हिंदू पौराणिक कथांमध्ये एक कथा आहे. भगवान विष्णूंची त्यांच्या रागाबरोबर झालेल्या युद्धाची कथा. भगवान विष्णूंच्या कानातील मळापासून निर्माण झालेले मधु आणि कैटभ नावाचे दोन दैत्य होते. ते विष्णूला खूप त्रास देऊ लागले. मधु म्हणजे राग आणि कैटभ म्हणजे द्वेष. भगवान विष्णूने त्यांच्या बरोबर हजारो वर्षे युद्ध केले पण ते त्यांच्यावर विजय प्राप्त करू शकले नाही.
स्वनिर्मित राग आणि द्वेषाचा नाश ते स्वतः कसा बरे करू शकतील. म्हणून त्यांनी देवी मातेला आवाहन केले. जेव्हा दैवी चेतना जागृत झाली राग आणि द्वेषाचा नाश झाला/ राग आणि द्वेष वितळून गेले. पाण्याच्या सहाय्याने देवीने मधु आणि कैटभ याचा नाश केला. येथे पाणी म्हणजे प्रेम. पाणी प्रेमाचे प्रतिक आहे. प्रेमाच्या मदतीने दैवी चेतनेने राग आणि द्वेषाचा विनाश केला. जेव्हा चेतना प्रेमाने ओतप्रोत भरलेली असते तेव्हा राग व द्वेष शिल्लक राहात नाही. फक्त दैवी प्रेम उरते.
राग व द्वेष ऐकण्यातून उत्पन्न होतात. उत्पत्ती करणारा ब्रम्हा आणि विनाश करणारा शिवा दोन्ही ऐकत नाहीत. ते त्यांचे काम करतात आणि निघून जातात. जो जगाचा कारभार सांभाळतो त्या विष्णूला सगळ्यांचे ऐकावे लागते आणि त्याच वेळी राग दिसून येतो.
लोक का भांडतात-भांडणाचे मूळ कारण
लोक भांडतात कारण त्यांना वाटते मीच बरोबर आहे. आणि ही भावना त्यांना भांडण्यासाठी शक्ती देते. मी चूक आहे अशी भावना निर्माण झाली तर त्यांना भांडण्याची शक्ती नसते.
“मीच बरोबर” या मर्यादित आणि संकुचित दृष्टिकोनामुळे जगाची खूप हानी झाली आहे. जगामध्ये जी काही युद्धे झाली ती सर्व ह्या कारणाने झाली आहेत.
जर आपण आपला दृष्टिकोन विस्तृत मधे बदलून सत्याचे तटस्थपणे निरीक्षण केले, तर आपल्याला वेगळे चित्र दिसेल. तुमचे सदाचरण / प्रामाणिकपणा / धार्मिकता फक्त मनाची संकल्पना आहे. खरे कारण त्याहून वेगळे आहे. खरे आणि अंतिम कारण काय आहे हे जाणून घेण्यात बुद्धीमानी / शहाणपणा आहे.
आजच्या काळात आपल्याला राग आणणाऱ्या अशा कितीतरी गोष्टी आहेत. आणि रागाच्या पाठोपाठ अपराधीपणा, हिंसा, दुःख आणि द्वेष येतात. नंतर ही शृंखला तोडणे खूप कठीण होते.
-
रागाला कसे सामोरे जायचे यासाठी पाच युक्त्या
रागीट लोकांना फटाक्याप्रमाणे समजा. कोणत्याही रागीट व्यक्तीला फटाके समजा. आपण दिवाळीच्या वेळी फटाका लावतो आणि लांब पळून जाऊन त्याची मजा बघतो. काही वेळाने तो विझून जातो. रागीट माणूस पण असाच असतो.
पण आपण काही फटाके घरात फोडत नाही किंवा फटाक्यांच्या जवळ काही मौल्यवान वस्तू ठेवत नाही. रागीट व्यक्तीच्या आजूबाजूला काही मौल्यवान वस्तू नाही ना याची खातरजमा करून घ्या. याची काळजी घ्या.
रागीट/ क्रोधी लोक नसतील तर या जगात काही मजा येणार नाही. म्हणून स्वतःचे त्यांच्यापासून संरक्षण करत लांबूनच त्यांची मजा बघा. पण त्यात गुंतून जाऊ नका मग तुम्हाला मजा येईल.
-
जाणीवपूर्वक रागावर विजय प्राप्त करा.
जर तुम्हाला राग आला आणि तुम्ही तो व्यक्त केला नाही तर तुमची घुसमट होईल आणि जर व्यक्त केला तर तुम्हाला अपराधी वाटेल. दोन्ही बाजूंनी आपल्याला आपले संरक्षण करता यायला पाहिजे. जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघा.
तुमची भावना एखाद्या केकवरील रंगीबेरंगी डिझाईन असलेली सजावट आहे असे समजा.जसे सजावटीला आतमध्ये काय आहे याने काही फरक पडत नाही, त्याप्रमाणे तुमची भावना तुम्हाला कोणत्याही बंधनात अडकवणार नाही किंवा अपराधीपणा जाणवणार नाही. जेव्हा तुम्ही सजगअसता /तुमची चेतना जागृत असते तेव्हाच हे घडू शकते.
नवरात्रीच्या काळात आपण सत्संग करतो, उपवास करतो त्यामुळे मन भक्ती च्या लहरींमध्ये तल्लीन होऊन जाते. अशा प्रकाराने आपण रागासारख्या नकारात्मक भावनांना टाळू शकतो.
-
आक्रमक भावनांचा सामना करण्यासाठी तुमच्या सामर्थ्याचा वापर करा.
तुम्ही आक्रमक का होता? जेव्हा कुणीतरी तुमच्यापेक्षा मोठा आहे असे तुम्हाला वाटते तेव्हा तुम्ही आक्रमक होता बरोबर ना ! थोडा विचार करा तुमच्यापेक्षा खरोखरच कोणी मोठा आहे किंवा अगदी नगण्य आहे त्यावेळी तुम्ही आक्रमक होत नाही , पण जेव्हा ती व्यक्ती तुमची बरोबरी करते असे वाटते किंवा अगदी थोडी मोठी किंवा लहान आहे असे वाटते तेव्हा तुम्ही आक्रमक होता. हे फक्त तुम्हाला तुमच्या शक्तीची जाणीव नसल्यामुळे होते. उठा,जागे व्हा! तुमची शक्ती ओळखा आणि बघा तुम्ही कुणावर आक्रमक होत आहात!
एखादा डास जेव्हा तुम्ही मारता तेव्हा तुम्ही आक्रमक होत नाही, कारण तुम्हाला माहीत आहे की तो तर एक साधा डास आहे आणि तुम्ही त्याला काही महत्त्व देत नाही. याच प्रमाणे तुम्ही तुमच्या सामर्थ्याची जाणीव करून घ्या.
-
थोडा अव्यवस्थितपणा मनाच्या स्वास्थ्यासाठी चांगला असतो.
जास्त व्यवस्थितपणा अपेक्षित असल्याने तुम्हाला राग येतो व मन हिंसक बनते. मग तुम्ही त्याचा स्वीकार करू शकत नाही तुमच्यासाठी ते कठीण होते. कधीकधी काही गोष्टी आपल्या योजनेप्रमाणे होत नाही. तुम्हाला त्याचाही सामना करायला तयार राहावे लागेल.
अपूर्णते साठी किंवा अव्यवस्थित पणा साठी थोडी जागा ठेवा. हे पण फार आवश्यक आहे त्यामुळे तुमच्यामध्ये एक संयम येईल. जसजसा संयम वाढेल तसतसा राग कमी होईल. आणि हिंसा पण कमी होईल.
-
ज्ञानाच्या ढालेने प्रेमाचे रक्षण करा.
ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता ती व्यक्ती जेव्हा तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही तेव्हा तुम्ही दुखावले जाता. रस्त्यावरच्या कुणी अनोळखी व्यक्ती मुळे तुम्ही दुःखी नाही होत.
पण जेव्हा एखादी जवळची व्यक्ती किंवा जिच्यावर तुम्ही प्रेम करता अशी व्यक्ती तुमच्याकडे बघून हसली नाही, अभिवादन केले नाही तर तुम्हाला वाईट वाटते. तुम्ही कठोर होता आणि क्रूर वागता.
प्रेम ही एक खूप छान व नाजूक भावना आहे. ती खूप लवकर दुखावली जाते आणि मग ती द्वेष, राग, दोष, नाराजी, कडवटपणा व मत्सर यात परिवर्तित होते.
ही नाजूक अशी भावना दुखावली जाऊ नये म्हणून तुम्ही काय कराल? त्यासाठी ज्ञान हीच एक योग्य ढाल आहे. ज्ञानाच्या ढालेने प्रेमाची पवित्रता अबाधित राहते व आपण सर्व विकारांपासून दूर राहतो. संतांचे प्रेम नेहमी पवित्र असते कारण त्याला ज्ञानाचे कवच मिळालेले असते.
तुम्ही जेव्हा तुमची साधना वाढवाल, तेव्हा एका सुक्ष्म स्तरावर ह्या प्रेमभावनेचा अनुभव घ्याल.
राग कधी चांगला असतो?
कधीच न रागावणे शक्य आहे का?
तुमचा अनुभव काय आहे ? जेव्हा तुम्ही अगदी लहान होता तुमच्या हातातून चाॅकलेट घेतले तरी तुम्ही रागावला असाल. शाळेमध्ये,काॅलेजमध्ये किंवा कार्यालयात वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या वेळी रागावला असाल. आपल्या सर्वांना राग येतो. मुद्दा हा आहे की तुम्ही त्यातून किती लवकर बाहेर येता. तीनं गोष्टी ते ठरवतात.
- पहिला घटक म्हणजे तुमच्या रागाची वारंवारता. तुमच्या रागाची वारंवारता किती आहे ती तुमच्या ताकदीच्या व्यस्त प्रमाणात असते. जेवढे तुम्ही कमजोर असाल, तेवढे तुम्ही लवकर रागावता. जर तुम्ही खंबीर असाल तर तुम्हाला कमी राग येईल. म्हणून तुमची ताकद कशात आहे ते बघा. आणि ती वाया का घालवता?
- दुसरा घटक म्हणजे तुमचा दृष्टीकोन. तुम्ही आजूबाजूच्या लोकांना किती चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकता.
- तिसरे म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीची किती आसक्ती किंवा ओढ आहे? रागाच्या मागे जर तुम्ही मजा शोधण्याचा स्वभाव, चैन,अहंकार असेल, तर तुमची प्रतिक्रिया वेगळी असेल आणि रागाच्या मागे काही योग्य कारण असेल तर तुमची प्रतिक्रिया वेगळी असेल.जर गोष्टी व्यवस्थित होण्यासाठी किंवा त्या राहाव्या म्हणून तुमचा राग असेल तर तो योग्यच आहे.
म्हणून राग नेहमीच वाईट नसतो. रागाचा कधीतरी वापर केला तर तो योग्य आहे पण जर तुम्ही जर रोज रागावत राहिला तर त्याची काही किंमत राहात नाही. खरं तर नेहमी रागावणे , तुमची किंमत कमी करते. म्हणून रागाला तुमचा वापर करू देऊ नका. याउलट तुम्ही त्याचा सकारात्मक बदलासाठी वापर करा.
सहज समाधी ध्यान तुम्हाला तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी वळविण्यासाठी मदत करेल. व तुम्हाला एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाईल .सकारात्मक, चिंतनशील आणि उर्जात्मक स्तरावर.