तुम्हाला कशामुळे थकवा येतो? तुम्ही थकलेले आहात का? तुम्हाला कशामुळे थकवा आला आहे? तुम्हाला काम करून थकवा आला आहे. तुम्हाला दुकानात जायचा कंटाळा आला आहे. तुम्ही जास्त शारीरिक काम केल्यामुळे थकवा येतो. जर तुम्ही जास्त बोललात तर थकवा येतो. खूप विचार केला तर थकवा येतो. तुम्ही जन्मोजन्मी या थकव्याला (मानसिक, शारीरिक आणि बडबडण्याचा) तोंड देत आहात! तुमच्या कामाचा तुमच्यावर काय परिणाम होतो? दुःख आणि थकवा.
अमक्याचा कंटाळा आला आहे, तमक्याचा कंटाळा आलाय. मुले तुम्हाला थकवतात. तुमचा जोडीदार तुम्हाला थकवतो. तुमचे मित्र तुम्हाला थकवतात. सर्व काही थकवणारे आहे, नाही का? तुम्ही दमला आहात का? जरा विचार करा त्याबद्दल.
थकवा येणे ही चांगली गोष्ट आहे
थकवा ही आनंदाची छाया आहे
रोज थकवा येतो ना? जेव्हा तुम्ही थकता तेव्हा तुम्हाला चांगली झोप येते. तुम्ही थकले नसाल तर तुम्हाला नीट झोपही येत नाही, हे तुम्हाला माहीत आहे का?
जर तुम्ही बाहेर काम करुन थकला नसाल,तर तुम्हाला घरी जावेसे वाटणार नाही. तुम्ही थकला असाल तरच तुम्ही आराम कराल. जगातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला थकवेल. फक्त एक गोष्ट तुम्हाला थकवत नाही. ते म्हणजे प्रेम. प्रेम तुम्हाला थकवत नाही कारण तो शेवट आहे, आसरा आहे. प्रेमाचा थकवा येणे शक्य नाही. खरे तर आनंदाने थकवा येतो! थकवा ही आनंदाची छाया आहे. तुम्हाला मार्गावर आणणारी गोष्ट म्हणजे तुमची आनंद घेण्याची इच्छा. जे तुम्हाला घरी आणते ते म्हणजे प्रेमात असणे.
तीन प्रकारचा थकवा
१. शारीरिक थकवा
तुम्ही व्यायाम करता, थकवा येतो, चांगली झोप लागते. जर तुम्ही चालत असाल, तुम्ही ट्रेडमिलवर चाललात तर तुमची काही उर्जा संपते आणि तुम्ही थकून जाता. जेव्हा तुमचे शरीर खूप थकलेले असते, तेव्हा तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागत राहता आणि खूप तणाव जमा होतो हे तुम्हाला माहीत आहे.
शारीरिक थकवा दूर करण्यासाठी उपाय
चांगल्या विश्रांती घेऊन त्यापासून मुक्त व्हा.
तणावाचे सूत्र वेगळे आहे. करावयाच्या गोष्टी खूप आहेत, वेळ खूप कमी आणि ऊर्जा नाही. एकतर जो दिवसात होत नाही अश्या कामाचा भार कमी करा किंवा तुम्ही वेळ वाढवा. जेव्हा तुम्ही थकलेले असता तेव्हा असे होऊ शकत नाही. तुम्हाला स्वतःला बरे होण्यासाठी जास्त वेळ घ्यायवचा असतो. त्यामुळे तुमची उर्जा पातळी वाढवणे हा एकमेव पर्याय आपल्याकडे शिल्लक आहे.
२. मानसिक थकवा
मानसिक थकवा हा विचार करून करून, आणि जास्त विचार करून करून येतो. तो तुम्हाला थकवतो. हा सर्वात वाईट प्रकारचा थकवा आहे जो तुम्ही आयुष्यात अनुभवू शकता.
तुमच्या मनामुळे तुम्हाला थकवा आलेला आहे.
