श्री गणेश म्हणजे कोण
अंतिम सत्य हेच आहे की विद्यमान जग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अणूंचे संच, गुणांचे संच, उर्जेचे संच आहेत. गण म्हणजे संच, संघ. ईश्वराशिवाय संघाचे अस्तित्व नाही. जसे राणी मधमाशीच्या केवळ असण्याने मधुकोष तयार होतो. हे वैविध्यपूर्ण विश्वच गणेशाच्या उपस्थितीचा पुरेसा पुरावा आहे. आपलं स्वतःचं शरीर म्हणजे गण आहे. तो मांस, रक्त आणि अस्थि मज्जा यांनी बनलेला आहे. सर्व गणांचा ईश म्हणजे गणेश.
गणेशाचं वर्णन, अजम्, निर्विकल्प, निराकार, एकम् असे केले जाते. आदि शंकराचार्यांनी खूप सुंदर पद्धतीने गणपतीचे वर्णन केलेले आहे. ते म्हणतात ‘अजम् निर्विकल्प निराकार एकम्’. म्हणजे, गणेश जन्मला नाही. तो अजन्म आहे. निराकार (आकार, रूप नसलेला) आहे. आणि तो निर्वीकल्प आहे (गुणरहित) आहे. ‘हे गणेशा, तू अनंत, निराकार आणि चराचरात भरलेला ईश आहेस. गणेश हा ‘ अचिंत्य ‘, ‘ अव्यक्त ‘ आणि ‘ अनंत ‘ आहे. चिंतनापलिकडचा , व्यक्त करण्या पलिकडचा व शाश्वत !! अशाप्रकारे गणेशाइतके सुंदर रूप कोणाचे नाही.तो सर्वव्यापी आहे !!
अथर्वशीर्षामध्ये गणेशाचे फार सुंदर वर्णन केले आहे :
तू इंद्र आहेस, तू ब्रह्मा आहेस, तू विष्णू आहेस, तू शिव आहेस.
तू सगळीकडे चराचरात भरलेला आहेस
तू खाली आहेस, तू माझ्या वरती आहेस, तू माझ्या मागे आहेस, तू माझ्या बाजूला आहेस, सर्व सभोवताली तूच आणि तूच आहेस. सगळं काही तुझ्यावर अवलंबून आहे.
तू दाता आहेस, तू कर्ता आहेस, तू भोक्ता आहेस.
तू सर्व सद्गुणांच्या पलीकडे आहेस.
तुझ्यापर्यंत पोहोचायला फक्त ज्ञानाची गरज आहे.
जेव्हा ऋषी ध्यान करतात त्या वेळेला त्यांच्यातील अवकाशतत्व तूच आहेस.
तू सर्व गणांचा मुख्य आहेस.
तुझ्यामुळे या जगाचे अस्तित्व आहे.
तूच बीज आहेस. तूच ज्ञान आहेस
तू सर्व देवतांचा मुख्य आहेस. तू सर्व सद्गुणांचा आदि आणि अंत आहेस.
तू आनंदाचे कारण आहेस.
जे जे लोक आनंद विभोर होतात ते फक्त तुझ्यामुळेच.
तू सर्व सद्गुणांचा प्रमुख आहेस.
सर्व जगात अशी कुठलीही जागा नाहिये जिथे तू नाहीस.
सर्वजण कळत नकळत तुझीच प्रार्थना करतात.
जर कोणाच्या मनामध्ये भक्ती निर्माण झाली तर ती फक्त तुझ्याबद्दलच होते.
मूळ
गणेश, किंवा प्रभु हा अव्यक्त अशा दिव्य चैतन्यापासून , स्वयं म्हणजेच शिवापासून जन्माला आला.
ज्याप्रमाणे अणू एकत्र आले की पदार्थ अस्तित्वात येतात, जेव्हा मानवी चेतनेचे निरनिराळे पैलू जोडले जातात, तेव्हा दिव्यत्व सहजच घडते आणि तोच शिवापासून गणेशाचा जन्म.गणेशाचा जन्म साध्या डोळ्यांना दिसत नाही अशा अलौकिक चेतनेतून झालेला आहे, शिव म्हणजेच आत्मा.
