मैत्रीची सर्वोत्तम चाचणी
“जेव्हा तुम्ही एखाद्या मित्राकडे आपली समस्या घेऊन जाता आणि तिथून परत येताना जर तुम्हाला हलके फुलके वाटत असेल तर तो एक चांगला मित्र आहे असे समजा.”
तुम्ही तुमच्या मित्रासमवेत काही वेळ घालवल्यानंतर, त्याला सोडून निघताना तुम्हाला चैतन्यमय वाटत असेल तर हे एका चांगल्या मित्राचे लक्षण आहे. नंतर तुम्हाला तुमच्या समस्या अगदी क्षुल्लक वाटू लागल्या की समजा तो एक चांगला मित्र आहे. समजा, तुम्ही कोणाजवळ जाऊन त्याच्याशी अर्धा तास बोललात, त्याला तुमची समस्या सांगितली आणि तिथून बाहेर आल्यावर तुम्हाला मनातून जड वाटत असेल आणि तुमची समस्या तुम्हाला आधी वाटत होती त्यापेक्षा खूप मोठी झाली आहे, असे वाटत असेल तर तो चांगला मित्र नाही!
खरा मित्र तोच असतो ज्याच्या सहवासात आपली उन्नती होते;
~ गुरुदेव श्री श्री रवि शंकर
वाईट मित्र तो असतो ज्याचा सहवास आपल्या चेतनेला खाली आणतो.
चांगल्या मित्राचे चार गुण
१. मी तुझ्यासाठीच येथे आहे !
मित्रांकडून कशाचीही मागणी न करणे, आणि त्यांना हे सांगणे की मी तुम्हाला आधार देण्यासाठी येथे आहे, हीच गुरुकिल्ली आहे. फक्त एका गोष्टीवर विश्वास ठेवा: तुम्हाला ज्याची गरज आहे ते तुम्हाला मिळेल. देणारा दुसरा कोणीतरी वेगळा आहे, म्हणून प्रेमाची मागणी करु नका. जेव्हा तुम्ही प्रेमाची मागणी करता तेव्हा तुम्ही प्रेम नष्ट करता. त्यामुळे तुम्ही कधीही लोकांकडून प्रेम मागू नये किंवा लोकांकडून लक्ष वेधून घेऊ नये. जर तुम्ही प्रेम आणि लक्ष आपल्या कडून दुसऱ्याला देण्यासाठी तिथे असाल, तर कोणालाही तुमच्याबरोबर राहून सुखाचे वाटेल. परंतु जर तुम्ही काही अपेक्षा करत असाल तर लोक तुमच्यामुळे अतिशय अस्वस्थ होत राहतील.
तुम्ही प्रत्येकाला हे सांगू शकत नाही, परंतु हे समजणारे हुशार लोक त्यांचा मार्ग काढू शकतात. तुमच्या मित्रांना सांगा, ‘मी तुमच्यासाठी आहे, मला तुमच्याकडून मैत्रीशिवाय दुसरे काहीही नको आहे’.यामुळे तुमची मैत्री दीर्घकाळ टिकेल. तुमची अशी भावना असली तर तुमचे मित्र तुम्हाला मदत करणार नाहीत असे तुम्हाला वाटते का? नक्कीच नाही! जेव्हा तुम्हाला मदतीची आवश्यकता असेल तेव्हा ते तुम्हाला मदत करतील. तुमच्या मदतीला एक नाही तर दहा मित्र धावून येतील.
२. शांत व कनवाळू असणे
जेव्हा तुम्ही मित्रांसाठी काही चांगले करता तेव्हा त्याबद्दल बोलू नका. ते सारखे काढू नका, त्या गोष्टीची आठवण करुन देऊ नका. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला मदत करते आणि त्याबद्दल सतत सांगत राहते तेव्हा तुम्हाला कसे वाटते? तुम्हाला बेचैन झाल्यासारखे वाटते, नाही का? तुम्हाला त्यांच्यापासून दूर जावेसे वाटेल. कोणीही उपकाराच्या बंधनात राहू इच्छित नाही, म्हणून लोकांना त्यांच्यावर उपकार झाले असे वाटू देऊ नका. लोकांना गौण वाटू देऊ नका. समजा तुम्ही एखाद्यासाठी खूप चांगले केले असेल, तर कधी कधी त्याच्याकडे छोटीशी मदत मागा, तुम्हाला रेल्वे स्टेशन किंवा विमानतळावर पोहचवण्यासारखी छोटीशी मदत. अशा काही छोट्या गोष्टी, ज्यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीचाही स्वाभिमान जपता.
