तुमचे जीवन मुख्यतः तुमच्या अचेतन मनाद्वारे नियंत्रित केले जाते. सवयी या तुमच्या अचेतन मनात रुजलेल्या असतात. सर्व सवयी या चुकीच्या नसतात. उदाहरणार्थ दररोज दात घासणे ही एक सवय आहे व तुम्ही जर दात घासले नाहीत तर तुम्हाला चांगले वाटत नाही आणि ते बरोबर आहे. स्नान करणे ही एक सवय आहे तुम्ही दररोज स्नान करतात आणि तुम्ही स्नान केले नाही तर तुम्हाला बरे वाटत नाही. तसेच कॉफी घेणाऱ्या लोकांना कॉफी घेतली नाही, तर त्यांचे डोके दुखते. कॉफी घेणे हे चांगले की नाही हे त्या व्यक्तीवर आणि त्यांच्या डॉक्टरी सल्ल्यावर अवलंबून असते. काही सवयी वेदनादायक असतात ज्या तुमच्यासाठी, तुमच्या शरीरासाठी, तुमच्या मनासाठी किंवा तुमच्या आत्म्यासाठी चांगल्या नसतात.
एखादी सवय सोडण्याची असमर्थता तुम्हाला बोचते, तुम्हाला खूप वेदना होतात आणि या वेदनाच तुम्हाला त्या सवयीपासून मुक्त करतात.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
उदाहरणार्थ मद्यपान किंवा धुम्रपानाचे व्यसनाधीन असलेले लोक. धूम्रपान आरोग्यासाठी चांगले नाही, हे माहीत असूनही ते धूम्रपान करतात. कारण? व्यसन केल्यामुळे काहीतरी आनंद होईल असे वाटते, परंतु तो खरोखर होत नाही. या सवयी कशा सोडवायच्या? त्याचे तीन मार्ग आहेत.
प्रेम
तुम्ही ज्यांच्यावर खूप प्रेम करता, अशा कुणाला वचन दिले, समजा तुमची मुलगी, तुमची पत्नी किंवा तुमची आई अशा प्रिय असलेल्या व्यक्तीला वचन दिले तर तुम्ही प्रेमापोटी ते पाळाल. सर्वप्रथम तुम्ही तुमची सवय सोडू शकत नाही याचे तुम्हाला दुःख होते आणि तुम्ही वचन पाळू शकत नाही याचे आणखी जास्त दुःख होते. जर ही सवय तुमच्यात खोलवर रुजली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ती सोडू शकत नाही, तर मी सांगेन तुम्ही दहा दिवस किंवा एक महिन्यासाठी ती सोडा. हे तुमच्यासाठी सोपे आहे, एकावेळी एकच पाऊल उचला आणि यात तुम्ही यशस्वी व्हाल.
भीती
दुसरा मार्ग म्हणजे भीती. जेव्हा तुम्हाला डॉक्टर सांगतात आणखी एक झुरका आणि तुमच्या यकृताचे कधीही भरुन न येणारे नुकसान होईल तसेच तुमचे फुफ्फुस काम करू शकणार नाही. तुम्ही एकाही सिगारेटला हात लावू शकत नाही. अशा भीतीपोटी तुमची ती सवय सुटू शकेल.
लोभ
तिसरा म्हणजे लोभ. समजा कोणीतरी तुम्हाला सांगितले की तुम्ही एक महिना धूम्रपान केले नाही, तर तुम्हाला दहा लक्ष डॉलर्स मिळतील. तर तुम्ही म्हणाल एक महिना काय, मी ३५ दिवस धूम्रपान करणार नाही. तुम्ही मोजलेले दिवस योग्य असल्याची खात्री करण्यासाठी पाच जास्त दिवस. लोभ तुम्हाला आवडत नसलेल्या सवयी पासून रोखू शकतो. तुमचा लोभ ते पैसे मिळवण्याची हाव, तुम्हाला ती सवय सोडण्यास मदत करेल. तर या तीन गोष्टी म्हणजे भीती, प्रेम आणि लोभ. मी कायमची सवय सोडेन असे स्वतः ठरवू नका.