पुराणातल्या बऱ्याचशा कथा अविश्वसनीय आणि अशक्यप्राय वाटणाऱ्या आहेत. त्याचा जसा अर्थ वरवर दिसतो तसा तो घेऊ नये. पुराणातल्या कथांमध्ये एक लपलेला अर्थ असतो आणि एक सखोल विचार असतो. तुम्ही त्याचा अर्थ शुद्ध मनाने शोधून काढण्याची गरज आहे.
त्याप्रमाणेच गणेशाचा जन्म, गणेशाच्या जन्माची कथा आहे .त्याच्यात सुद्धा एक सखोल विचार आहे आणि लपलेलं तत्त्वज्ञान आहे. गणेशाचा जन्म हा पार्वतीच्या मळापासून झालेला आहे. शिव आणि पार्वती हे अति उत्साहाने आनंदाने परमानंदाने उत्सव साजरा करत होते आणि त्यावेळी पार्वतीला जो मळ आला , तो पार्वतीने जमा केला. तो मळ आला म्हणजे असं दाखवतो की उत्सव पूर्णपणे राजसिक होऊ शकतो आणि केंद्रस्थाना पासून विचलित होऊ शकतो.
पुढे कथा अशी जाते की, पार्वती तो शरीरावरचा अज्ञानरूपी मळ उतरवते, गोळा करते आणि त्यापासून एक मुलाचा बाहुला बनवते आणि त्या बाहुल्यामध्ये ती जीव निर्माण करते आणि त्याला सांगते की ती स्नान करीत असताना त्याने दरवाज्याजवळ उभे राहून पहारा करावा.
जेव्हा (निष्पापपणा, शांती आणि ज्ञान यांचे सर्वोच्च स्वरूप असलेले) शिव कैलासावरून परत आले , तेव्हा त्या मुलाने त्यांना ओळखले नाही. त्यामुळे त्याने त्यांची वाट अडवली आणि त्यांना आतमध्ये जाण्यास मनाई केली. याचा अर्थ असा की अज्ञानाला(मळ) शहाणपण आणि निष्पापपणा कळत नाही, अज्ञानाने सत्य लपत नाही. त्यामुळे शिवाने मुलाचे शीर उडवले. (अज्ञानाचे शीर)
जेव्हा पार्वतीला काय झाले ते समजले तेव्हा तिने शिवाला सांगितलं की तो आपला मुलगा होता आणि त्याला वाचवायला हवे. मग शिवाला त्याला वाचवणे भाग पडले. शिवाने त्याच्या मदतनीसांना सांगितले की त्यांनी उत्तर दिशेला तोंड असलेल्या आणि ऊर्जेच्या नैसर्गिक प्रवाहाशी सुसंगत असेल अशा कुणाचे शीर घेऊन यावे. त्यांनी दूरवर शोध घेतला तेव्हा त्यांना केवळ एक हत्ती अशा स्थितीत सापडला. ते त्या हत्तीचे शीर घेऊन आले आणि अशा प्रकारे गणेश निर्माण झाला. ही एक प्रतीकात्मक कथा आहे.
हत्तीच का
हत्तीच का, हा प्रश्न मनामध्ये उमटतो. ही चेतना व सर्वश्रेष्ठ शक्ती हत्तीच्या रूपात चित्रित केली आहे. कारण त्याच्याकडे अद्वितीय असे गुण आहेत. जशी त्याची निर्भीड आणि राजेशाही चाल. तो सहजतेने आपल्या रस्त्यामधील अडथळे दूर करतो.
त्याचा दुसरा गुण आहे की हत्ती हा हुकूमत गाजवणारा, सहनशील, शक्तिमान आणि धैर्यवान असा आहे. हे दैवी गुण त्याच्याकडे असल्यामुळे तो हत्तीच्या रूपात दाखवला जातो. जेव्हा आपण गणेशाची पूजा करतो, तेव्हा हे सर्व गुण आपण आपल्यामध्ये धारण करतो.
