समृद्ध जीवन जगण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती अत्यावश्यक आहे. शरीर जर निरोगी नसेल तर मन आनंदी रहात नाही, हे महिलांना चांगले माहिती आहे. महिला रोज वेगवेगळ्या प्रकारची भूमिका निभावतात. निसर्गाने लहान मुलांना जन्माला घालायची खूप मोठी जबाबदारी महिलांना दिली आहे. ती जबाबदारी आनंदाने पेलण्यासाठी ताकद, उत्साह, संयम या गोष्टी ही निसर्गाने दिल्या आहेत.
जेव्हा घरातील स्त्री आजारी पडते तेव्हा घरातील सर्वच कामे थांबतात. तारा म्हणते “आजारपणामुळे माझ्या आयुष्यात हळूहळू अडथळे येऊ लागले. तेव्हा मी खूपच अस्वस्थ झाले. पाठदुखी, सायटिका, जठराच्या समस्या, सारखे मायग्रेन अटॅक यांमुळे मी चक्रावून गेले. घराकडे लक्ष दिले गेले नाही, मुलांकडे दुर्लक्ष झाले, पण माझ्याकडे काही पर्यायच नव्हता. जीवन ओझे वाटायला लागले. तेव्हा मी एका डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी मला योग आणि प्राणायाम करायला सांगितले तेव्हा मला आश्चर्यच वाटले. सुरवातीला मला औषध घेऊन बरे वाटायचे, पण आता काहीतरी नवीन सुरु करण्याची वेळ आली होती.”
ताराला कळून चुकले की शारीरिक तंदुरुस्तीला प्राधान्य देणे किती महत्वाचे आहे ते, आणि त्यासाठी तिने आपले दैनंदिन वेळापत्रक तयार केले. तिला आश्चर्य वाटले की आपल्या व्यस्त जीवनातून तंदुरुस्तीसाठी ती वेळ काढू शकली.
तारांच्या लक्षात आले की ती जन्मत:च एक योगी आहे. त्यावर तिचे श्री श्री योग प्रशिक्षक म्हणाले की कोणीच जन्मतः ताठ, निष्ठुर, असंवेदनशील नसते. नंतर ताराच्या असे लक्षात आले की प्रत्येकाला योग आणि प्राणायामाचे ज्ञान नैसर्गिकरित्या कसे अवगत असते. जे आपल्यात निसर्गतः आहेत, त्याच धड्यांची आपल्याला फक्त उजळणी करायची आहे.
तर मग वाट कशाची बघताय ? आपले योगासनाचे खास कपडे व साहित्य घ्या आणि आपल्या निरोगी आयुष्याकडे वाटचाल चालू करा! पण पहिल्यांदा, सराव चालू करण्याच्या आधी खालील काही विषयांवर आपल्या श्री श्री योग प्रशिक्षकाशी न विसरता चर्चा करा:
- आपले वय आणि अनुवांशिक समस्या ज्या नंतर उद्भवू शकतात किंवा आधीच आहेत.
- तुम्ही जर कोणाच्या मार्गदर्शनाखाली किंवा स्वतःची स्वतः काही औषधे घेत असाल तर त्याबद्दल माहिती द्या.
- एखादे व्यसन असल्यास त्याबद्दल सांगा.
- तुमच्या रोजच्या काही समस्या किंवा दुखणी असतील तर त्या प्रामाणिकपणे आपल्या योग प्रशिक्षकास सांगा. लक्षात घ्या प्राणायामच्या काही पद्धती व योगासने आपल्यात अलौकिक बदल घडवतात , पण काही आपल्या तब्येतीनुसार सुरवातीला न केलेलीच बरी असतात.
- आपल्याला काही मध्य वयातील समस्या किंवा रजोनिवृत्ती ची समस्या असेल तर त्या बद्दल सांगा.
- जर तुम्हाला योगासने करताना काही अस्वस्थता जाणवली तर ताबडतोब प्रशिक्षकांच्या निदर्शनास आणून द्या.
- तुमच्या आहाराच्या सवयी, जरी त्या चांगल्या नसल्या, आपल्या प्रशिक्षकशी बोलणे महत्वाचे आहे. कारण त्या अडथळा ठरू शकतात.
तुम्हाला अपेक्षित असलेले काही सकारात्मक बदल
- पहिल्या दिवशी, तुम्हाला नक्कीच चांगल्या बदलाचा अनुभव येईल. पण निरोगी व सुदृढ आयुष्यासाठी रोज नियमितपणे योग चालू ठेवा.
- सुरवातीलाच तुम्हाला दीर्घ श्वास घेण्याचे सकारात्मक फायदे आणि ‘ श्वास ‘ हा जीवनाचा किती महत्वाचा घटक आहे हे लक्षात येईल.
