाच्या व्याख्येला / आरामाच्या आपल्या परिघाला धक्का लावायला आपण तयार नसतो. आपण ठरवून घेतलेल्या या आराम कक्षेच्या बाहेरच खरी प्रगती घडते.
मला हवे ते मिळविणे म्हणजे यश
इच्छांची पूर्ती नेहमी होईलच असे नसते. मी खात्रीने सांगू शकतो, आपल्या मनात कोठेतरी असते की आपल्या काही इच्छा पूर्ण झाल्या नाहीत ते बरेच झाले. प्रतिकूल परिस्थितीतही हिम्मत कमी होत नाही, चेहऱ्यावरून स्मित ढळत नाही, ते खरे यशाचे दिवस. खरे धैर्य ज्या दिवशी तोच दिवस यशस्वी समजावा. आपण आत्मविश्वासाने भरलेलो असतो तोच दिवस यशस्वी. जीवनात जे मिळाले त्यात आनंद नसेल तर असे जीवन यशस्वी कसे म्हणावे.
मी परिपूर्ण असायला हवे
परिपूर्ण व्हावे – हा विचारच आपल्यास अपरिपूर्ण करतो. परिपूर्णतावादी दुःखी असतात. त्यांना इतरांमधील परिपूर्णता हाताळण्यास जमत नाही. परिपूर्ण लोक इतरांची अपरिपूर्णता सहन करू शकत नाही. अपूर्णतेत त्यांचा श्वास गुदमरतो. ते क्रोधीत होतात. इतरांच्या चुकांची शिक्षा ते स्वतःलाच क्रोध रूपाने देतात. क्रोध त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण, तणाव, रक्तदाब वाढवितो. राग केल्याने स्थिती बदलत नसते. परिस्थितीला व्यापक दृष्टिकोनातून पहायला हवे व कुशलतेने परिस्थिती हाताळायला पाहिजे असते.
सर्व काही ठरविले तसेच व्हायला हवे
काही उद्दिष्ट असणे व त्या दिशेने कार्य करणे हे चांगले. परंतु याचेही ध्यान ठेवावे की जीवनात भविष्याचे भाकीत करता येत नाही. ध्येयपूर्तीसाठी वाटचाल करताना ठरवलेल्या गोष्टींमध्ये बदल करण्याची तयारी असावी म्हणजे आपल्या भावना संतुलित ठेवण्यात आणि बदल पटकन स्वीकारण्यात मदत होते.. ध्येयपूर्ती साठी जीवनातील इतर महत्वाच्या बाबींमध्ये तडजोड करणे योग्य नाही. इतर पर्यायी योजना जसे ब, क, ड… तयार असणे नेहमीच उपयोगी ठरते. व्यापक दृष्टिकोन ठेवावा. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते याचे भान ठेवावे. प्रयत्न करा परंतु फळा बाबत धैर्यशील राहा.
इच्छा पूर्तीच सुखाचा मार्ग होय
वास्तविकतः प्रत्येक इच्छेचे पर्यवसान निराशेत होते. एखादी इच्छा पूर्ण झाली की मग त्यात रस उरत नाही. मग आपण दुसऱ्या इच्छापूर्ती मागे लागतो. इच्छा पूर्ण झाली नाही की आपण निराश झालेले दिसून येते. म्हणून सुखाचा खरा मार्ग हा की एखाद्या इच्छेत किंवा भौतिक फायद्यात गुंतून राहू नये. आपले जीवन एखाद्या व्यापक उद्दिष्टास समर्पित करावे. किंवा आसपासच्या लोकांच्या सेवेत वेळ घालवावा. तेव्हा असे लक्षात येईल की जीवनात सुखाचा झरा कसा छान वाहू लागला आहे. “लक्षात ठेवा की ती सर्वोच्च शक्ती तुमची काळजी घेत आहे . असा ठाम विश्वास मनात असेल तरच तुम्ही खरे सुखी होऊ शकता.” असे श्री श्री रवि शंकर जी म्हणतात.
मतभेद झाले की समजावे की काही तरी चुकत आहे
जेंव्हा आपण कोणाशी असहमत होतो तेव्हां आपण त्यांना वाईट किंवा चूक असा शिक्का मारतो. परंतु खरे असे आहे की आपण एखाद्या परिस्थिती बाबत त्यांच्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन बाळगत असतो. गुरुदेव म्हणतात, ” वेगवेगळे दृष्टिकोन असतात आणि असायलाच हवे.जेव्हा तुम्ही त्यामागील कल्याण आणि आपलेपणा ओळखता जे वेगवेगळे दृष्टिकोन जीवनास अधिक समृद्ध करतात.” युक्तिवाद कोणताही असो, त्याचे स्वागत करावे. असे केल्याने वातावरणातील ताण कमी होतो. वादविवादाचे पर्यवसान हास्यविनोदातच व्हायला हवे. उदासीनता किंवा निराशेत नको. वाद कसा घालावा व विवादातून कुशलतेने कसे बाहेर पडावे हे बुद्धिमान लोकांना चांगलें ठाऊक असते.
गुरुदेव श्री श्री रवि शंकर यांच्या चर्चावर आधारित