हत्तीची लांब सोंड ही, ज्ञान असणे आणि ते कृतीत उतरवणे यातील चांगले संतुलन दर्शवते. हत्तीचे एकदंत असणे हे ‘चेतना एकच’ असल्याचे दर्शवते.
विज्ञानाने असे शोधून काढले आहे की एकाच मानवी डीएनए सूत्रांमध्ये, पृथ्वीवरील इतर प्रत्येक प्रजातीचा डीएनए देखील आढळू शकतो. त्यामुळे प्रत्येक प्राण्याचा गुणही आपण आपल्यात बाळगत असतो. खरं तर, हे प्राचीन काळापासून ज्ञात आहे.
हत्तीचे मुख्य गुण म्हणजे शहाणपण आणि सहजता. हत्ती अडथळ्यांभोवती फिरत नाहीत, त्यांच्याजवळ थांबत नाहीत – ते फक्त त्यांना दूर करतात आणि सरळ चालत राहतात. उदाहरणार्थ, जर त्यांच्या मार्गात झाडे असतील तर ते फक्त ती झाडे उपटून पुढे जातील.
हत्तीची सोंड
म्हणून, जेव्हा आपण श्रीगणेशाची उपासना करतो, तेव्हा आपल्यातील हे हत्तीचे गुण प्रज्वलित होतात आणि आपण ते गुण घेतो. याचे कारण असे की तुम्ही ज्यावर लक्ष केंद्रीत करता, ते गुण तुम्ही अंगीकारता. त्यामुळे हत्तीचे मस्तक असलेल्या गणेशाचे ध्यान केल्यास तुम्हाला हत्तीचे गुण प्राप्त होतील. तुम्ही सर्व अडथळ्यांवर मात कराल.
हत्तीमध्ये विशेष गुण असतात. त्याचे एक प्रचंड मोठे डोके आहे, जे ज्ञान आणि शहाणपणाचे प्रतीक आहे; त्याला पंखांसारखे मोठे कान आहेत, छोटे डोळे आहेत जे दाखवतात की केवळ जे दिसते त्यावर न जाता आपण जे ऐकतो आणि समजतो त्याचे अनुसरण करणे अधिक शहाणपणाचे आहे. म्हणून, तुम्ही जे पाहता ते तुम्ही जे ऐकता त्याच्याशी संबंधित असले पाहिजे
तसेच, हत्ती त्याची सोंड दुहेरी कामांसाठी वापरतो – तो वास घेतो (म्हणजे नोंद घेतो) आणि त्याच्या सोंडेतून कृती करतो. त्याचप्रमाणे, ज्ञानामध्ये, आपण वास घेतो आणि नंतर कार्य करतो. ज्ञान शक्ती आणि कर्म शक्ती (कृती) यांच्यातील परिपूर्ण संतुलनाचे प्रतीक म्हणजे सोंड!
एखाद्या गोष्टीचा फक्त इशारा मिळाला (जसे की धुराचा वास येणे, किंवा “काहीतरी माशाचा वास येतो!” या लोकप्रिय म्हणींप्रमाणे), एक शहाणी व्यक्ती त्वरित कारवाई करते. एखाद्या गोष्टीचा वास येणे, सुगावा लागणे हे शहाणपणाचे कृत्य असल्याचे हे प्रतीक आहे.
सुळे
हत्तीला मोठे सुळे असतात जे सर्वांना दिसतात. पण त्याचे खाण्याचे दांत दिसत नाहीत, कारण ते तोंडाच्या आत असतात. गणेशाला एकच दात असतो. तो एकाग्रतेचे प्रतीक आहे.
