जगात काहीही घडत असो किवा कोणताही ऋतू चालू असो, प्रेम हा नेहमीच चर्चेसाठी आवडता विषय असतो. आपण प्रेम कसे ओळखू शकतो?
ही प्रेमाची लक्षणे आहेत
- जेंव्हा आपण कुणावर प्रेम करतो तेंव्हा आपल्याला त्यांच्यात काहीही चूक दिसत नाही. जरी आपल्याला त्यांच्यामध्ये काही दोष दिसला तरीही आपण “प्रत्येकजण असे करतो; ते नेहमीचेच आहे.” असे म्हणून त्यांचे समर्थन करतो.
- आपणास असे वाटते की आपण त्यांच्यासाठी तेवढे पुरेसे केलेले नाही, आणि आपण त्यांच्यासाठी जितके जास्त करू तितके अधिक करायची इच्छा होत राहील. ते नेहमी आपल्या हृदयामध्ये असतात.
- त्यांच्या साधारण गोष्टी असाधारण बनतात. आजीकडे बघून डोळे मिचकावणारे बाळ सुद्धा तिच्यासाठी एक विलक्षण घटना असते.
- ते केवळ आपलेच असावेत अशी आपली इच्छा असते.
- अगदी छोट्या गोष्टींवरून देखील आपण दुखावले जातो.
- जेंव्हा आपण कोणावर प्रेम करतो, तेंव्हा आपणास त्यांना नेहमी आनंदी पहायचे असते आणि त्यांना सर्वोत्तम तेच मिळावे असे आपणास वाटत असते. प्रिय व्यक्तीकडे जे नाही ते त्यांना मिळावे म्हणून आपण त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्याकडे जे नाही ते त्यांना मिळावे अशी आपली इच्छा असते, बरोबर? जेंव्हा आपण म्हणतो, “सर्वोत्तम शुभेच्छा”, तेंव्हा आपण सूचित करत असतो की ते सर्वोत्तम नाहीत. हा क्षण, मी आपणास सांगतो, हा क्षण सर्वोत्तम आहे. जेंव्हा आपणास याची जाणीव होते तेंव्हा उद्याचा येणारा दिवस हा यापेक्षा ही अधिक चांगला असतो.