शारीरिक श्रमापेक्षा तुमचे मन तुम्हाला जास्त थकवते. जर तुम्ही एखादे काम करायला तयार असाल, १५ तास सुद्धा ते तुम्हाला थकवणार नाही पण जर तुमची इच्छा नसेल आणि तुम्हाला चार तासही काम करावे लागले तर त्याने तुम्हाला थकवा येईल.
तुमच्या घरी पार्टी आहे किंवा तुम्ही समारंभासाठी सजावट करत आहात. त्यामुळे तुम्ही खूप उशीरा तास काम केले तरीही थकवा जाणवत नाही. तुम्हाला ते चांगले वाटते. पण तुम्ही तुम्हाला आवडत नसलेल्या ठिकाणी काम करता, तुम्हाला चार वेळा कॉफी किंवा चहाचे ब्रेक घेतले तरीही तुम्हाला ते थकवणारे वाटते!
तुम्हाला विश्रांतीची गरज आहे असा विचार केल्याने तुम्ही अस्वस्थ होता. तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील असा विचार केल्याने तुम्हाला थकवा येतो. आपण कठोर परिश्रम केले आहेत असा विचार केल्याने स्वत: ची दया येते. कोणतेही काम अजिबात करू नका. फक्त बसून विचार करत जा. तुम्ही भयंकर थकून जाल. बऱ्याच लोकांसाठी, थकवा आणि मरगळ विचार करून आणि काळजी करण्याने येतो, काम करून नाही.
तुमच्या धावणाऱ्या मनाला थांबवण्याचे ५ मार्ग
- काहीतरी तुम्हाला मानसिक त्रास देत आहे? काही शारीरिक काम करा!
भरपूर व्यायाम करा, ट्रेडमिलवर चाला आणि कामे करा. यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. मग, तुम्हाला दिसेल की मन कमी सक्रिय आहे कारण तुम्ही त्या क्षणी शारीरिकदृष्ट्या कृतीशील आहात. मग, शरीर थकले की, तुम्ही नीट आराम करू शकाल. - थंड शॉवर घ्या किंवा बर्फावर चला. असे केल्याने तुमचे मन स्थिर होते.
- सूर्यास्त पहा, सूर्योदय पहा किंवा फक्त आकाशाकडे पहा. मन धावायचे थांबेल.
- मोठ्या आवाजात संगीत ऐका.
तुम्हाला माहीत आहे का लोकांना रॉक बँड का आवडतात? हार्ड रॉकचे खूप आवाज असतात आणि त्याचा खूप कलकलाट असतो. पण ते विचार करणे थांबवते. त्यामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळातो. भारतातील मंदिरांमध्ये सर्व प्रकारचे लोक येतात हे त्यांना माहीत आहे. प्रत्येकजण सामील होत नाही. आरतीच्या वेळी ते हे मोठमोठे ढोल ठेऊन प्रचंड आवाज करतात. ड्रम्स, ट्रम्पेट्स बॅरल आणि ते सर्व आवाज तुमचे मन वर्तमान क्षणामध्ये घेऊन येतात. हे काही मिनिटांसाठी विचार थांबवते. तुम्ही तुमच्या विचारांपासून किंवा तुमच्या स्वतःच्या छोट्याशा बंद जगातून बाहेर येता. - ध्यान आणि सुदर्शन क्रिया या सर्वांमध्ये सर्वोत्तम आहेत.
काही मिनिटांच्या ध्यानामुळे तुमचे मन नवीन कामाचा भार स्वीकारण्यासाठी पाटीप्रमाणे कोरे होते.
३. भावनिक थकवा
तुमचा भावनिक थकवा आणखी वाईट आहे. भावनिक थकवा म्हणजे तुम्हाला माहिती आहे, छातीत जळजळ, भीती, चिंता. पण या सगळ्याचा कंटाळा आलाय का? तुम्ही चिंताग्रस्त होऊन थकले आहात का?
भावनिक थकव्यासाठी उपाय
कोणत्याही धर्माच्या कोणत्याही भाषेतील मंत्रोच्चार किंवा अगदी “भजने” ऐकणे, हे खरोखरच तुमच्यासाठी थकवा घालवण्यासाठी उपयुक्त आहे.
