मनातील विचार प्रत्यक्षात येतात. जर आपणास ते आपल्या मनात दिसले
तर ते आपल्या समोर साकार होईल

– बॉब प्रॉक्टर

आकर्षणाचा नियम आणि अध्यात्म यांच्यातील संबंध समजून घेण्याआधी, आपण त्यांचा अर्थ जाणून घेऊया.

आकर्षणाचा नियम हे एक शक्तिशाली तत्वज्ञान आहे जे असे सांगते की आपण जे विचार आपल्या डोळ्यासमोर आणतो, त्यांना आपण आकर्षित करतो आणि प्राप्त करतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे, जर आपण सकारात्मक विचार केला तर आपणास सकारात्मक अनुभव मिळेल आणि नकारात्मक विचार केला तर नकारात्मक अनुभव मिळेल. जवळजवळ सर्वच गोष्टींची काळजी करणारे लोक जर आपण पाहिले असतील, तर आपणास ते कधीही निवांत पहायला मिळणार नाहीत, कारण त्यांच्या चिंता बहुतेक वेळा वास्तवात बदलत असतात. कारण ते नकारात्मक उर्जेला उत्तेजन देत राहतात. जे लोक सकारात्मक असतात आणि सरळ सरळ आव्हाने स्वीकारतात, ते त्या आव्हानांवर मात करण्यासाठी काहीतरी मार्ग शोधतात आणि सकारात्मकता दर्शवितात.

तर दुसरीकडे, अध्यात्म परमोच्च शक्तीशी जोडले जाणे आणि भौतिक गोष्टींपेक्षा महत्वाच्या गोष्टीत शांती आणि समाधान शोधणे हे सूचित करते. माइंडफुलनेस हे अध्यात्म जोपासण्याचे एक तंत्र आहे; ते मनाच्या वर्तमान स्थितीवर लक्ष केंद्रित करते आणि सजगता वाढवते. आपले विचार आणि भावना याबद्दल कसलेही मत न बनवता त्याबद्दल सजग होत भावनिक आरोग्य वृध्दींगत करणे अध्यात्मामुळे शक्य होते.

तपशीलवार समजून घेऊया

आकर्षणाचा नियम किती प्रभावी आहे

आकर्षणाचा नियम आपण त्याबद्दल सजग नसतानाही काम करतो. आपल्या मनाची प्रवृत्ती त्याला काय हवंय हा विचार करण्याची असते आणि वैश्विक शक्ती ते घडवायला जवळ आणते. दुर्दैवाने आपल्यापैकी बरेच जण आपल्या जीवनात नकारात्मकतेला अधिक महत्त्व देतात. आणि त्यामुळे आपल्या वाट्याला अधिक तणाव, चिंता आणि दुःख येते. पण ज्या लोकांना हा नियम कसा वापरायचा हे माहित आहे, ते आपल्याकडे यश, आनंद आणि चांगले आरोग्य आकर्षित करून घेतात.

मग हा नियम केवळ सकारात्मक विचारांना जोपासण्यासाठी आहे कां ?

पहा, जर आपणास वाटत असेल की फक्त सकारात्मक विचार करणे पुरेसे आहे, तर त्यासाठी हा नियम नाही. आपण आपल्या सकारात्मक हेतूवर विचार करणे आणि त्यावर कार्य करणे हे आकर्षणाच्या नियमासाठी गरजेचे आहे, आणि तेंव्हाच सकारात्मक गोष्टी आपल्या जीवनाकडे आकर्षित होतील. आळशीपणा आपल्या आयुष्यात कधीही आदर्श परिस्थिती निर्माण करू शकत नाही.

नियमाची तत्त्वे

या नियमाचे मार्गदर्शन करणारी दोन महत्त्वाची तत्त्वे आहेत.

  • जसा विचार, तसेच घडेल

आधीच नमूद केल्याप्रमाणे, हे तत्त्व सांगते की जर आपण चांगली स्पंदने प्रकट केली तर आपणास सकारात्मक परिणाम मिळेल तसेच या उलट. उदाहरणार्थ, जे लोक निरोगी राहण्याचे ध्येय ठेवतात, ते तंदुरुस्त होण्याची कल्पना करतात. ते प्रत्यक्ष कृतीतही तेच करतात आणि आरोग्यदायी आहाराच्या आणि नियमित शारीरिक व्यायाम करण्याच्या सवयींचे पालन करतात आणि अखेरीस निरोगी राहण्याचे त्यांचे ध्येय गाठले जाते. 

  • वर्तमान क्षण हा एक आशीर्वाद आहे

आकर्षणाचा नियम सूचित करतो की आपण अति विचार करणे थांबवायला हवे आणि वर्तमानावर लक्ष केंद्रित करावे. त्या क्षणाला घाबरण्याऐवजी त्या क्षणावर विश्वास ठेवा आणि आपला आनंद निर्माण करा. कोणतीही वेळ किंवा परिस्थिती नेहमीच चुकीची नसते, पण आपण त्यावर कसे वागतो, त्यामुळे फरक पडतो.

नियम आचरणात आणणे

जर आपणास जीवनातील सर्वोत्तम गोष्टींची खूप इच्छा असेल, तर आपणास मोठ्या आवाजात आणि स्पष्टपणे विश्वाला तसा संदेश पाठवावा लागतो. जेंव्हा आपण तो संदेश पुढे आणतो आणि त्यावर विश्वास ठेवतो, तेंव्हा आकर्षणाचा नियम आपणास हवे ते मिळेल याची खात्री देतो. आकर्षणाचा नियम लागू करण्यासाठी आपण काय पावले उचलू शकतो ते येथे देत आहोत.

  • यशाची कल्पना करा

आपल्या कर्तृत्वाचे दृश्य आपल्या मनात रंगवणे हे आपणास कृती राखण्यास आणि आपल्या ध्येयाची जाणीव करण्यास प्रवृत्त करते. आपणास आपल्या अवचेतन मनाशी होकारार्थी बोलावे लागेल आणि आपणास नेमके काय हवे आहे ते आकर्षित करून घेण्यासाठी त्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. यामध्ये दररोज आपली अल्प आणि दीर्घकालीन उद्दिष्टे, कृती योजना यांचा वेध घेणे आणि त्या यशाची कल्पना करणे याचा समावेश असलाच पाहिजे.

  • नकारात्मक विचारांबाबत कठोर होऊ नका

जेंव्हा आपण एखाद्या गोष्टीबाबत अत्यंत कठोर असतो तेंव्हा त्यावर मात करणे कठीण जाते. नकारात्मक विचार थांबवू असे स्वत:लाच सांगणे उपयोगाचे होणार नाही. त्याऐवजी, त्या प्रवाहासोबत जा आणि कारण समजून घ्या. उदाहरणार्थ: जर आपण परीक्षेत सातत्याने नापास होत असू, परंतु यावेळी आपण चांगली तयारी केली असेल, तरीही आपणास अपयशाचे नकारात्मक विचार येत राहतील आणि स्वतःच्या विश्वासार्हतेवर शंका येईल. तथापि, जर आपण आपल्या नकारात्मक विचारांना पूर्णपणे रोखण्याऐवजी आपल्या होकारात्मक मनाने आणि तयारीने त्या विचारांची कारणे शोधली तर आपण त्या प्रवाहासोबत जात आहात. हे माइंडफुलनेसच्या तंत्रांपैकी एक आहे.

  • कृतज्ञतेचा सराव करा

आपले जीवन हेच सर्वात मोठे वरदान आहे. जेंव्हा आपण सजग असतो आणि आपणास मिळालेल्या आशीर्वादांची मोजदाद करतो तेंव्हा आकर्षणाचा नियम कृतीत येऊ लागतो. कारण तेंव्हा आपण आपल्या जीवनाला गृहीत धरत नसतो. आयुष्यात मिळालेले धडे, आपल्या आयुष्यातले सखे सोबती, आपल्या जीवन प्रवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सराव करा.

वरील सूचना आपणास अधिक संयोजित आणि सकारात्मक दृष्टीकोन देतात. त्या आपणास आपल्या जीवनातील उणिवा ओळखण्यासाठी तयार करतात आणि आपणास काम करण्यास प्रोत्साहित करतात आणि नकारात्मक गोष्टींचे सकारात्मकतेत रूपांतर करतात.

आपण कोणावर दोषारोप केल्यास, दोष आपल्याकडे परत येईल. प्रशंसा केल्यास, ती अनेक पटीने आपल्याकडे परत येताना दिसेल. हा आकर्षणाचा नियम आहे: आपण जे काही देतो ते आपल्याकडे परत येते.

– गुरुदेव श्री श्री रवि शंकर

अध्यात्माशी संबंध

अध्यात्म आपल्याकडे परमोच्च शक्तीवर विश्वास ठेवायला लावते, आपल्या अंतःस्फुरणाचे घटक एकत्रित करते आणि त्यांना बाह्य घटकांशी जोडते. अध्यात्माची संकल्पना भौतिक शरीरापेक्षा चेतना किंवा आत्म्याला उच्च स्थानावर ठेवते. हे आपल्याला कोणतीही अपेक्षा न ठेवता जीवन जगण्यास आणि आतला आनंद शोधण्यास शिकवते. अध्यात्माचा अनुभव घेण्यासाठी लोकांचे स्वतःचे वेगळे मार्ग आहेत. काहींना ते त्यांच्या दैनंदिन कामात सापडते, काहींना ते पूजेत सापडते आणि काहींना ते ज्ञानातून अनुभवता येते.

प्रत्येकजण चेतनेपासून बनलेला आहे. आपल्यातील ती चेतना आहे जी बोलते, जी समजून घेते, जी अनुभवते आणि संवाद साधत असते, इत्यादि. सर्व काही चेतनेद्वारे केले जाते. याचा सन्मान करणे म्हणजे अध्यात्म होय

– गुरुदेव श्री श्री रवि शंकर

अध्यात्मापासून आकर्षणाच्या नियमापर्यंत आपण ठिपके कसे जोडू शकतो ते येथे पाहू या.