असे लोक आहेत जे पुष्कळ परोपकार करतात परंतु ते समोरच्या व्यक्तीचा स्वाभिमानही दुखावतात, असे करणे चांगले नाही. एक गृहस्थ माझ्याकडे आले आणि म्हणाले, “मी कोणाकडून एक पैसाही घेतला नाही, मी माझ्या सर्व भावांना आणि मित्रांना फक्त दिलेच आहे. मी खूप काही केले आहे पण सर्वानी माझी साथ सोडली आहे, कोणीही मला भेटत नाही, कोणीही माझ्याशी बोलू इच्छित नाही.” हा फार विचित्र अनुभव विचित्र आहे, मला कधीही कोणाकडून काहीही नको होते! ” मी त्याला विचारले, “तुम्ही कधी त्यांना तुमच्यासाठी काही करायला सांगितले आहे का?” त्यांनी उत्तर दिले, “कधीही नाही, आणि मी ठामपणे सांगितले की मला कोणाकडून काहीही नको आहे!”. काय झालं? त्या गृहस्थांनी लोकांचा आत्मसन्मान गुंडाळून ठेवला. जेव्हा आत्मसन्मान धोक्यात येतो तेव्हा त्या व्यक्तीसमवेत कोणीही राहू इच्छित नाही.
गोंधळात पडलात ?
तुम्हाला हे खूप गोंधळात टाकणारे वाटेल. एकीकडे मी सांगतोय की मला त्यांच्याकडून काहीही नको आहे आणि दुसरीकडे त्यांचा आत्मसन्मान अबाधित ठेवण्यासाठी त्यांच्याकडे काहीतरी मागायला सांगतो आहे.ही एक कुशलतेने करायची गोष्ट आहे. ह्या पूर्णपणे दोन विरुद्ध स्थिती आहेत. समोरच्या लोकांचा आत्मसन्मान राखणे ही पहिली गोष्ट आणि दुसरी म्हणजे त्यांच्याकडून काहीही न मागणे. म्हणजे, प्रथम दृढता, नंतर नम्रता.
३. स्वातंत्र्य देणे
“तुमची आई बऱ्याच वेळा म्हणते: चालता हो!’. जर तुम्ही खरोखरच निघून गेलात तर तिच्या अवस्थेची कल्पना करा! तिला हृदयविकाराचा झटका येईल! शब्दांना जास्त महत्त्व देऊ नका. शब्दांच्या पलीकडे बघायला शिका.”
बऱ्याच वेळा तुम्ही काही बोलून जाता पण तुम्हाला ते म्हणायचे नसते, बरोबर? समजा, लोक तुमचे शब्दच धरून राहिले आणि तुमच्या शब्दांच्या पलीकडे त्यांनी पाहिलेच नाही तर? तुम्हाला ते आवडेल का? तुम्हाला कदापि आवडणार नाही. तुमची अपेक्षा असेल की त्यांनी तुमच्या शब्दांच्या पलीकडे बघावे. तुम्ही ते करता का? तेवढ्या गंभीरपणे नाही! तुम्ही त्यांचे केवळ शब्द धरुन राहता का? इतरांनी तुमचे शब्द धरुन ठेवणे तुम्हाला आवडत नाही. त्यांनी त्यापलीकडे पाहावे अशी तुमची इच्छा असते, परंतु तुम्ही इतरांच्या शब्दांना धरुन राहता. तुम्ही पर्यायाचा विचार करत नाही.. ते जे बोलत आहेत, त्याचा अर्थ कदाचित तसा नसूही शकतो. तुम्हाला माहित आहे की आपण अशाने अनेक मित्र तोडले आहेत. नाही का? याचा तुमच्या मैत्रीवर मोठा परिणाम झाला असेल ना? कारण त्यांच्या शब्दांना आपण धरुन बसतो. त्यापलीकडे काय आहे ते आपण बघत नाही.
जे फक्त शब्दांशी, माणसांशी जोडलेले असतात, ते चांगले मित्र नसतात. ते खूप वरवरचे असतात. हे नकली आहे. तुम्हाला माहितच आहे की कोणीतरी येऊन म्हणतो, “अरे, धन्यवाद, मला तू खूप आवडतोस”. पण तुम्ही थोडेसे संवेदनशील असाल तर तुम्हाला माहीत असते की ते फक्त ओठातून काहीतरी बोलत आहेत. ते वरवरचे आहे. तुम्ही बुद्धिमान आहात.तुम्ही ओळखून असता की हे अस्सल नाही.सुधारलेल्या व सुसंस्कृत माणसाचे लक्षण काय आहे? हेच की ते कधी कोणाचे शब्द धरुन बसत नाहीत आणि त्याचे तुणतुणे वाजवत बसत नाहीत.
तुम्हाला माहिती आहे की, “तुमची आई बऱ्याच वेळा म्हणते: चालता हो!’. जर तुम्ही खरोखरच निघून गेलात तर तिची काय अवस्था होईल कल्पना करा! तिला हृदयविकाराचा झटका येईल! शब्दांना जास्त महत्त्व देऊ नका. शब्दांच्या पलीकडे बघायला शिका. भुकेलेल्या माणसाचा विचार करा,जो फक्त खाण्याचा विचार करत आहे आणि फक्त अन्न मिळवण्यासाठी तळमळत आहे. आणि त्याच्याबद्दल विचार करा जो सुखवस्तू आहे ,ज्याने एक-दोन दिवस उपवास केला तरी त्याचे काहीही बिघडत नाही.दोघेही उपाशी आहेत पण दोन्ही वृत्तीमध्ये खूप फरक आहे.
लोक एकतर भावनांचे भुकेले आहेत, ते आपल्या विशिष्ट ओळखीसाठी भुकेले आहेत, ते अशा गोष्टींसाठी भुकेले आहेत,ज्या त्यांना माहितही नाहीत की ते कशासाठी भुकेले आहेत. आणि म्हणून ते असे वागतात व बोलतात की ज्या गोष्टींचा त्यांना अर्थही माहित नसतो. पण तुम्ही त्यांना थोडे स्वातंत्र्य का देत नाही? त्यांना सामावून घ्या. ठीक आहे, ते समजूतदार होतील. त्यामुळे काय होईल? त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होणार नाही. तुम्हाला माहिती आहे ना आमचा मंत्र? कोणत्याही परिस्थितीत आपले मन वाचवा,मन स्वस्थ ठेवा,हा आमचा मंत्र आहे. जर तुम्ही आपले मन वाचवले तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीवर विजय मिळवू शकता. त्यामुळे लोक काहीबाही बोलत असतील तर त्यांना संशयाचा फायदा घेऊ द्या, त्यांनी उच्चारलेल्या शब्दांना धरुन बसू नका आणि विरोध करु नका.जे आहे ते ठीक आहे.तुम्ही चुका केल्या आहेत. त्यांनाही काही चुका करु द्या,हरकत नाही.नंतर तुम्हाला कळून येईल,तुम्ही एक चांगले मित्र व्हाल आणि तुमची मैत्री नक्की वाढेल.
४. धाडसी मैत्री
“केवळ मैत्रीसाठी मैत्री वाढवतात ते शूर असतात.अशी मैत्री कधीच बाधित होणार नाही किंवा नष्टही होणार नाही, कारण ती व्यक्तीच्या मैत्रीपूर्ण स्वभावातूनच जन्माला आलेली असते.”
तुमच्या मैत्रीचे परीक्षण करा, ती सहसा काही कारणासाठी असते. तुमच्या मैत्रीची अनेक कारणे आहेत:
- कधी कधी तुम्ही मैत्री करता कारण तुमचे शत्रू एकच आहेत.
- जगण्याची भीती आणि धमक्या लोकांना एकत्र आणू शकतात.
- कधी कधी तुम्ही मैत्री करता कारण तुम्हाला एकसारख्याच समस्या आहेत. तुम्ही तुमच्या समस्यांबद्दल बोलता आणि मित्र होता. उदाहरणार्थ – आजारपण, नोकरीतील कटकटी इ.
- लोक एकत्र येतात कारण त्यांचे समान हितसंबंध असतात. उदाहरणार्थ, धंदा किंवा व्यवसायाद्वारे (डॉक्टर, आर्किटेक्ट, सामाजिक कार्यकर्ते इ.)
- कधी कधी तुमच्यात मैत्री होते कारण तुम्हाला समान गोष्टींमध्ये रुची असते.दोघांनाही क्रीडा, चित्रपट,मनोरंजन, संगीत, छंद अशा समान गोष्टीमध्ये रुची असते.
- कधी करुणा आणि सेवेमुळे लोक मित्र बनतात. एखाद्याबद्दल करुणा आणि दया दाखवून तुम्ही त्याच्याशी मैत्री करता.
