आपल्या सर्वांना राग येतो – कधी कधी, दररोज! हे असामान्य किंवा नवीन नाही, परंतु सजग राहून राग आलेला बरा .
तळपायाची आग मस्तकापर्यंत पोहोचली अशी म्हण आहे. आपल्यापैकी काही लोक त्या बिंदूपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ घेतात. जर राग त्या बिंदूपर्यंत चढला तर आपल्याला आणि आपल्या सभोवतालच्या लोकांना तो जाळतो. काही जणांना पटकन राग येतो, आणि लवकर निघूनही जातो. ते शांत होतात. तथापि, हे सर्व पुन्हा बेसावधपणे सुरू होते.
या चक्रातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे कां? गुरुदेव श्री श्री रविशंकर रागावरील सतावणाऱ्या या प्रश्नांची उत्तरे देतात आणि दाहक भावनांवर मात करण्याचे मार्ग सुचवतात.
आपणास येणारा राग आपले सामर्थ्य, आपल्या आसक्तीची तीव्रता आणि आपली जीवनाबद्दलची जाण यावर अवलंबून असतो.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
आपला राग कोणावर आहे ?
आपल्याला कशाचा राग येतो? लोक, घटना परिस्थिती यांचा? साहजिकच आपण वस्तूंवर रागावू शकत नाही. तर, आपला राग हा लोकांवर किंवा परिस्थितींवर असतो, यामध्ये आपला हि समावेश आहे. एकतर तुम्ही स्वतःवर रागावलेले असतो नाही किंवा इतर कोणावर तरी रागावतो. फक्त, सजग व्हा आणि पहा, दोन्ही राग निरर्थक आणि निरुपयोगी आहेत.
राग येणे : रस्ता इकडे – तिकडे
कधीही न रागावणे शक्य आहे कां? आपला आतापर्यंतचा अनुभव काय आहे? लहानपणी आपलं खेळणं हिसकावून घेतलं की आपल्याला राग यायचा. दूध, अन्न, टॉफी किंवा खेळणी वेळेवर न दिल्याने आपण ओरडायचो. आपण असे केले नाही कां ? होय, आपण हे केले आहे. मग आपल्या शाळा, कॉलेज, कामाच्या ठिकाणी आणि आपल्या मित्रांसोबतही आपण राग अनुभवला आहे. तर, राग ही सामान्यतः अनुभवलेली भावना आहे.
रागातून लवकर बाहेर पडणे महत्वाचे आहे.
आपणास किती वारंवार राग येतो? आपल्या रागाची पुनरावृत्ती आपल्या सामर्थ्याच्या व्यस्त प्रमाणात असते. आपण जितके बलवान असू, तितका आपला राग कमी होईल; आपण जितके कमकुवत असाल, तितकेच आपल्याला राग जास्त येईल. आपण इकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपले सामर्थ्य किती आहे? आपण ते कां गमावताय?
दुसरा घटक म्हणजे आपली दृष्टी आणि जीवनाविषयी सखोल जाण आणि आपल्या सभोवतालचे लोक. आपल्याला येणाऱ्या रागामध्ये त्यांचीही भूमिका आहे.
तिसरा घटक म्हणजे तुमची आसक्ती – आसक्ती आपल्यात राग निर्माण करते. आपणास काय हवे आहे. आपल्या रागामागे आपली इच्छा असते. ते आपण ओळखलेच पाहिजे. जर तो आपला आराम, इच्छा किंवा अहंकारासाठी असेल तर आपली प्रतिक्रिया वेगळी असते. परंतु, जर आपला राग सहानुभूतीतून आला असेल, जर आपल्या रागाचा उद्देश काही गोष्टी व्यवस्थित चांगल्या करण्याचा असेल तर ते वेगळे आहे. या प्रकारचा राग ही वाईट भावना नव्हे.
सकारात्मक बदलाचे साधन म्हणून रागाचा वापर करणे
रागाला योग्य दिशा देणे आवश्यक आहे. रागाने आपल्याला वापरता कामा नये. जिथे आवश्यक आहे तिथे राग करावा.
राग नेहमी वाईट आहे असे समजू नका. जर तो कमी प्रमाणात वापरला गेला तर ते किंमती आणि मौल्यवान आहे. दुसरीकडे, जर तो दररोज वापरला गेला, तर त्याचे काही मोल नाही. उलट, तो आपले मूल्य कमी करतो.
भूतकाळा बद्दलचा दाबून ठेवलेला राग
भूतकाळाबद्दलच्या दाबून ठेवलेल्या रागापासून मुक्त कसे व्हावे? जर आपणास असे वाटत असेल की आपण राग दाबून ठेवला आहे आणि त्याचा निचरा होण्यासाठी तो बाहेर यायला हवा… तर मग तो कधीही न संपणारा आहे. हे महासागरातील लाटा थोपवण्यासारखे आहे.
राग ही काही वेगळी ऊर्जा नाही. ही एकच ऊर्जा आहे, जी क्रोध आणि करुणा म्हणून प्रकट होते; प्रेम आणि औदार्य म्हणून ही प्रकट होते. दोन भिन्न ऊर्जा नाहीत. उलट, ही एकच ऊर्जा आहे जी वेगवेगळे रंग गृहीत धरते. ज्याप्रमाणे एकच विद्युतशक्ती रेफ्रिजरेटर, दिवे, पंखे यासाठी वापरली जाते.
आपण राग दाबून ठेवला आहे असे स्वतः विचार करू नका.जर आपण सूज्ञ असाल आणि डोळे उघडे ठेऊन सत्य आणि वास्तवाकडे पहिले, तर आपणास जाणवेल की आपला भूतकाळाबद्दलचा राग हा आपला मूर्खपणा आणि शहाणपणाचा अभाव होता.