हत्ती कमळावर आणि उंदरावर का असतो
गणेश नेहमी कमळावर बसलेला दिसतो. हे जरा विचित्र आहे. पण हे असे दर्शवते की तो खूप संवेदनशील आहे. गणपती नेहमी उंदराला वाहन मानतो आणि उंदरावरून प्रवास करतो. हत्ती आणि उंदरावर ? हे अगदीच अनपेक्षित आणि कल्पनेपलिकडचे आहे. पण यांचा अर्थ अगदी गहिरा आहे.
उंदीर बंधनात अडकवून ठेवणाऱ्या दोरीला कुरतडून टाकतो. उंदराचे वस्तू कुरतडून टाकणे म्हणजे एखाद्या मंत्राने अज्ञानाची पानेच्या पाने फाडून टाकण्यासारखे आहे, शिवाय तो हत्तीलाही पाठीवर वाहून नेतो. मिट्ट काळोखात एखाद्याच प्रकाश किरणाची गरज असते जो उजेड पसरवेल. आपले अज्ञान दूर करेल. जास्त कशाची गरज नसते, केवळ ती एक लहानशी सजगता.
मोदक म्हणजे परमानंद
गणेशाच्या हातातील ‘मोदक’ म्हणजे परम आनंदाची प्राप्ती होय. तसेच, त्याचा एक हात, त्याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या आणि त्याला शरण जाणाऱ्यांना आशीर्वाद दर्शवितो. अशाप्रकारे, गणेशाच्या हातात पुस्तके नाहीत (इतर काही देवतांप्रमाणे) परंतु हातात मोदक आहे, जे परम आनंदाचे प्रतीक आहे.
ज्ञानाने आनंद मिळावा. हे खरे ज्ञान आहे जे तुम्हाला प्रकाश देते. हे काही इतके जड नाही की तुम्हाला काही ज्ञान ऐकू येते आणि तुम्ही गोंधळून जाता. ज्ञान मुक्त करते. तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. मोदक हेच सूचित करतो.
जीवनात कोणतेही अडथळे येऊ नयेत अशी आशा न ठेवता, जीवनातील प्रत्येक गोष्ट जीवनाचा एक भाग म्हणून स्वीकारली पाहिजे आणि भूतकाळात अडकून न रहाता किंवा भविष्याची चिंता न करता तुम्ही पुढे जात रहा. जीवनातील प्रत्येक क्षण पूर्णपणे साजरा करा. हेच शहाणपण, हेच ज्ञान!!
केवळ ज्ञानच तुमच्यातील आनंद आणि हर्ष जिवंत ठेवू शकते. जर कोणी दुःखी असेल आणि त्याचा चेहरा पडलेला असेल तर याचा अर्थ ते त्यांच्या ज्ञान शक्तीचा उपयोग करत नाहीत. जर तुम्हाला ज्ञान असेल तर तुम्हाला नैराश्य येऊ शकत नाही.
थोडक्यात, त्याच्या हातातला मोदक खऱ्या ज्ञानाच्या आनंदी स्वरूपाचे प्रतीक आहे, जे आपल्या चेतनेमध्ये हळुवारपणा, आनंद आणि स्वातंत्र्य आणते.
पाश आणि अंकुश
गणेशाची शस्त्रे देखील प्रतिकात्मक आहेत, त्याच्या हातात ‘अंकुश’ असतो, हत्तीला सजग करण्यासाठी वापरण्यात येणारे हत्यार ; हे सजगता निर्माण करणे दर्शवते. आणि ‘पाश‘ म्हणजे नियंत्रण दर्शवणारे. आता सजगते मुळे, भरपूर ऊर्जा निर्माण होते , जी योग्य मार्गदर्शनाशिवाय भरकटू शकते. ‘पाश’ किंवा दोरी म्हणजे स्वत:ला शिस्तीत बांधून घेणे.