- तर कधी दीर्घकालीन ओळखी आहेत म्हणून लोक मित्र बनतात.
“शूर ते आहेत जे केवळ मैत्रीसाठी मैत्री वाढवतात. अशी मैत्री कधीच कलंकित होणार नाही किंवा संपणारही नाही, कारण ती मैत्रीपूर्ण स्वभावातूनच जन्माला आलेली असते.” केवळ ज्ञानानेच माणूस स्वभावतः मैत्रीपूर्ण होऊ शकतो.
मऊ तरीही चिवट : नूडल्स पासून (शेवयांसारखा पदार्थ) शिकणे!
आपल्या स्वभावात मैत्रीपूर्ण रहा.आपण कधीही कोणाकडून काहीही घेतले नाही किंवा कोणाकडून काहीही नको आहे असे सांगून स्वतःचा अहंकार ठामपणे व्यक्त करु नका. हे खरे असेलही, पण तुम्ही असे व्यक्त होऊ नये. “बघा, मी किती नम्र आहे!” असे म्हणणे म्हणजे नम्रता नव्हे.
सौहार्द व प्रतिष्ठा :– खूप प्रतिष्ठित लोक अलिप्त राहतात. ते मोकळे आणि सौहार्दपूर्ण नसतात.जे लोक मोकळे आणि सौहार्दपूर्ण असतात त्यांना प्रतिष्ठा नसते. ते फक्त नूडल्स (किंवा शेवयांसारखे) सारखे मऊ मऊ आणि दोऱ्या (धागा) सारखे असतात. कल्पना करा की सगळ्या नूडल्स एकत्र गोळा झाल्या आहेत,आता आपण त्या काट्याने उचलू शकत नाही,त्याचा लगदा होतो.त्याचा काही उपयोग नसतो.
शेवया (नूडल्स) हे एक उत्तम उदाहरण आहे.त्या मऊ असतात, तरीही वेगवेगळ्या असतात, चिवट किंवा कडक नसतात. एक मध्यम मार्ग:- प्रतिष्ठा व सौहार्द, हेच मैत्रीचे रहस्य आहे. जेव्हा एखादी व्यक्ती निराश असते तेव्हा त्याचे किंवा तिचे मनोबल वाढवा.
तुम्हाला कोणाबरोबर तरी चांगल्या कामात गुंतून राहायला आवडेल की सतत चिडचिड करणाऱ्या व्यक्ती समवेत राहायला आवडेल? कोणी कायमस्वरूपी अहंकारी असतो का? कोणीही नाही. सदा सर्वकाळ कोणी खराब, वाईट असतो का? कायमचा टाकाऊ कोण आहे? तुम्ही आहात का असे? तुम्ही स्वतःचे परीक्षण करा. – तुम्ही अहंकारी आहात का, वेंधळे आहात का, तुमची इतरांना चीड येते का? तसे असेल तर, ध्यान करा! काही मिनिटे ध्यान झाले की परत मंत्राकडे या. (मंत्राद्वारे ध्यान, सहज ध्यान). तुम्हाला आढळून येईल की, तुमच्याकडून मैत्रीपूर्ण स्पंदने निर्माण होत आहेत. लोकांना तुमचा सहवास आवडेल, आणि तुम्हाला आणखी मित्र बनवायला आवडेल.
“जेव्हा तुम्ही मैत्रीपूर्ण असता, तेव्हा संपूर्ण जग तुमचे मित्र बनते. प्रत्येकजण तुमच्याकडे वळू लागतो.”
तुम्हाला हे माहीत होते का?
तुमच्या मित्रांच्या सहवासात तुम्ही तुमचा समतोल घालवता. तुमचा शत्रू तुम्हाला तुमच्यात परत केंद्रित ठेवतो. तुमचा मित्र तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवतो आणि तुम्हाला ऐहिक गोष्टींवर विश्वास ठेवायला भाग पाडतो. तुमचा शत्रू तुम्हाला असहाय्य वाटायला लावतो आणि तुम्हाला स्व कडे घेऊन जातो. म्हणजे तुमचा शत्रू हाच तुमचा मित्र आणि तुमचा मित्र हाच तुमचा शत्रू!!
कृष्ण अर्जुनाला म्हणतो : जो सर्वत्र (स्वत:सह) मैत्रीहीन आहे; त्याची चेतना स्थिर असते आणि सजगता स्थापित झालेली असते.
मित्र हा शत्रू असतो आणि शत्रू हा मित्र असतो.
~ गुरुदेव श्री श्री रवि शंकर