प्रोजेक्ट पवित्रा
पौगंडावस्थेतील मुलींमध्ये मासिक पाळीच्या काळातील आरोग्य आणि स्वच्छता याबद्दल जागरुकता आणणे.

आव्हान
भारतीय समाजामध्ये मासिक पाळीसंबंधी बोलणे अजूनही निषिद्ध मानले जाते.

धोरण
ग्रामीण भाग आणि शहरी झोपडपट्ट्यांमध्ये प्रकल्प राबवून सजगता आणणे.

उपक्रम
ग्रामीण समाजातील २ लाख पेक्षा जास्त मुलींना मासिक पाळीतील आरोग्याबद्दल संवेदनशील बनवणे.
सारांश
सांस्कृतिक आणि सामाजिक घटकांमुळे पौगंडावस्थेतील मुलींपर्यंत मासिक पाळीच्या काळातील आरोग्य व स्वच्छतेबद्दल शिक्षण पोहोचवण्यास अडथळे येतात. अनेक माता मासिक पाळीविषयी बोलण्यास संकोच करतात. तसेच त्यांच्याकडे पौगंडावस्थेविषयी (Puberty) शास्त्रीय माहिती नसते. जरी त्यांच्याकडे सजगता असली तरीही भारतातील स्त्रिया क्वचितच मासिक पाळीसंबंधी समस्यांसाठी वैद्यकीय मदत घेतात.
घरी तसेच शाळेत असलेली माहितीची अनुपलब्धता आणि लज्जा यामुळे अनेक मुलींना मासिक पाळी, त्या काळातील शारीरिक बदल आणि स्वच्छतेच्या योग्य पद्धती याबाबत माहिती मिळत नाही. मासिक पाळीमुळे मुलींवर अनेक सामाजिक बंधने येतात ;वेगळ्या अपेक्षा केल्या जातात आणि त्यामुळे त्यांचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ति यावर आघात होतो.
मासिकस्रावाबद्दलच्या अपुऱ्या माहितीमुळे श्वसनसंस्था आणि पुनरुत्पादन संस्थेचे आजार होऊ शकतात. त्यामुळे यौवनारंभापासूनच सकारात्मक वृत्ती आणि योग्य स्वच्छता या गोष्टींना प्रोत्साहन देणे मुलींचे आरोग्य, शिक्षण आणि प्रतिष्ठेसाठी आवश्यक आहे.
जागरुकता कार्यक्रमाची उद्दिष्टे

जागरुक करणे
मुलींना मासिक पाळी ही सामान्य गोष्ट आहे याची जाणीव करुन देणे

निषिद्धपणा दूर करणे
मासिक पाळीमध्ये आरोग्य आणि स्वच्छता यांचे व्यवस्थापन करणे; त्याचबरोबर ‘ही बाब सामाजिक दृष्ट्या निषिद्ध आहे’ हा समज घालवणे

जीवनशैली बदलणे
पौष्टिक आहार घेणे आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी जीवनशैलीत बदल करणे.

आत्मविश्वास निर्माण करणे
महिला म्हणून विश्वास;अभिमान व आदराची भावना मनावर ठसवणे.
धोरण
संशोधन आणि सल्लामसलत करुन, तसेच आमच्या योग आणि आयुर्वेद तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार सलग तीन दिवसांच्या (दररोज ९० मिनिटे) प्रशिक्षण वर्गाची रचना केली आहे. या प्रशिक्षणामध्ये ११ ते ४५ वयोगटातील मुली व स्त्रियांच्या मासिक पाळीच्या दिवसांतील स्वास्थासंबंधी प्रश्न हाताळले जातात.
प्रशिक्षण वर्गामध्ये मुलींना मासिक पाळीमध्ये निर्माण होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक तणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी पुढील गोष्टी शिकवल्या जातात:
- प्राणायाम हे मासिक पाळी येण्यापूर्वी निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी (वाढणारी चिडचिड, पोटात गोळा येणे आणि वेदना).
- मासिक पाळीपूर्वी होणारे त्रास, कमी किंवा जास्त रक्तस्त्राव होत असेल तर त्यासाठी योगासने
- मासिक पाळीत आरोग्य चांगले रहावे आणि कमी झालेली पोषक तत्वे भरुन यावीत यासाठी योग्य आहार (रक्तक्षय आणि थकवा टाळण्यासाठी त्या त्या भागातील उपलब्ध अन्नाचा वापर करणे)
- मुलींना या नैसर्गिक घटनेशी संबंधित मिथक आणि अंधश्रद्धा खेळकरपणे दूर करण्यात मदत करण्यासाठी खेळ आणि नाटूकल्या.
- स्थानिक संसाधनांचा वापर करून मासिक पाळीदरम्यान पुरेशी स्वच्छता राखणे.
या सर्वसमावेशक कार्यक्रमात मासिक पाळीसंबंधी संपूर्ण माहिती, स्वच्छता, उपलब्ध उत्पादने, त्यांची विल्हेवाट, उपचार याबद्दल संपूर्ण माहिती मिळते. त्यामुळे मुली आणि महिला कार्यक्षम बनून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो, त्यामुळे त्या जाचक अशा सामाजिक व सांस्कृतिक बंधनांना यशस्वीपणे सामोऱ्या जाऊ शकतात.
सकारात्मक परिणाम
२८
भारतातील राज्ये
११
पेक्षा जास्त देश
७०००
पेक्षा जास्त प्रशिक्षक
२ लाखाहून
अधिक मुली आणि महिला सजग
पौगंडावस्थेतील मुलींसाठी स्वास्थ्य आणि स्वच्छता कार्यक्रम
या सजगता कार्यक्रमामध्ये, मुलीना मासिक पाळीच्या काळात कसे वागावे ; वैयक्तिक स्वास्थ्यासंबंधी माहिती आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे परस्परसंवादी पद्धतीने देणे, आकर्षक प्रशिक्षण पद्धती याचा अंतर्भाव आहे. तसेच याबद्दल असलेले गैरसमज आणि समाजातील तथाकथित निषिद्धपणा दूर करण्यासाठी माहिती दिली जाते. मासिक पाळीदरम्यान अनुभवास येणाऱ्या अस्वस्थतेपासून मुक्तीसाठी मुलींना योगासने आणि प्राणायाम शिकवले जातात.
मैंने अपने स्कूल में आयोजित मेन्स्ट्रुअल हेल्थ एंड हाइजीन वर्कशॉप में भाग लिया। इस कार्यक्रम में सिखाई गई योग और ध्यान प्रक्रियाओं का अभ्यास किया, अपनी छुट्टियों में भी। मैंने…

छाया
विद्यार्थी, गाँव पुरैनी, बिजनौर
अपने पीरियड्स के प्रारंभिक दिनों में मैं बहुत डरी डरी रहती थी, मुझे पेट में दर्द महसूस होता था जिसके कारण मुझे लगता था कि मैं किसी बीमारी से पीड़ित…

काव्या
विद्यार्थी, विशाखापटनम
आर्ट ऑफ लिव्हिंग, सामाजिक उपक्रम विभाग,
आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्र, २१ कि. मी , कनकपुरा रोड, बेंगलुरु, भारत.



