इच्छाशक्ती वाढवू इच्छिता, मग प्रेमात पडा
आपल्यासाठी जे चांगले आणि योग्य आहे हे आपणास चांगले माहित असते. पण बऱ्याचदा ते करण्यासाठी आपली इच्छाशक्ती कमी पडते.
पण खरंच जर आपल्याजवळ इच्छाशक्ती नसेल तर आपण ‘इच्छाशक्ती कशी वाढवावी’, हे देखील आपण वाचणार नाही. प्रत्येक विचारागणिक आपण कार्यरत असतो हेच आपल्यामध्ये इच्छाशक्ती आहे हे दर्शवते. विचार आपल्या मनात तयार होतात, “उठून मला शेजारच्या खोलीत जायचे आहे,” आणि आपण तसे करतो. हेच इच्छाशक्ती आहे, हे दर्शवते. हे इच्छाशक्ती असल्याशिवाय अशक्य आहे.
आपल्या मनाला लागलेल्या काही सवयी आणि काही मोहामुळे काही गोष्टी आपल्याकडून घडत नाहीत, मग आपणास वाटू लागते की, “माझ्यात ती इच्छाशक्तीच नाही.” पण जेंव्हा जेंव्हा इच्छा आहेत तेथे शक्ती ही आहेच.
जेंव्हा आपण म्हणतो की माझ्यात इच्छाशक्ती नाही तेंव्हा आपण आपले हात बांधून घेत आहोत. आपण आपल्या कपाळावर हे लेबल लावून घेतलेले असते की, ‘मी अशक्त आहे, कमजोर आहे.’
त्यापेक्षा आपल्या मध्ये शौर्य जगवा. प्रतिज्ञा करा. जेंव्हा गरज पडेल तेंव्हा आपल्याला आवश्यक असणारे सामर्थ्य आपल्यातच असते. आपल्याला गरजेचे सामर्थ्य आणि ऊर्जा आपल्यामध्येच आहे.
जर कोणी आपणास सांगितले असते की जर सलग तीस दिवस प्राणायाम कराल, एकही दिवस न चुकता, तर आपणास एक कोटी रुपये मिळतील. आपण अगदी झोप आणि भूक सोडले असते पण प्राणायाम सोडणार नाही. लोभ, लालसा आपल्यामध्ये ती शक्ती निर्माण करते. तसेच भीतीचे आहे. कोणी सांगितले की जर प्राणायाम केले नाही तर आजारी पडाल, तर आपण ते चुकवणार नाही. प्रेम, भीती आणि लोभ या बाबी इच्छाशक्ती वाढण्यास उपयुक्त आहेत.
लाख मोलाचा प्रश्न
समजा, आपणास कोणी सांगितले की जर आपण एक महिना किंवा तीस दिवस धुम्रपान केले नाही तर आपणास एक कोटी रुपये मिळतील. आपण म्हणाल, “तीसच दिवस कां? काही महिने तीस दिवसांचे, तर काही एकतीस दिवसांचे तर फेब्रुवारी तर कमी दिवसांचा असते. मला नक्की पैसे मिळावेत म्हणून मी पस्तीस दिवस धुम्रपान करणार नाही.”
अहंकार किंवा प्रेम, भक्ती किंवा लोभ नसणाऱ्यामध्ये इच्छाशक्ती कमी असते.
– गुरुदेव श्री श्री रविशंकर
आपणास एखाद्या गोष्टीचे महत्व आपल्या सवयीपेक्षा ज्यादा असते आणि आपणास खात्री असते की ती गोष्ट मिळेल तेंव्हा ती सवय सुटते. एड्सच्या भीतीमुळे एड्सची व्याप्ती खूप प्रमाणात घटली. तसेच उच्च ध्येयाच्या प्रतिबध्दतेमुळे अनेक छोट्या छोट्या प्रलोभनांचा त्याग करण्यास मदत होते.
काय योग्य आहे आणि काय करणे गरजेचे आहे, हे बौध्दिकदृष्ट्या जाणण्याने आपणास हे सर्व सोपे होते. मग आपल्या कोशात आरामशीर राहण्याचा देखील आपण निर्णय घेऊ शकता. मग इच्छाशक्तीचा ऱ्हास होतो. अश्यावेळी आपल्या शौर्य तसेच हृदयामध्ये कश्याबध्दल तरी प्रेम जागृत करा. कोणावर तरी निष्ठा, भीती वा लालसा यांच्यामुळे इच्छाशक्ती वृधिंगत होऊ शकते.
अहंकारी व्यक्तींमध्ये शौर्याची भावना असते. त्यांना प्रतिबध्द करणे, आळस त्यागायला लावणे सोपे असते. अहंकार नसणाऱ्या व्यक्तींमध्ये खूप प्रेम आणि समर्पण असते. त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती जागृत करणे सोपे असते. ज्यांच्यामध्ये ना अहंकार आहे ना प्रेम, ना निष्ठा आहे ना लालसा, त्यांच्या मध्ये इच्छाशक्तीचा अभाव असतो.
लोभी बना किंवा भित्रे बना, किंवा आपल्यात प्रेम आणि समर्पण वाढवा. सच्च्या ज्ञानामुळे आपल्यात शौर्य जागृत होऊ शकते.
जेंव्हा आळस वाट पाहू शकतो
आपल्यामध्ये इच्छाशक्ती नाही हे आळसामुळे वाटू लागते. समजा आपण ठरवले की उद्यापासून सकाळी ६ वाजता उठून आपला प्राणायाम करायचा. पण सकाळी स्वतःलाच सांगता की, “ओह, खूप थंडी आहे. मी हे रात्री किंवा उद्या सकाळपासून करीन. ”असे घडते. कारण आपले शरीर थकलेले असते, अपने मन थकलेले असते आणि आपल्या आहारात चुकीच्या गोष्टी असतात. याचमुळे आपण कंटाळलेले असतो, मात्र हे करण्यासाठी आपला बिछाना सोडावा.
मग एक दिवस आपण या कंटाळ्यालाच कंटाळतो, आळशी होण्याचा आळस येतो. कोणी सांगितले की आग लागली आहे, तर आपला कंटाळा नाहीसा झालेला असतो. निकड वा तातडीमुळे आपला आळस नाहीसा होतो. किंवा आपल्या हृदयातील काही अढया निघतात, प्रेम भावना जागृत होते आणि आळस नाहीसा होतो. एखाद्या गोष्टीबाबत वा व्यक्तीबाबत आपण उत्कट होता आणि आपण सजग होतो, ऊर्जावान होतो.
प्रेम, भीती वा लालसेमुळे आपण आळसावर मात करू शकतो. जर यापैकी कशाचा तरी अभाव असेल तर आपण विलंब करतो, दिरंगाई करतो. सतत दिरंगाई करण्याने कालांतराने भीती निर्माण होते. मग या भीतीपोटी तरी आपण कार्यरत होता.
दिरंगाईतून बाहेर पडण्यासाठी प्रेम हा सर्वोत्तम उपाय आहे. समजा आपण आपल्या भावाला किंवा भाचीला विमानतळावर पहाटे घ्यायला येतो असे वचन दिले आहे. सकाळी आपणास आळस आलेला असला तरी आपण उठतो आणि त्यांना घेण्यासाठी पळत सुटतो. कशीतरी आपल्यात ऊर्जा निर्माण होतेच.