बुद्धीने होणारा संवाद विचार आणि शब्दांद्वारे होतो. हृदयाचा हृदयाशी होणाऱ्या संवादामध्ये भावना असतात. आत्म्याचा आत्म्याशी संवाद म्हणजे शांतता.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
ज्या क्षणी आपण पहिला श्वास घेतो त्याच क्षणी आपण संवाद साधू लागतो. आपले पहिले रडणे हे आपल्या आईला आणि जगाला आपण आलो आहोत हे कळवते. शेवटच्या श्वासापर्यंत आपण सतत संवादात असतो. तथापी चांगला संवाद म्हणजे केवळ शब्दांपेक्षा बरेच काही असते. संवाद ही एक कला आहे आणि प्रभावी संवादाची परिमाणे जे बोलले जाते त्यापेक्षा मोठी आहेत. एकमेकांशी आपुलकीने संवाद साधण्याची क्षमता हे कौशल्य आहे व ते असायलाच हवे. संवेदनशील आणि समजूतदार व्हा.
संवाद हा एक संवाद असतो, तो एकपात्री प्रयोग नाही.
आपण ज्या व्यक्ती किंवा व्यक्तींशी संवाद साधत आहोत त्यांच्या दृष्टिकोनाचा आदर केला पाहिजे. संवाद ही एकाच वेळी संवेदनशील आणि समजूतदार असण्याची कला आहे. काही लोक खूप हळवे असतात, त्यामुळे त्यांची संवेदनशीलता हरवते. त्यांच्या बोलण्यात स्पष्टता नसते आणि ते अव्यक्त असतात.
आपल्या मनाची स्थिती महत्त्वाची आहे. एखाद्यावर रागावून तुम्ही त्याच्यात सुधारणा करू शकत नाही. तुम्ही फक्त तुमची मनःशांती नष्ट करता.
जेव्हा तुम्हाला राग येतो, तेव्हा तुम्ही बरोबर बोलत असलात तरी ते कोणीही ऐकू इच्छित नाही.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
जेव्हा तुम्ही लोकांना भेटता तेव्हा तुम्ही अनेकदा एकमेकांशी संवाद साधता. जेव्हा तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात असता तेव्हा तुम्ही गाणे गुणगुणता आणि हृदयापासून निसर्गाशी संवाद साधता. बऱ्याचदा, जेव्हा तुम्ही लोकांसोबत असता तेव्हा तुम्ही बोलत राहता आणि बडबड करत असता आणि संवाद फक्त तुमच्या डोक्यात असतो. पण जेव्हा तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात असता तेव्हा तुम्ही गुणगुणायला लागता आणि तुमचा संवाद हृदयातून होतो. आणि जेव्हा तुम्ही गुरूंसोबत असता तेव्हा तुम्ही रिक्त होऊन सर्व प्रश्न विसरता. मग आत्म्याद्वारे शांततेत संवाद होतो.
संवादात जागरुकतेचे महत्व
जेव्हा तुम्ही लोकांना भेटता तेव्हा तुम्हाला औपचारिक राहायला आवडते आणि तुम्ही लोकांसोबत क्वचितच गाता (आयोजित केलेले सोडून). तुमचा अहंकार तुम्हाला गाण्यापासून रोखतो. अनेकांना लोकांसोबत गाणे आवडत नाही. जेव्हा तुम्ही लोकांसोबत गाता तेव्हा तुम्ही हृदयाच्या पातळीवर किंवा भावनांच्या पातळीवर उतरता. काहींना फक्त संगीत ऐकणे सोयीचे वाटते. काहींना ते एकटे असतानाच गाणे सोयीचे वाटते. काही लोक इतरांचे लक्ष वेधण्यासाठी किंवा इतरांना मोहित करण्यासाठी गातात. काहींना जेव्हा इतर सर्व गात असतात तेव्हाच सामील व्हायचे असते. हे सर्व गायन अहंकारातून येते. समोरासमोर संवादात, तुम्ही बोलता.
बुद्धीने होणारा संवाद विचार , तुम्ही शब्दांद्वारे बोलता.हृदयापासून हृदयाचे संवादात, तुम्ही गाता.आणि आत्म्यापासून आत्म्यामध्ये होणारा संवाद हा शांततेत होतो.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
अहंकाराचे अडथळे दूर केल्याने संवादातील अंतर कमी होते
भजन म्हणजे सहभाग आपल्या, अस्तित्वाच्या खोल स्तरावरून सहभाग. भजन म्हणजे मनापासून सहभाग. जर तुम्हाला लोकांसोबत गाता येत असेल तर तुमचा अहंकार नष्ट होतो. मुले लोकांसोबत गाऊ शकतात कारण त्यांच्यात अहंकार नसतो. अनोळखी व्यक्तीसोबत गाण्यासाठी तुम्हाला अहंकार मुक्त व्हावे लागते. अहंकार तुम्हाला अनोळखी व्यक्तीसोबत गाऊ देत नाही. बौद्धिक पातळी अहंकारासाठी सुरक्षित आहे; हृदयाची पातळी अहंकार नष्ट करते आणि आत्म्याची पातळी अहंकार विसर्जित करते. संवादातील सर्व अंतर अहंकारामुळे येतात.
प्रभावी संवाद हे एक परिवर्तनशील कौशल्य आहे जे आपले संबंध, वैयक्तिक वाढ आणि एकूणच कल्याण मोठ्या प्रमाणात वाढवू शकते. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी स्थापन केलेले द आर्ट ऑफ लिव्हिंग, अनेक कार्यक्रम आणि शिकवण देते जे संवादाच्या कलेचा अभ्यास आणि या आवश्यक कौशल्यामध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी व्यावहारिक साधने प्रदान करतात.
आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यक्रमाद्वारे जसे की हॅपीनेस प्रोग्राम ज्यामध्ये तुम्ही ‘सुदर्शन क्रिया’ नावाचे अनोखे तंत्र आणि “सहज समाधी ध्यान योग” कार्यक्रम शिकता, ज्यामधून तुम्ही सजगता, भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्याचे आणि तुमचे संबंध अधिक दृढ करण्याचे तंत्र शिकू शकता. हे कार्यक्रम संवादाचा एक समग्र दृष्टीकोन देतात, ज्यात योग, ध्यान आणि श्वासोच्छवासाच्या अभ्यासासारख्या सरावांचा समावेश आहे जे तुम्हाला आंतरिक शांतता शोधण्यात, ऐकण्याचे कौशल्य सुधारण्यात आणि हृदयापासून संवाद साधण्यात मदत करू शकतात.