कर्म म्हणजे नक्की काय असते

कर्म हा शब्द आपल्या बोली भाषेत सर्रास वापरला जातो, तरी पण तो बहुतेक वेळेला लोक चुकीच्या अर्थाने घेतात. बरेच लोक कर्माला बंधन किंवा दैव असे समजतात. पण कर्म या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे, “कार्य करणे”.

कार्य हे अव्यक्त सुध्दा असू शकते, जसे की मनातील भावना. कार्य हे आत्ता वर्तमानात घडणारे देखील असू शकते. आत्ता केलेल्या कार्यामुळे भविष्यकाळात काही कार्य करावे लागण्याची शक्यता असते. हे वरील तीनही प्रकारचे कार्य हे कर्माचे घटक आहेत.

जेव्हा आपल्याल्या आतून काही करण्याची इच्छा जागृत होते , तेव्हा त्या इच्छेला किंवा भावनेला कर्म असे म्हणतात. हे एक सूक्ष्म कर्म असते. ( कार्य एका सूक्ष्म स्थितीत असते ). जसे की समजा ज्या क्षणी आपल्या मनात एक बिल्डिंग बांधण्याची इचछा निर्माण होते, त्याच क्षणी कार्य आधीच झालेले असते. उदाहरणार्थ, जेव्हा एखादा वास्तुविशारद घराचा आराखडा तयार करतो, घराचे काम एका अर्थी तेव्हाच चालू झालेले असते.

तसेच स्थूल कर्म हे देखील असते ( भौतिक स्तरावरील कार्य ), जसे की विटा घेऊन येणे, दगड आणि बाकीचे सामान घेऊन येणे आणि घर बांधणे. म्हणूनच सूक्ष्म इचछा किंवा भावना ज्या या भौतिक जगताच्या पलीकडे आहेत यांना पण कर्म म्हणतात आणि या भौतिक जगात आपण केलेले कार्य किंवा काम याला पण कर्म म्हणतात. आणि याही पलीकडे, आपण किंवा कोणीही केलेल्या कार्यामुळे आपल्या मनावर जे छाप पडतात ते सुध्दा आपले कर्म बनतात ज्यातून आपल्याला जावेच लागते.

वर्तमानात आपण जे कार्य करतो त्याचे छाप आपल्या मनावर पडत असतात. हे छाप भविष्यात यासारखे कार्य परत करण्यासाठी कारण ठरू शकतात.

चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट गोष्टी का घडतात

संचित कर्म हे आपण पृथ्वीवर येताना आपल्या बरोबर घेऊन येतो. प्रारब्ध म्हणजे असे कर्म जे वर्तमानात आपल्याला फळे देते आणि आगामी म्हणजे असे कर्म जे आपल्याला भविष्यात फळे देऊ शकते. आपले संचित कर्म हे आपण घालवू शकतो. अध्यात्मिक पद्धतीने, प्रार्थना करून, सेवा करून, आपल्या आसपास च्या लोकांवर आणि निसर्गावर प्रेम करून, ध्यान करून आपले साठलेले कर्म पुसून टाकण्यास मदत होते.

कधीकधी लोक मला विचारतात, चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट गोष्टी का घडतात. तुम्ही आज चांगले आहात पण तुम्हाला हे माहीत नाही की भूतकाळात तुम्ही काय केलय.

गुरुदेव श्री श्री रवी शंकर

प्रारब्ध कर्म जे आत्ता फळे देत आहे ते भोगावेच लागते. जसे की तुम्ही एका वाहनात बसला आहेत जे चालू आहे. जेव्हा आपण मुक्तमार्गावरून जात असतो आणि आपले बाहेर पडण्याचे वळण चुकते, तेव्हा आपल्याला पुढचे बाहेर पडण्याचे वळण घेण्याचा एकमेव पर्याय उरतो. पण आपण महामार्गावरील लेन आपल्याला हव्या तशा बदलू शकतो. कधी जलद लेन तर कधी हळू चालवण्याची लेन पकडू शकतो. म्हणजेच मुक्तमार्गावर आपल्याला स्वातंत्र्य असते पण एका अर्थाने नसते.

आगामी कर्म म्हणजे जे भविष्यात घडू शकते. जर तुम्ही निसर्गाचे नियम आज पाळले नाहीत तर उद्या तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. आपल्याला माहिती आहे की आपण आज जे करतो त्याचा मोबदला आपल्याला भविष्यात मिळतो. कळत किंवा नकळत आपण जे कार्य करतो त्याचे परिणाम आपल्याला भविष्यात भोगावे लागतात. जसे पेरावे तसे उगवते. पण प्रत्येक कर्माला फळ मिळण्यासाठी ठराविक कालावधी लागतो.

कर्म कसे नष्ट करावे?

मुख्यता पाच गोष्टी या जन्मी आपल्याला मिळतात आपल्या संचित कर्मानुसार, म्हणजेच आपल्या पूर्वजन्मात साठलेल्या कर्मानुसार. त्या म्हणजे तुमचा जन्म व जन्म स्थळ, तुमचे पालक ज्यांच्या घरी तुम्ही जन्म घेता, तुमचे शिक्षण व शिक्षणाची दिशा व तुम्ही किती ज्ञान ग्रहण करू शकता, तुमची संपत्ती व संपत्तीचे स्रोत, तुमचा जगण्याचा कालावधी व मरणाचे कारण. या पाच गोष्टी आपल्या संचित कर्मानुसार मिळतात.
आता आपण किती श्रीमंत होऊ शकतो, आपली जीवनाविषयीची प्रगल्भता किती वाढू शकते, आपले लग्न, मुले आणि आपले सामाजिक कार्य – हे सगळे आपल्या प्रारब्ध कर्मात मोडते. आगामी कर्म म्हणजे हे सगळे करण्यासाठी तुम्ही जे कार्य केले, त्याचे परिणाम. तुम्हाला काही अंशी स्वातंत्र्य असते आत्ता कोणते कर्म करायचे आणि कोणते कर्म साचवायचे यावर. पण तुमचे एक नशीब असते, एक ठराविक गोष्ट जी आपल्या समवेत असते ती आपण बदलू शकत नाही.

कोणते कार्य केल्याने त्याचे कर्म लागत नाही

कर्माचे दोन विभाग पडतात : मनामध्ये छाप तयार झाल्याने तयार झालेले कर्म आणि पाच तत्वांपासून म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यांपासून तयार झालेले कर्म. अजून एक प्रकारचे कार्य आहे जे एखाद्याच्या स्वभावामुळे घडत असते, ज्याला आपण रोजच्या भाषेत कार्य म्हणत नाही. कारण ते उत्स्फूर्त पणे घडते. जसे की एखादे लहान मूल पडले तर आपण क्षणाचाही विलंब न करता त्याला उचलतो कारण तो आपला स्वभाव आहे – आपली घडणच अशी आहे की कोणी आपल्याला संकटात दिसले की आपण त्याला मदत करतो.

कर्म हे कायमस्वरूपी नसते, ते सर्व शक्यतांना खुले असते.

गुरुदेव श्री श्री रवी शंकर

जेव्हा आपण आपल्या स्वभावात असतो, तेव्हा आपले कार्य हे देवाच्या कार्यासमान असते. त्यात एक तत्परता असते. जे कार्य आपण तत्परतेने करतो , त्याचे कर्म घडत नाही . कारण ते आपल्या स्वभावामुळे घडते. म्हणूनच वाघ किंवा सिंह जेव्हा शिकार करतात तेव्हा त्याचे कर्म त्यांना लागत नाही, तसेच मांजर उंदराला मारते तेव्हा त्याचे कर्म लागत नाही कारण तो त्यांचा स्वभाव आहे. सगळेच कर्म असते आणि प्रत्येकाला काही ना काही कर्म करावेच लागते.

वरील सर्व कर्मे ही व्यक्तिगत कर्मे आहेत, तसेच कौटुंबिक कर्म, सामाजिक कर्म आणि वेळेचे कर्म ही सुद्धा असतात. जेव्हा एखाद्या विमानाची दुर्घटना घडते, तेव्हा एकाच कर्माचे लोक त्या मध्ये बसलेले असतात. जर एखाद्याचे कर्म वेगळे असेल तर तो त्याच विमानातून सुखरूप बाहेर पडतो. कोणते कर्म कोणते फळ देते हे सखोल पातळीवर समजणे अशक्य आहे.

पण कोणतेही कर्म हे बंदिस्त किंवा पक्के नसते. ते सर्व प्रकारच्या शक्यतांना नेहमी खुले असते.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *