आरडाओरडा, गोंधळ, कोलांट्या उड्या, खाली डोकं वर पाय, मधेच जोरजोरात एक गाडी जातेय, पुलावरुन गाडी पुढे गेल्यावर मोठ्ठा आवाज होऊन पूल कोसळतोय, तेवढ्यात तिकडून मोठ्ठी गर्जना करत एक सिंह येतोय आणि मग, आणि मग हे सगळं एखाद्या ऍनिमेटेड फिल्म मधलं दृश्य वाटतंय ना? खरं तर हे एका सामान्य घरातलं नेहमीचं दृश्य आहे! अशा घरातलं; जिथे एक छोटा मुलगा या सिनेमाचा हिरो आहे! छोटी मुलं अशा कसरती जणू काही जन्मतः शिकून आलेली असतात! लहान बाळं योगाभ्यास जन्मापासून करत असतात. निरनिराळ्या मुद्रा ती नैसर्गिकपणे करत असतात. खरं तर, साधी साधी योगासने मानवी शरीरातच अंतर्भूत झालेली असतात असे दिसून येते.
जर तुम्ही अगदी लहान बाळाचं निरीक्षण केलं तर तुम्हाला ते छान योगासनं करतंय असं दिसून येईल. झोपलेलं बाळ अनवधानाने अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करत ‘चिन मुद्रा’ करताना दिसतं. सहा महिन्यांचं बाळ वारंवार भुजंगासन करत असतं. तर अधोमुख श्वानासन हे लहान मुलांचं बारमाही आवडतं आसन आहे.
लहान मुलांसाठी योगाचे फायदे – मुलांचे योगाचे वर्ग कशासाठी आहेत?
दुर्दैवाने, आजकाल मोठ्यांनी मुलांसारखं लहान होणं सोपं राहिलेलं नाही.
हल्ली मुलांचा बहुतेक वेळ गृहपाठ आणि शाळेशी संबंधित अतिरिक्त उपक्रमांमध्ये जातो. त्यांना मोकळेपणाने खेळण्यासाठी अगदी थोडा वेळ मिळतो. त्यांना आयुष्यात खूप लवकर आकर्षणं, लक्ष विचलित होणं, तसेच शैक्षणिक आणि आपल्या सोबत्यांचा दबाव याला सामोरे जावं लागतं. त्यांना नेहमी असुरक्षित वाटत असतं म्हणून ती घाबरलेली असतात. योगामुळे मुलांना या दबावाच्या वातावरणातून बाहेर पडण्यास मदत होते. तसेच त्यांची ऊर्जा वाढते आणि आत्मविश्वास निर्माण होतो.
- योगामुळे शरीर, मन आणि श्वास याबद्दल आपण सजग होतो.
- मुलांचे अस्थिर झालेले मन स्थिर होण्यास मदत होते. लक्ष केंद्रित करण्याची सवय लागते आणि एकाग्रता वाढते.
- कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढते.
- मानसिक आणि शारीरिक थकवा दूर होतो. ऊर्जेची पातळी वाढते आणि सखोल विश्रांती देखील मिळते.
- मत्सर, भीती आणि राग यासारख्या नकारात्मक भावनांवर मात करण्यास मदत होते.
- स्वतःची सकारात्मक प्रतिमा निर्माण होते आणि आत्मविश्वास वाढतो. .
- श्वासाची आणि फुफ्फुसाची क्षमता वाढते.
- शरीरातील विविध स्नायूंना व्यायाम मिळतो, स्नायू ताणले जातात व मजबूत होतात.
- सकस आहार घेण्याची सवय लागते. ज्यांची मुले खाण्याच्या बाबतीत नखरे करतात आणि जंक फूड साठी हट्ट धरतात,अशांच्या पालकांसाठी ही दिलासा देणारी गोष्ट आहे.
- टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे वेड कमी होते
लहान मुलांसाठी योगासने
या योगवर्गांचे वातावरण आश्वासक असते, इथे कोणतीही स्पर्धा नसते, यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना या योग वर्गांचा खूप फायदा होईल. जर त्यांना घरी योगाभ्यास चालू ठेवायचा असेल तर खालील आसने उपयुक्त ठरतील.
वीरभद्रासन

- वीरभद्रासनामुळे हात आणि पायाचे स्नायू मजबूत होतात.
- शरीरातील संतुलन सुधारण्यास मदत होते.
- सामर्थ्य (स्टॅमिना) वाढते.
वृक्षासन

- वृक्षासना मुळे हाताना आणि पायाना ताण मिळतो व तेथील स्नायू मजबूत होतात. मुले वेगवेगळ्या शारीरिक क्रियांचा आनंद घेऊ शकतात.
- पाठ बळकट होण्यास मदत होते, त्यामुळे उंची वाढते.
- एकाग्रता वाढते आणि लक्ष केंद्रित होण्यास उपयोग होतो. गृहपाठ करण्यासाठी नक्कीच मोठी मदत होते.
- मन व शरीर यांचे संतुलन वाढते.
सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार शिकल्याने मुलांचे शरीर व मन निरोगी राहण्यास मदत होते. मुलांसाठी सूर्यनमस्कार घालणे का आवश्यक आहे ते जाणून घ्या.
धनुरासन

- धनुरासनामुळे हात आणि पायांचे स्नायू मजबूत होतात.
- पाठ मजबूत आणि लवचिक बनते.
- तणाव आणि थकवा दूर होण्यास मदत होते.
सर्वांगासन

