योग

योगासने शरीराला बळकट करण्यासाठी आणि आराम देण्यासाठी उत्तम आहेत, परंतु योगामध्ये त्यापेक्षाही बरेच काही आहे.

योग हा शब्द संस्कृत शब्द "युज" पासून उत्पन्न झाला आहे ज्याचा अर्थ "एकत्रित करणे किंवा एकत्र करणे" असा आहे. योग हे पाच हजार वर्षांपेक्षा जास्त प्राचीन असे भारतीय ज्ञान आहे. योग म्हणजे विविध प्राणायाम, योगासने आणि ध्यान यांच्या माध्यमातून शरीराचा मन आणि श्वास यांच्याशी सुसंवाद साधणे. जरी बऱ्याच लोकांना असे वाटत असले की योग म्हणजे एक शारीरिक व्यायाम प्रकार आहे ज्यामध्ये लोक अंग पिळतात, वाकवतात, ताणतात आणि अतिशय गुंतागुंतीचा श्वास घेतात परंतू माणसांचे मन आणि आत्म्याच्या असीम क्षमता उलगडण्याच्या या प्रगल्भ विज्ञानाचा हा केवळ सर्वात वरवरचा पैलू आहे.

योगाचे विज्ञान जीवनाच्या मार्गाचे संपूर्ण सार आत्मसात करते, ज्यामध्ये - ज्ञानयोग किंवा तत्त्वज्ञान, भक्ती योग किंवा भक्ती आनंदाचा मार्ग, कर्मयोग किंवा आनंदी कृतीचा मार्ग आणि राजयोग किंवा मन नियंत्रणाचा मार्ग. राजयोगाची आणखी आठ भागात विभागणी केली आहे. राजयोग प्रणालीच्या केंद्रस्थानीया विविध दृष्टीकोनांचे संतुलन आणि एकीकरण म्हणजेच योगासनाचा सराव आहे.

प्राथमिक आणि प्रगत शिबिरे

सुदर्शन क्रिया शिका