समस्या निर्माण करणाऱ्या ३ बाबी
१. इच्छा आणि कृती (सूक्ष्म स्तरावर)
इच्छा, स्वतःची जाणीव आणि कृती हे सर्व एकाच उर्जेचे प्रकटीकरण आहेत जी तुम्ही आहात. या तिघांपैकी एका वेळी केवळ एकाचे वर्चस्व असते.
जेव्हा तुमच्याकडे खूप इच्छा असतात, तेव्हा तुम्हाला स्वतःची जाणीव नसते. जेव्हा इच्छेचे वर्चस्व असते, तेव्हा आत्म-जागरूकता सर्वात कमी असेल आणि म्हणूनच जगभरातील सर्व तत्त्वज्ञ नेहमीच त्याग करण्याचा आणि इच्छा सोडण्याचा सल्ला देतात. जेव्हा इच्छा वर्चस्व गाजवते, तेव्हा त्याची निष्पत्ती तणाव आणि दुःख यात होते. जेव्हा कृतींचे वर्चस्व असते तेव्हा अस्वस्थता आणि रोग यांचा त्रास होतो. जेव्हा जाणीव प्रबळ असते तेव्हा आनंदाची पहाट होते.
परंतु कामामुळे येणारा थकवा, इच्छांमुळे येणाऱ्या थकव्यापेक्षा कमी असतो. जेव्हा तुमची कृती आणि इच्छा प्रामाणिकपणे परमात्म्याकडे किंवा समाजाच्या कल्याणासाठी निर्देशित केल्या जातात, तेव्हा चेतना आपोआप उन्नत होते आणि आत्म-ज्ञान निश्चितपणे प्राप्त होते.
२. शरीर आणि वाणी (उच्च स्तरावर)
तुम्ही तुमच्या शरीराद्वारे अनेक जन्मे काम करत आहात; बोलण्याने, शब्दांनी, मनाने काम करीत आहात. कृतीसाठी ही तीन स्थाने आहेत: शरीर आणि मन आणि या दोघांच्या मध्ये वाणी.
तुम्ही शारीरिकदृष्ट्या काम करत नसाल तर तीच ऊर्जा बोलण्याकरिता वळवली जाते. जे लोक खूप बोलतात, ते कमी काम करतात. जे लोक कोणतेही शारीरिक काम करत नाहीत आणि जास्त बोलत नाहीत, ते मनातून अस्वस्थ असतात. तुमच्या लक्षात येईल, काही लोक खूप शांत असतात. त्यांच्या आत एक ज्वालामुखी आहे. एक सुप्त ज्वालामुखी! जे लोक खूप बोलतात ते अजिबात बोलत नसलेल्या लोकांपेक्षा कमी धोकादायक असतात कारण अबोल लोकांच्या मनात काही ना काही तरी खिचडी शिजत असते.
तुम्ही जास्त आणि अनावश्यक बोलल्यास काय होते हे तुमच्या लक्षात आले आहे का? तुम्हाला मळमळ आणि खूप अस्वस्थ वाटते. हे आपण जाणले आणि अनुभवले हे खूप भाग्याचे आहे. बरेच लोक आयुष्यभर हे करत राहतात आणि त्यांना हे किती भयानक आहे ते समजत देखील नाही. जगात सर्वाधिक दु:ख हे वाणीमुळे असते. लोक गप्प बसले असते तर जगातील नव्वद टक्के समस्या संपल्या असत्या.
वर्षानुवर्षे तुम्ही हे करत आहात – या क्रियांच्या तिन्ही क्षेत्रात फसलेले आहात. ते तुम्हाला कुठेही घेऊन जात नाही. हे तुम्हाला थकवते आणि तुम्हाला खूप थकवा येतो.