- ‘ओम’ चे उच्चारण केल्याने सकारात्मक तरंग निर्माण होतात, जे आपल्याला शांती आणि उत्साह देतात.
- आपले शरीर व मन हलके झाल्याने ऊर्जा वाढते आणि आपण नेहमी हसरे आणि आनंदी राहतो.
- आपण आपल्या नैसर्गिक गुणधर्माशी आणि संयमाशी जोडले जातो ,ज्यामुळे आपल्याला खूप छान वाटते.
- आपण दिवसाची सुरवात लवकर करायला लागतो.
- आपल्यात एक सकारात्मक आणि नवीन दृष्टिकोन तयार होतो, जो आपल्या आसपास च्या लोकांना जाणवतो.
- आपण स्वतःवर प्रेम करायला लागतो.
आता आपण काही व्यायाम प्रकार आणि योगासने जाणून घेऊयात:
सुरुवातीचा हलका व्यायाम
आपल्या जागेवर उभे राहून थोडावेळ हळू हळू जागच्या जागी पळायला लागा , चेहऱ्यावर थोडेसे हास्य येईल. त्यानंतर मान वर्तुळाकार फिरवा. त्यानंतर खांदे गोलाकार फिरवा, मनगट गोलाकार फिरवा, हात गोलाकार फिरवा, पाय पुढे – मागे फिरवा, गुडघे गोलाकार फिरवा. हे केल्याने वरील अवयव मोकळे होतील. त्याने आराम वाटेल.
मार्जारासन
- पाठीचा कणा लवचिक बनवते.
- मनगट आणि खांदे मजबूत करते.
- पचनक्रियेतील अवयवांना मसाज करते आणि पचनक्रिया चांगली राहते.
- पोटाचे स्नायू बळकट करते.
- मन शांत करते.
- रक्ताभिसरणात सुधारणा होते.
शिशुआसन
- पाठीला खोलवर विश्राम देते.
- बद्धकोष्टता घालवते.
- मज्जासंस्थेला विश्राम देते.
अर्ध चंद्रासन
- पाठीचा कणा, पार्श्वभाग, उदरातील स्नायू , पाय, गुडघे, घोटे यांना बळकटी देते.
- छाती आणि खांदे खुले करते.
- ताणतणाव कमी होतात.
- पचनक्रिया, शारीरिक संतुलन,अवयवांमध्ये समन्वय सुधारते.
नौकासन
- पाठीच्या आणि पोटाच्या स्नायूंना बळकटी देते.
- हाताचे आणि पायाचे स्नायू बळकट करते.
भुजंगासन
- ताण तणाव, चिंता, नैराश्य घालवते.
- पायाच्या व पाठीच्या जडत्वापासून मुक्त करते.
- पाठीचे, पोटाचे व मानेचे स्नायू बळकट करण्यास मदत करते.
शलभासन
- पाठीच्या आणि पार्श्वभागातील मज्जातंतुंच्या दुखण्यातून आराम देते व तणाव दूर करते.
- भूक व्यवस्थित लागते व पाठीचा भाग आणि मानेच्या भागात रक्त पुरवठा व्यवस्थित होतो.
- मांड्या व पोटातील स्नायून्ना बळकटी मिळते.
शवासन
- संपूर्ण विश्रांती देते.
- ध्यानाच्या स्थितीचा अनुभव येतो.
- शरीर पुनरुत्साहित होते आणि बरे वाटते.
लक्षात घ्या, आपण टाकलेले एक योग्य पाऊल आपल्याला व आपल्या कुटुंबाला सुद्धा निरोगी ठेवण्याचे वचन देते. त्यामुळे तुम्ही स्वतः तुमच्या मुलांसाठी, मित्रांसाठी, समाजासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व बना. तुमचे यश त्यांना नक्कीच योगाच्या मार्गावर येण्यास प्रेरित करेल. योग करा आणि जीवनाचा आनंद घ्या.
योगाचा रोज सराव केल्याने आपल्या शरीराला आणि मनाला अनेक फायदे होतात. पण योग हा काही औषधांना पर्याय नाही. योगासने एखाद्या प्रशिक्षित श्री श्री योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. जर तुम्हाला काही शारीरिक दुखणे किंवा आजार असेल तर योगासने करण्या अगोदर वैद्यांचा किंवा श्री श्री योग प्रशिक्षकांचा सल्ला घ्या. ” श्री श्री योग कार्यशाळा ” तुमच्या जवळच्या ‘ आर्ट ऑफ लिव्हिंग ‘ केंद्रावर जाऊन शोधा. जर तुम्हाला कार्यशाळेविषयी अधिक माहिती हवी असेल किंवा आपला अभिप्राय कळवायचा असेल तर खालील संकेतस्थळावर भेट द्या. info@srisriyoga.in