रागीट लोकांना हाताळणे.
तुम्ही रागीट लोकांशी कसे वागतो? फक्त त्यांना पहा आणि मजा बघा! जसे आपण दिवाळीत फटाके वाजवता तेव्हा, त्याच्या जवळ जाऊन, त्यांची वात पेटवता आणि मग आपण पळून जातो! आणि मग, आपण दुरून पहातो आणि मजा घेतो! आपण रागावलेल्या लोकांसोबत असेच केले पाहिजे. फक्त पहा की त्यांच्या आजूबाजूला कोणतीही मौल्यवान वस्तू नाही, कारण महागड्या कार्पेटवर किंवा घराच्या आत फटाके फोडत नाही! बागेत घेऊन जाता किंवा रस्त्यावर फोडता. त्याच प्रकारे, रागावलेल्या लोकांची मजा घेतली पाहिजे; त्यांच्याशिवाय, जगात मजा नाही!
आपण भूतकाळात पटकन प्रतिक्रिया दिली नाही हे चांगले आहे. राग व्यक्त केला असता तर पश्चाताप झाला असता. त्यांच्याकडे दाबून ठेवलेला राग म्हणून पाहू नका. कुठेतरी, आपली बुद्धी त्या रागाच्या क्षणी प्रतिक्रिया न देण्याइतकी हुशार होती. त्याकडे आपला लाभ म्हणून पहा, आपला कमकुवतपणा म्हणून नाही. जर आपण रागाने प्रतिक्रिया दिली नसेल तर तुम्ही शहाणे आहात.
आपला राग न्याय्य आहे हा समज आहे…
आपण राग व्यक्त केल्याने समोरची व्यक्ती ठीक होणार नाही किंवा आपले आयुष्यही चांगले होणार नाही. राग दाबणे-यासारख्या संज्ञा म्हणजे अर्धे कच्चे मानसशास्त्र आहे. केवळ सूज्ञपणाने, गोष्टी कशा आहेत हे तुम्ही जाणू शकता आणि तुमची प्रतिक्रिया तुमच्या प्रगतीसाठी नेहमीच हानिकारक असते. आपण कृती करावी, प्रतिक्रिया देऊ नये. दाबून ठेवलेला राग म्हणजे प्रतिक्रिया. आपण प्रतिक्रिया दिली नाही तर, ते चांगले आहे!
प्र. भूतकाळाबद्दल रागावणे किती शहाणपणाचे आहे?
गुरुदेव: भूतकाळाबद्दल रागावून काही फायदा होतो कां?
मुल्ला नसुरुद्दीनची एक कथा आहे. त्याचा मुलगा एक महागडे इलेक्ट्रॉनिक उपकरण हाताळणार होता आणि त्याने आपल्या मुलाला थोबाडीत मारली! ‘असे कां केले’ असे विचारल्यावर त्याने उत्तर दिले, “ते तुटल्यावर त्याला थप्पड मारण्यात काय मजा आहे ?
भूतकाळात घडलेल्या एखाद्या गोष्टीचा राग येणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. लोक मला विचारतात की मला राग येत नाही कां? पण, मला कशाचा राग यायला हवा? होऊन गेलेल्या भूतकाळाबद्दल? सध्या जे काही घडत आहे त्याचा आपल्याला राग येतो. पण रागावर रागाने प्रतिक्रिया देणं… किती मूर्खपणा आहे! जर कोणी वारंवार चूक करत असेल, तर आपण राग व्यक्त करू शकता, पण त्याच्या बरोबर वाहवत जाऊ नका.
आरोग्य वर्धक राग-आरोग्य वर्धक राग म्हणजे पाण्यावर मारलेली रेषा जितका वेळ टिकते तेव्हढ्याच वेळेपर्यंत टिकणारा राग.
याचा अर्थ असा नाही की जेव्हा एखादी व्यक्ती चुकीची असते तेव्हा राग दाखवू नका. परंतु त्या रागा बरोबर वाहवत जाणे अविवेकी आहे. विकृती जी स्वतःपासून दूर नेते, अशा कोणत्याही विकारापासून साधना आपल्या मनाचे रक्षण करते.
आपल्या रागापासून दूर असलेला महामार्ग
जेव्हा राग येतो तेव्हा त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होते. तो गेला की त्याच्यामागे अपराधीपणा येतो. राग आणि अपराधीपणाच्या या चक्रातून आपण कसे बाहेर पडू? जर आपण आपला राग व्यक्त केला तर आपणास अपराधी वाटते. जर आपण ते व्यक्त केले नाही तर आपल्याला वाटते की आपण तो दाबला आहे. दोन्ही भावनेतून बाहेर येण्यासाठी, जीवनाला वेगळ्या दृष्टिकोनातून पहा–एक व्यापक दृष्टीकोन ठेवा.
जर आपण आपल्या जीवनाचा संदर्भ बदललात तर आपल्याला जीवन एक संघर्ष वाटणार नाही. आपणास दिसेल की या भावना आपणास खरोखर बांधून ठेवत नाहीत किंवा आपणास दोषी किंवा गुदमरल्यासारखे वाटू देत नाहीत. ती केवळ एक सजावट आहे. सजावटीमुळे तेथे असलेल्या पदार्थाला काही फरक पडत नाही. हे केकच्या आयसिंग वर वेगवेगळे रंग देण्यासारखे आहे. निरोगी रागाबद्दल अधिक वाचा.
सुदर्शन क्रिया शिकून तुमच्या रागावर मात करण्याचा तुमचा प्रवास सुरू करा. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.