३. महत्वाकांक्षा किंवा सुस्ती
तुमच्याकडे महत्वाकांक्षा किंवा आळस असल्यास तुम्ही आराम करू शकत नाही. दोन्हीही चांगली विश्रांती मिळण्याच्या विरुद्ध आहेत. एक आळशी व्यक्ती रात्री या कुशीवरून त्या कुशीवर वळत राहील आणि ‘अस्वस्थ’ होईल आणि महत्वाकांक्षी व्यक्ती आत जळत राहील.
३ ऊर्जा वाढवणाऱ्या ३ गोष्टी
१. गहन विश्रांती
ध्यान करा – सखोल विश्रांती हे साधनेचे सार आहे. सतत काही ना काही करून तुम्हाला थकवा येतो. आता थोडा वेळ बसा आणि स्वतःबरोबर रहा. थोडे ध्यान करा. जेव्हा तुम्ही ध्यान कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या समोर एक नवीन जग दिसू लागेल. ध्यानात तुम्हाला गहन विश्रांती मिळते.
समाधान – जेव्हा तुम्ही समाधानी असता तेव्हा तुम्हाला विश्रांती मिळते आणि ही विश्रांतीच आनंदाला जन्म देते. सुखाच्या मागे धावल्याने थकवा येतो. जेव्हा तुम्ही आनंदाच्या मागे धावता तेव्हा तुम्ही थकून जाता, परंतु जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये विश्रांत होता, जेव्हा तुम्ही आराम करता तेव्हा तुम्हाला ऊर्जा मिळते आणि त्यामुळे तुम्हाला शक्ती, हर्ष आणि आनंद मिळतो. पुनः पुन्हा, समाधानी व्हा.
फक्त असा – जेव्हा तुम्हाला असे काही करावे लागते जे तुम्ही करू शकत नाही तेव्हा तुम्ही आराम करू शकत नाही. आणि जेव्हा तुम्हाला असे वाटते की जे तुम्ही नाही ते तुम्ही असले पाहिजे तेव्हा तुम्ही विश्रांती घेऊ शकत नाही. आपण जे करू शकत नाही ते करणे आवश्यक नाही. तुम्ही जे देऊ शकत नाही ते देण्यास तुम्हाला सांगितले जाणार नाही. तुमच्याकडून अशी कोणतीही गोष्ट अपेक्षित नाही जी तुम्ही करू शकत नाही. आणि तुम्ही नसलेले असे कोणी व्हावे असे कोणालाही वाटत नाही. ही जाणीव तुम्हाला खोल विश्रांती देते.
सोडून द्या – विश्रांतीची एक जागा आहे. ती आहे परमात्मा, ती आहे शरणागती आणि ती आहे प्रेम. आणि जोपर्यंत तुम्ही थकव्यामुळे दमून जात नाही तोपर्यंत तुम्ही ते करू शकत नाही. जोपर्यंत तुम्हाला खरोखरीचा थकवा येत नाही. जेव्हा तुम्हाला सगळ्याचा उबग येतो, तुम्ही सगळे सोडून देता. त्याला शरणागती म्हणतात.
परमात्मा तुमच्या पाठीशी आहे ही छोटीशी भावना देखील खोल विश्रांती देते. आणि प्रार्थना, प्रेम आणि ध्यान हे सर्व खोल विश्रांतीचे स्वाद आहेत.
२. श्वासावर लक्ष केंद्रित करा
तुमचा श्वास तुमच्या भावनांशी जोडलेला असतो. तुमच्या प्रत्येक भावनेत श्वासाची एक विशिष्ट लय असते. पण आपण क्वचितच आपल्या श्वासाकडे लक्ष देतो. आपल्या भावना, आपल्याला कसे वाटते आणि आपल्या श्वासोच्छवासाच्या पद्धतींमध्ये एक दुवा आहे. आपल्या डोक्यातील प्रत्येक विचार, प्रत्येक काळजी, आपल्या श्वासात एक निश्चित लय असते हे आपण ओळखत नाही. त्यामुळे, जर तुम्ही श्वासाची पद्धत बदलली तर तुमच्या चिंताही थांबतील. हे रहस्य तुम्हाला माहीत आहे का?