- सर्वांगासनामुळे मेंदूकडे रक्तप्रवाह वाढतो, मेंदूचे पोषण होते.
- हात आणि पाय मजबूत होतात.
- पाठीचा कणा लवचिक राहतो,त्यामुळे सर्व शारीरिक हालचाली सहजपणे होतात.
शवासन

- शवासनामुळे शरीर ताजेतवाने होते.तणाव आणि थकवा दूर होतो.
- मन शांत होते, एकाग्रता वाढते.
- रक्ताभिसरण चांगले होते त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते .
प्रत्येक मुलामध्ये सर्जनशीलता असते आणि योग आणि ध्यानाच्या सरावाने ते आपली सर्जनशीलता चांगल्या प्रकारे अभिव्यक्त करु शकतात.
~ गुरुदेव श्री श्री रवि शंकर
मुलांसाठी योगाचे वर्ग
आर्ट ऑफ लिव्हिंग मुलांसाठी असे कार्यक्रम आयोजित करते ज्यात त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर होतो तसेच त्यांची निरागसता टिकवून ठेवली जाते.
१. उत्कर्ष योग
वयोगट : ८ ते १३ वर्षे
उत्कृष्टतेचे हे सर्वांगीण प्रशिक्षण आहे.(उत्कर्ष योग कार्यक्रम मुलांसाठी संवादात्मक, साहसी आणि मनोरंजक कार्यशाळा आहे.)
- लहान मुलांना ध्यान आणि प्राणायाम शिकवले जातात,आपल्या भावनांच्या चढउताराला तोंड देण्यास त्यामुळे मदत होते. .
- लक्ष आणि एकाग्रता वाढते, तसेच आत्मविश्वास वाढतो.
- सर्वांगीण आरोग्य सुधारते.
- उत्कर्ष योग शिबिरामुळे मुलांमध्ये चांगली जीवन मूल्ये रुजली जातात.
- पालकांना आपले मूल आनंदी राहील अशा प्रकारे संगोपन करण्यास मदत होते.
उत्कर्ष योग कार्यक्रम तुमच्या जवळपास आहे…
२. मेधा योग (पहिला स्तर)
वयोगट : १३ ते १७ वर्षे
युथ एम्पॉवरमेंट सेमिनार (मेधायोग) हा किशोरवयीन मुलांसाठी आहे.
- यात किशोरवयीन मुलांना गटचर्चा आणि सांघिक खेळांद्वारे अभ्यासपूर्ण निवड करण्यासाठी मार्गदर्शन मिळते.
- मेधा योग कोर्स मुळे आत्मविश्वास आणि समस्या सोडवण्याची वृत्ती अंगात भिनली जाते.
मेधा योग कार्यक्रम तुमच्या जवळपास आहे.
३. अंतर्ज्ञान प्रक्रिया (प्रज्ञा योग)
वयोगट: ५ ते १८ वर्षे
- आर्ट ऑफ लिव्हिंग प्रज्ञा योग किंवा अंतर्ज्ञान प्रक्रिया मुलांसाठी २ गटांमध्ये उपलब्ध आहे. गट १ हा ५ ते ८ वर्षांच्या मुलांसाठी आणि गट २ हा ८ ते १८ वर्षांच्या मुलांसाठी आहे.
- मेंदूला चालना देणारे खेळ, ध्यान आणि विश्रांती या तंत्रांद्वारे मुलांची जीवन कौशल्ये विकसित होतात.
अंतर्ज्ञान प्रक्रिया:
- अंतर्ज्ञान सुधारते.
- संवेदनक्षमता वाढते.
- जागरुकता आणि दूरदृष्टी सुधारते.
- आत्मविश्वास वाढतो.
- बुद्धिमत्ता वाढते.
- स्पष्टपणे आठवण्याची क्षमता (फोटोग्राफिक मेमरी) विकसित होते.
- अज्ञाताची भीती दूर होते.
तुमच्या जवळपास आगामी अंतर्ज्ञान प्रक्रिया कार्यक्रम शोधा!
मुलांसाठी योगाचे वर्ग लावण्यासाठी काही सल्ले
- मुलांच्या योगाचे वर्ग त्यांच्या झोपण्याच्या/खेळण्याच्या वेळेत नाहीत याची खात्री करा. नाहीतर मुले योग वर्गाला जायची टाळाटाळ करु शकतात!
- आसने कशी करायची हे सांगण्यापेक्षा त्यांचे प्रात्यक्षिक करुन दाखवा. मुले कानांपेक्षा त्यांच्या डोळ्यांनी चांगले अनुसरण करतात.
- मुलांना आव्हान द्या. त्यांना सामान्यतः स्वतःहून थोडे जास्त करायला आवडते. उदाहरणार्थ, तुम्ही त्यांना कालच्यापेक्षा आज थोडे आणखी खाली वाकण्यास सांगू शकता.
- मुलांची तुलना त्यांच्या जवळच्या मित्रांशी करणे टाळा. “तुझ्या मित्रापेक्षा चांगलं कर ” असे त्यांना म्हणण्यापेक्षा “तू काल केलंस त्यापेक्षा आज जास्त चांगलं कर ” हे वाक्य जास्त सकारात्मक आहे.
मुलांचे संगोपन करण्याची कला रंजक आणि आव्हानात्मक आहे. तुमच्या मुलांना योगाची ओळख करुन द्या. तशीही बहुतेक मुलांना योगासने मजेदार वाटतात. शरीर वळवणे आणि वाकवणे त्यांना आव्हानात्मक वाटते. तुम्हाला माहितही नसेल, मुलं कदाचित त्यांची स्वत:ची आगळीवेगळी आसनं करायला लागतील!