पोटाभोवती बांधलेला नाग
आता, गणेशाचे चित्रण नेहमी मोठ्या पोटाने केले जाते; त्याचे मोठे पोट औदार्य आणि संपूर्ण स्वीकृती दर्शवते. कथा अशी आहे की एके दिवशी, गणेशाने इतके दूध प्यायले की त्याचे पोट फुटले, म्हणून त्याने एक नाग धरला आणि त्याच्या पोटाभोवती बांधला. यातून हे सूचित होते की सखोल जाणीवेशिवाय लोक आणि परिस्थिती (मोठे पोट) जशी आहे तशी स्वीकारणे फारसे उपयोगाचे नाही. हे म्हणजे आपण झोपेत असताना लोकांना स्वीकारण्यासारखे आहे ! ते तर सोपे आहे ! पण, जागेपणी ? नाग हा सतर्कतेचे प्रतीक आहे, खरी स्वीकृती आणि प्रेम आहे.
तसेच, आपण आपली सर्व दुःखे आणि त्रास दूर्वारूपात गणेशाला अर्पण करतो.
नमन आणि आशीर्वाद
गणेशाचा वर उचललेला हात (‘अभय‘ मुद्रा, संरक्षण दर्शविणारा) म्हणजे ‘भिऊ नकोस – मी तुझ्या पाठीशी आहे’ असे सांगणारा आहे, आणि त्याचा दुसरा हात तळहात बाहेरील बाजूस (‘वरद‘ मुद्रेमध्ये, आशीर्वाद देत आहे) म्हणजे – नेहमी देणारा हात देखील आहे. तसेच नतमस्तक होण्याचे सूचित करत आहे.
आपल्या आई-वडिलांना साष्टांग प्रणाम करण्याचा प्रयत्न करताना गणेशाला हसत असलेल्या चंद्राचे चित्र अनेकदा पाहायला मिळते. येथे, चंद्र मनाचे प्रतीक आहे. मन बुद्धीला हसत आहे.
सारांश
आज जग उदास आहे कारण त्यात सूज्ञपणाचा अभाव आहे. स्त्री आणि पुरुष दोघांनीही जागे होऊन सर्व काही बदलत आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे. सर्व काही बदलत आहे या जाणीवेने, आपण काहीही धरून ठेवू शकत नाही आणि काहीही धरून ठेवण्यासारखे नाही. असे काहीतरी आहे जे नेहमी तुमच्याबरोबर असते याची तुम्हाला जाणीव होते. निर्दोष, निष्कलंक असा आत्मा जो अनंतकाळ असतो तोच तुम्ही आहात.
श्री गणेशाचे रूप, ज्ञान आणि संतुलनाचा एक विशेष मार्ग सूचित करते. ही चिन्हे धार्मिक सीमांच्या पलीकडे जातात आणि संपूर्ण सृष्टीसाठी ती महत्वाची आहेत. हे अज्ञान दूर करण्यासाठी, बदल स्वीकारण्यासाठी आणि जीवनातील आव्हानांमध्ये संतुलन शोधण्यासाठी ज्ञानाच्या सामर्थ्याची आठवण करून देते. खऱ्या ज्ञानाद्वारे, आपण शहाणपण जोपासू शकतो, प्रत्येक क्षण साजरा करू शकतो आणि परिपूर्ण जीवनाचा स्वीकार करू शकतो.
आर्ट ऑफ लिव्हिंग च्या कार्यक्रमांमध्ये ज्ञानशक्ती अनुभवा.
परिवर्तनाच्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी आणि प्राचीन ज्ञानाची तुमची समज वाढवण्यासाठी, आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा! हे कार्यक्रम प्राचीन अशी प्रभावी साधने आणि तंत्रे सांगतात,जी लोकांना त्यांची खरी क्षमता शोधण्यासाठी, आंतरिक शांती शोधण्यासाठी आणि अधिक संतुलित आणि परिपूर्ण जीवन जगण्यासाठी सक्षम बनवतात.
भगवान गणेशाच्या प्रतीकात्मकतेत मिसळून जा आणि जाणीव आणि कृपेने जीवननौका वल्हवत असताना बुद्धीला तुमचा मार्ग दाखवू द्या. तुमचा आनंदाचा प्रवास सुरू करा !!