हे एक रहस्य आहे परंतु ते सर्वांना नक्की वाटून टाका. तुमच्या चिंता तुमच्या श्वासाशी निगडीत आहेत. आपण कधीकधी भावना किंवा विचारांपासून प्रत्यक्षपणे मुक्त होऊ शकत नाही. परंतु आपण ते आपल्या श्वासाद्वारे करू शकतो. तुम्ही नाटक किंवा अभिनय शिकत असाल, तर ते तुम्हाला वेगळ्या पद्धतीने श्वास घेण्यास सांगतील. जेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या भावना व्यक्त करायच्या असतात, तुम्हाला राग दाखवायचा असेल, तर तुम्हाला वेगाने श्वास घ्यावा लागतो. तरच राग व्यक्त करता येतो. म्हणून, जेव्हा तुम्हाला शांत वाटते तेव्हा श्वास मंद आणि तलम असतो. तुम्हाला बाहेर पडणारा श्वास अजिबात जाणवत नाही. जेव्हा तुम्ही निराश असता, तुमचा बाहेर जाणारा श्वास जोरात असतो आणि तुम्ही दीर्घ श्वास कधी घेतला हे तुम्हाला कळतही नाही. आता काही “प्राणायाम” करून तुम्ही हे उलट करू शकता. तुम्ही हे बदलू शकता.
सुदर्शन क्रिया हा तुमच्या बंधनातून बाहेर पडण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. याची पूर्वसूचना म्हणून काही सोप्या श्वासोच्छवासाचे व्यायाम करून पहा: स्ट्रॉ प्राणायाम आणि भस्त्रिका.
३. प्राणशक्ती वाढवा
प्राण ही जीवनउर्जा किंवा जीवनशक्ती आहे. जेव्हा प्राण कमी होतो तेव्हा तुम्हाला उदास वाटते. जेव्हा प्राण सामान्य असतो तेव्हा तुम्हाला सामान्य वाटते. जेव्हा प्राण जास्त असतो तेव्हा तुम्हाला उत्साही वाटते. जेव्हा प्राण खूप जास्त असतो, तेव्हा तुम्हाला उत्साही आणि आनंदी वाटते. जीवनात सर्व काही समोर येते जेव्हा प्राण मध्यवर्ती वाहिनीमध्ये निर्दोषपणे वाहत असतो जो योग दरम्यान, ध्यानादरम्यान सक्रिय होतो. प्राणायामासह थोडे निर्विषीकरण / ताजे फळ किंवा ज्यूस यांचा आहार जादू करेल.
आपण काय शिकलो
मनाला वर्तमान क्षणात जगण्यासाठी प्रशिक्षित करा. तुम्ही विनाकारण सहन करत असलेला ताण सोडा. आपले स्मित संपूर्ण जगासाठी उपयुक्त आहे आणि बरेच काही! कोणतेही काम तणावाचे नसते. तुमचे शरीर, मन आणि भावना व्यवस्थापित करण्यात तुमच्या असमर्थतेमुळे ते तणावपूर्ण बनते. तुम्हाला तणाव आणि चिंता ठेवण्याची गरज नाही.
तुम्ही प्रेरणा हरवून बसणे हे तुम्ही थकला आहात आणि तुम्हाला तंदुरुस्त होण्याची गरज आहे याचे लक्षण आहे. म्हणून प्रत्येक वेळी पराकोटीची स्पर्धा थांबवा, स्वतःबरोबर राहण्यासाठी थोडा वेळ काढा आणि थोडी विश्रांती घ्या. हेच ज्ञान आहे आणि हेच अध्यात्म आहे. खरी साधना म्हणजे शांत, समाधानी आणि विश्रांत असणे. तसेच एक, दोन किंवा तीन दिवसांची विश्रांती घ्या. काही मौन, ध्यान, योगासने, प्राणायाम आणि द्रवरूप आहार यांचा खूप फायदा होईल.
श्वासावर लक्ष केंद्रित करा. अधिक शक्ती आणि ऊर्जेसाठी सर्वात गतिशील प्राणायाम – सुदर्शन क्रिया शिका.