तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम वाटते आणि ते ते स्वीकारत नाहीत. तेव्हा तुम्ही काय करता?
- निराश होता.
- प्रेमाचे द्वेषात रुपांतर करता आणि बदला घेण्याची ईच्छा करता.
- पुन्हा पुन्हा, त्यांना आठवण करून देता की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता आणि ते तुमच्यावर किती कमी प्रेम करतात.
- विक्षिप्त होता किंवा चिडचिड करता.
- रागरंग दाखविता.
- अपमानित अनुभव करता आणि आपल्या सन्मानाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करता.
- पुन्हा कधीही प्रेम न करण्याचा संकल्प करता.
- दुखावले गेल्याचा आणि वाईट वागणूक मिळाल्याची भावना अनुभवता.
- अलिप्त आणि उदासीन राहण्याचा प्रयत्न करता.
पण तुम्ही पाहिले असेल की यापैकी काहीही काम करत नाही; ते फक्त परिस्थिती बिघडवतात. यातून मार्ग काय? तुम्ही तुमचे प्रेम कसे टिकवाल?
- धीर धरा आणि तुमची प्रेमाची अभिव्यक्ती बदला.
- केंद्रित व्हा आणि तुमच्या प्रेमाची अभिव्यक्ती मर्यादित करा. कधीकधी, प्रेमाची अति-अभिव्यक्ती लोकांना दूर ठेवते.
- तेही तुमच्यावर प्रेम करतात हे गृहीत धरा आणि त्यांच्या अभिव्यक्तीची शैली स्वीकारा. जसे तीन मुलाचे वागणे काहीही असो, एक मुलगा बोलतो, दुसरा बोलत नाही आणि तिसरा रागरंग दाखवतो – आईचे प्रेम प्रत्येक मुलावर सारखेच असते त्यांचे वागणे कसेही असले तरी.
- त्यांचे तुमच्यावर जे काही प्रेम आहे ते मनापासून मान्य करा. त्यामूळे तुमची मागणी कृतज्ञतेमध्ये बदला. जीवनात तुम्ही जितके कृतज्ञ असाल, तितके प्रेम तुमच्या मार्गावर येईल.
- दुखापत प्रेमाचा भाग आहे हे जाणून घ्या आणि त्याची जबाबदारी घ्या. जेव्हा तुम्ही तुमच्या केंद्रापासून दूर जाता, तुम्हाला नक्कीच दुखापत होईल. आणि संसाराचे स्वरूप दुःख आहे.