भीती आणि प्रेम हे उपाय सर्वोत्तम आहेत. शेवटी तुम्हाला स्वतःलाच कळेल की ‘हे किती वेदनादायक आहे! ही सवय चालू ठेवून मी दुःखच विकत घेत आहे.’ जेव्हा हे एक दिवस तुमच्या लक्षात येईल, तेव्हा ही सवय आपोआपच सुटेल.
सराव: कोणताही सराव हा ठराविक कालावधीत, कोणताही खंड न पडता, स्थिरपणे, दररोज आदराने त्याचा सन्मान करत केला जातो तो सराव असतो. आणि तेव्हाच तो घट्टपणे रुजतो.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
चांगली सवय कशी लावावी
चांगली सवय लावण्यासाठी शिस्त ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि येथे देखील त्याच तीन भावनांचा वापर चांगल्या सवयी लावण्यासाठी करता येईल.
- प्रेम: जेव्हा तुम्ही एखाद्या गोश्टीवर प्रेम करतात तेव्हा तुम्ही तिचे अनुसरण करता तसेच ती करत रहाता. जर तुम्हाला योगाची आवड असेल तर तुम्ही ते कराल. जर तुम्हाला वजन उचलणे आवडत असेल, तर तुम्ही ते कराल. तुम्हाला कराटे आवडत असेल, तर ते करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. तुम्हाला संगीताची आवड असेल, तर तुम्ही बसून त्याचा सराव कराल. अशाप्रकारे प्रेम हे सवय निर्माण करते.
- लोभ: जर तुम्हाला कोणी सांगितले की तुम्ही ४० दिवस दररोज सूर्य नमस्कार घातलेत, तर तुम्हाला दहा लक्ष डॉलर्स मिळतील. तर तुम्ही हे फक्त ४० दिवस नाही तर खात्री करण्यासाठी ४५ दिवस कराल. चूक होऊ नये म्हणून दोन दिवस आधी व दोन दिवस नंतर. लोभ तुम्हाला शिस्त लावण्यास प्रवृत्त करू शकतो.
- भीती: जर तुम्हाला कोणी सांगितले की, तुम्ही योग करत नसाल तर तुम्हाला पुढच्या काही महिन्यात ह्या ह्या ह्या….. समस्या येऊ शकतात. तर तुम्ही घाबरून जाल तुम्ही म्हणाल,अरे मला या समस्या नकोत मला योग करू द्या.
निष्कर्ष
तुमचे जीवन मुख्यतः तुमच्या अचेतन मनाद्वारे नियंत्रित केले जाते आणि सवयी तुमच्या अचेतन मनात रुजलेल्या असतात. वाईट सवयी सोडण्यासाठी व चांगल्या सवयी लावण्यासाठी भावनांचा उपयोग करणे आवश्यक आहे. कुटुंबातील जवळच्या व्यक्तींचे प्रेम वाईट सवयी मोडण्यास मदत करू शकते. एखाद्या गोष्टीच्या प्रेमामुळे चांगली सवय लागू शकते. एखाद्या गोष्टीचा लोभ हानिकारक सवयी सोडून चांगल्या सवयी अंगीकारण्यास प्रवृत्त करू शकतो. रोगाची भीती वाईट सवयी घालवून चांगल्या सवयी लावण्यास मदत करू शकते. भीती ही फार कमी प्रेरक आहे. लोभ तेवढा चांगला मार्ग नाही, परंतु प्रेम वाईट सवयीतून वर येण्याचा आणि चांगल्या गोष्टी अंगीकारण्याचा उत्तम मार्ग आहे.
आमच्या आर्ट ऑफ लिविंग हॅपिनेस प्रोग्राम मध्ये सामील व्हा आणि तुमच्यातील अचेतन मनाची शक्ती उलगडण्यास शिका. आजच नोंदणी करा.