  1. आकर्षणाचा नियम, जाणीवपूर्वक विश्वाला सकारात्मक संदेश पाठवा आणि सकारात्मक परिणाम प्राप्त करा असा आग्रह धरतो. अध्यात्म देखील भावनिक आरोग्य तसेच आशावादाने पुढे जाण्यावर विश्वास ठेवते. म्हणून, दोन्ही संकल्पना (आकर्षणाचा नियम आणि अध्यात्म) जीवनाप्रति सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यावर भर देतात.
  2. आकर्षणाचा नियम हे दर्शवतो की आपण ज्या प्रकारची उर्जा भोवताली प्रसारित करतो, ती आपल्या जीवनातल्या रोजच्या घडामोडीत प्रतिबिंबित होत असते. ज्यांना आपण ओढ लावतो आणि जे जवळपास आपल्यासारखेच असतात, तेच आपले नाते संबंधी आणि मित्र परिवार असतात. अध्यात्म सजगतेद्वारे आपली विचार प्रक्रिया सुधारते तसेच आपल्याला अध्यात्मावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जवळ आणते. म्हणूनच आपण अनेक लोक अध्यात्मिक समुह आणि त्यांच्या कार्याकडे (जे आपल्याला आत्म्याशी जोडते) आकर्षित होताना पहातो.
  3. आकर्षणाचे नियम आणि अध्यात्म हे दोन्ही सजगता, निरामय आरोग्य आणि ध्यान यांचे महत्त्व सांगतात. आपण जसे आपल्या विवेकावर आणि आत्म्यावर लक्ष केंद्रित कराल, लगेच आपल्या जीवनामध्ये विपुलता जाणवू लागेल. त्यानंतर आपण आपले विचार सकारात्मकपणे वळवू शकतो आणि आपला वर्तमान जसा आहे तसा आनंदाने स्वीकारू शकतो.
  4. आकर्षणाचे नियम आणि अध्यात्म हे दोन्ही आपल्याला असे तंत्र देतात, ज्या योगे आपला ताण आणि चिंता चांगल्या प्रकारे दूर होण्यास मदत लाभते.आपण कसलाही पूर्वग्रह न ठेवता आपल्या परिस्थितीचे आकलन करतो आणि त्याचे निराकरण करण्यासाठी प्रभावीपणे उपाय शोधतो.
  5. आकर्षणाचे नियम आणि अध्यात्म हे दोन्ही जीवनातील नकारात्मक पैलू कमी करत केवळ चांगल्या गोष्टी घडतील यावर विश्वास ठेवण्याचे समर्थन करतात. हे आपणास आपल्या परिस्थितीमध्ये सकारात्मक उर्जेद्वारे परिवर्तन करण्यास सक्षम करते आणि सकारात्मक परिणामांकडे नेते.

एकाच नाण्याच्या दोन बाजू

आकर्षणाचा नियम गोष्ट प्रत्यक्ष घडण्याची ग्वाही देणारा आहे, तर अध्यात्म त्याच कल्पनेला वेगळ्या नजरेतून प्रतिध्वनित करते. दोन्ही प्रकारे, आपण नवे वास्तव दृश्यमान करू शकतो, अधिक जोखीम घेऊ शकतो आणि आपले ध्येय पूर्ण करू शकतो. हे सर्व निराशा, तणाव आणि चिंता यांचा कसलाही बाऊ न करता घडते. आपण अधिक उत्साही, केंद्रित आणि दृढ निश्चय झालेले जाणवेल. 

आकर्षणाचे नियम आणि अध्यात्म या दोन्हींना जर व्यापक दृष्टीकोनातून पाहिले नाही तर त्यात अडथळे येतात. जेथे एक तर आपण आपल्या जीवनातील नकारात्मक परिणामांसाठी (ज्यावर आपले नियंत्रण नसते) स्वतःलाच दोषी ठरवू पाहू ते आपणास इतरांच्या मार्ग आणि दृष्टिकोनांकडे साफ दुर्लक्ष करत कट्टरता आणि एकांतात ढकलेल. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक व्यक्ती आपल्यासारखीच आहे, जीवनाचा उद्देश शोधते आहे आणि स्वत:च्या पद्धतीने ते ठिपके जोडते आहे. जेवढे आपण आत्मपरीक्षण करू आणि सर्वांसाठी सहानुभूती आणि काळजीची भावना ठेऊ, तेवढे आपण अधिक ज्ञानी होऊ.

जे ज्ञान प्रेम आणि विवेकाला जोडते, जे आत्म्याला उन्नत करते ते अध्यात्म होय. जे ज्ञान आपणास व्यापक दृष्टी आणि विशाल अंतःकरण देते ते अध्यात्म होय.

गुरुदेव श्री श्री रवि शंकर

जर तुम्ही आपण जीवनातील सकारात्मकते कडे पाहण्यास आणि आपल्या भावनिक आरोग्याची काळजी घेण्यास इच्छुक असाल, तर आमच्या वेलनेस प्रोग्रॅममध्ये सामील व्हा आणि स्वतःच बदल अनुभवा.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *