आपण ध्यान आणि प्राणायाम बद्दल खूप काही ऐकले असेल. हे प्राचीन विज्ञान भारतामध्ये ५००० ते ८००० वर्षापासून आहे, हे आपणास माहित आहे कां? हे  विज्ञान जेंव्हा पौर्वात्य प्रदेशात निर्माण झालेल्या वनौषधींचे विज्ञान म्हणजेच आयुर्वेदासमवेत समाविष्ट होते तेंव्हा ते पिढ्यान पिढ्या मानवाच्या आरोग्यासाठी आणि सर्वांगीण स्वास्थ्यासाठी कारणीभूत ठरल्याचे दिसून येते. लाखो करोडो लोकांना या प्राचीन विज्ञानाचा लाभ झाला आहे परंतु दुर्दैवाने याचे वैज्ञानिक दस्तऐवज, दाखले आज रोजी आपल्याकडे उपलब्ध नाहीत. भारत सरकारने आत्ता आत्ता आयुर्वेदिक संशोधन केंद्राद्वारे हे एकत्र करणे सुरु केले आहे.

ध्यान आणि प्राणायामाचा पुन्हा विचार करता, आपण लहान बाळाचे जन्मापासून ते तीन वर्षाचे होईपर्यंत निरीक्षण केले आहे काय, ते बाळ सर्व योगासने करत असते. मात्र ते ओळखण्यासाठी आपण योग प्रशिक्षक न बनता फक्त सूक्ष्म निरीक्षण केले पाहिजे.

निरीक्षण केल्यास जाणवेल की, ती मुले पालथी पडून मान उंचावून भुजंगासन करतात. तर पाठीवर पडून हात आणि पाय जमिनीपासून वर उचलून नौकासन करतात. तीन वर्षांपर्यंत बहुतेक सर्व योगासने करतात. फक्त आपणास निरीक्षण करता यायला हवे. तसेच बाळांचे श्वसन देखील निराळे असते, ते नाभीपासून, खोल श्वसन करत असतात. आपल्या मनातील प्रत्येक भावना ही श्वासाच्या लयीशी निगडीत असते. जेंव्हा आपण आनंदी असतो तेंव्हा आपला श्वासाची लय ही दुःखी असताना असणाऱ्या श्वासापेक्षा भिन्न असते, हे आपल्या ध्यानात आले असेल. श्वासाचे तापमान, गती, वेग, लांबी आणि भागांशी हा भिन्न असते. श्वासाची गती बदलून विविध भावना कशा दर्शवायच्या, हे अभिनय शिकवताना देखील शिकवले जाते. म्हणजे आपल्या भावना या श्वासाशी तसेच शरीरातील काही अवयवाशी देखील संलग्न असतात.

योग मुद्रा कशा कराव्या आणि त्यांचे लाभ

बाळ जन्माला येताना ते एक विशिष्ट मुद्रा करून जन्मते, जिचे योगिक विज्ञान साहित्यामध्ये नांव आहे आदी मुद्रा. हाताचा अंगठा मुठीमध्ये घेऊन इतर बोटे अंगठ्याभोवती वाकवून मुठ बंद. आपण लक्ष दिले असेल तर आपल्या लक्षात आले असेल की लहान बाळं चिन मुद्रा (हाताचा अंगठा आणि तर्जनीचे टोक स्पर्श करत व इतर बोटे सरळ, लांब) आणि चिन्मय मुद्रा (हाताची तर्जनी आणि अंगठा स्पर्श करत इतर बोटे तळहातात वाकवून) मध्ये झोपतात. तसेच जेंव्हा ते अंगठा चोखतात तेंव्हा मेरुदंड मुद्रा (अंगठा सरळ ताठ आणि इतर बोटे वाकवलेली) करतात.

मुद्रांमुळे मेंदू मधील तसेच शरीरातील काही भाग उत्तेजित होतात. म्हणून लहान बाळे या विविध मुद्रा करतात. आपण पहिले असेल की एखाद्याला थंडी वाजत असेल तर ती व्यक्ती आपले अंगठे मुठीत, काखेत लपवून गरम ठेवण्याचा आपसुक पहिला प्रयत्न करत असते. खरे तर योगामध्ये अंगठ्याला फार महत्व आहे. असे म्हणतात की  आपण जर आपले अंगठे गरम ठेवले तर संपूर्ण शरीर गरम राहते. योगामध्ये असे म्हटले जाते की आपल्या बोटांची टोके ही ऊर्जा केंद्रे आहेत.

आपल्या शरीरात एकूण १०८ चक्रे आहेत, पैकी १२ महत्वाची आहेत, त्यातील सात फार महत्वाची आहेत. या चक्रांवर लक्ष ठेवल्याने आपण या चक्रांना उत्तेजित करतो, त्यांना विश्राम देतो.

1. चिन मुद्रा

  • अंगठा आणि तर्जनी यांची टोके एकमेकांना स्पर्श करत इतर बोटे सरळ पुढे करा.
  • अंगठा व तर्जनी यांची टोके अजिबात दाब न देता हलका स्पर्श करतील अशी ठेवा.
  • इतर तीन बोटे सरळ ताठ ठेवा.
  • मग हात छताकडे उघडे ठेवत मांडीवर ठेवा.
  • आत्ता, आपल्या श्वासाच्या प्रवाहावर आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिणामांवर लक्ष ठेवा.

चिन मुद्रेचे लाभ

  • शक्ती साठवून राहण्यासाठी तसेच एकाग्रता वाढण्यास मदत होते.
  • झोपेच्या गुणवत्तेमध्ये वृद्धी होते.
  • शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते.
  • कंबरेचे दुखणे कमी करते.
Chin mudra yoga mudra

2. चिन्मयी (चिन्मय) मुद्रा

  • या मुद्रेमध्ये अंगठा आणि तर्जनी एकमेकास स्पर्श करून त्याचा गोलाकार करतात, इतर तीन बोटे वळवून तळहातावर येतात.
  • पुन्हा हात छताकडे उघडे ठेऊन मांडीवर ठेवावे आणि खोल, सहज उज्जयी श्वास घ्यावे.
  • पुन्हा श्वासाचा प्रवाह आणि त्याचा परिणाम याकडे लक्ष ठेवावे.

चिन्मय मुद्रेचे लाभ

  • शरीरातील उर्जेच्या प्रवाहात वाढ होते.
  • यामुळे पचन क्रिया सुधारते.
Chinmay mudra yoga mudra

3. आदी मुद्रा

  • आदी मुद्रेसाठी अंगठ्याचे टोक करंगळीच्या पायथ्याशी ठेवा आणि इतर बोटे वळवून अंगठा झाका, हलकी मुठ बनवा.
  • पुन्हा हात छताकडे उघडे ठेवत मांडीवर ठेवा श्वसन सुरु ठेवा.

आदी मुद्रेचे लाभ

  • या मुद्रेमुळे मज्जा संस्थेस आराम मिळतो.
  • घोरणे कमी होण्यास मदत होते.
  • मस्तकामध्ये प्राणवायूचा प्रवाह वाढतो.
  • फुफ्फुसाची क्षमता वाढते.
Adi mudra yoga mudra

एक वर्षापूर्वी न्युयॉर्कमधील शास्त्रज्ञांनी हे प्रसिध्द केले आहे की एखादी व्यक्ती सलग आठ आठवडे वीस मिनिटे ध्यान करेल तर मेंदूच्या समस्त संरचनेमध्ये बदल होईल. मेंदूतील द्रव्य, जे ग्रे मॅटर नांवाने ओळखले जाते, त्यात वाढ होईल. हे खूप आश्चर्यकारक आहे. आपल्याला हे माहित असून फार पूर्वीपासून आपण याचा अनुभव घेत आलो आहे. आपण पहिले आहे की ध्यानामुळे व्यक्तीची मनोरचना बदलून जाते. यामुळे दिवसातील कोणत्याही वेळी त्यांना ताजे तवाने वाटते. आत्ता विज्ञानाने देखील हे सिद्ध केले आहे. म्हणतात ना, “विस्मयो योगभूमिका.” योगाची प्रस्तावनाच विस्मयी म्हणजे नवल युक्त, आश्चर्य युक्त आहे. जेंव्हा आपण आपल्या सभोवतीच्या सर्व गोष्टींकडे विस्मय भावनेने पहातो तेंव्हाच योगाच्या परिणामांचा प्रारंभ झाला, म्हणता येते.

आपण पहिले असेल की एखाद्याला थंडी वाजत असेल तर ती व्यक्ती आपले अंगठे मुठीत, काखेत लपवून गरम ठेवण्याचा आपसुक पहिला प्रयत्न करत असते. खरे तर योगामध्ये अंगठ्याला फार महत्व आहे. असे म्हणतात की  आपण जर आपले अंगठे गरम ठेवले तर संपूर्ण शरीर गरम राहते. योगामध्ये असे म्हणले जाते की आपल्या बोटांची टोके ही ऊर्जा केंद्रे आहेत.

आसनांचा लाभ म्हणजे शरीर निरोगी आणि सशक्त होते, श्वास कंपनरहित होतो, मन आनंदी होते, बुद्धिमता तीक्ष्ण होते, चेतनेमध्ये आत्मबोध होतो आणि अंतर्ज्ञानामध्ये वृद्धी होते. अनेक लाभ आहेत. म्हणून दिवसातील काही वेळ तरी आपण योग आणि ध्यान केलेच पाहिजे. योग म्हणजे एकमेकांशी संपर्काची कला आहे. लोकांशी जोडले जाण्याची ती कला आहे. आर्ट ऑफ लिविंगच्या आनंद अनुभूती शिबिरासारख्या विविध शिबिरांमधून योग आणि ध्यान बाबत आणखी शिकू शकता. आमच्या तज्ञ प्रशिक्षकांच्या मोफत ध्यान सत्रासाठी आत्ताच नोंदणी करा. योग सरावामुळे शरीर आणि मन यांच्या मध्ये सुधारणा होत असली तरी तो आपल्या औषधांना पर्याय होऊ शकत नाही. तज्ञ आणि प्रशिक्षित योग प्रशिक्षकांच्या निरीक्षणाखाली योग शिकणे आणि सराव करणे अत्यंत गरजेचे आहे. काही औषध उपचार सुरु असतील तर आपले डॉक्टर आणि श्री श्री योग प्रशिक्षक यांचा सल्ला घेऊनच योग सराव सुरु करा.


योग मुद्रांबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

आयुर्वेद म्हणतो, विश्वातील पाच तत्वांच्या असंतुलनामुळे रोग होतात. आपला अंगठा अग्नि तत्वाचे प्रतिनिधित्व करतो, तर्जनी वायु दर्शवते, मधले बोट अंतराळासाठी, अनामिका पृथ्वीसाठी आणि करंगळी पाण्यासाठी आहे.
संस्कृतमध्ये मुद्रा म्हणजे संपूर्ण शरीर किंवा हाताची साधी स्थिती यांचा समावेश असलेला हावभाव. मुद्रे सह श्वासोच्छवासाची तंत्रे शरीरातील प्राण प्रवाहाला उत्तेजित करतात. तुमच्या बोटांच्या टोकावर असलेल्या मुद्रा मेंदूबरोबर सूक्ष्म संबंध निर्माण करतात आणि शरीराचे अवयव, ग्रंथी, शिरा इत्यादी प्रभावित होण्याच्या क्षेत्राशी संबंधित प्रतिक्षेप नियंत्रित करतात.
मेंदूच्या उजव्या आणि डाव्या गोलार्धात सुसंवाद साधण्यात अंजली मुद्रा महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. रक्तातील ऑक्सिजनचे परिसंचरण सुधारते. पिट्यूटरी आणि अधिवृक्क ग्रंथींचे संतुलन साधताना, तुमची अंतर्ज्ञान शक्ती वाढते. तुमचे हात आणि मनगटे अधिक लवचिक बनतात. तुम्ही सक्षम होता. भावनांशी चांगला व्यवहार करणे,स्मरणशक्तीला चालना देणे ,याबाबत तुम्ही जास्त सक्षम होता.
“विशिष्ट गरजांनुसार खालील शक्तिशाली मुद्रांमध्ये प्राणिक ऊर्जा प्रवाहित करा : चिन मुद्रा एकाग्रातेसाठी, चिन्मय मुद्रा पचनासाठी, आदी मुद्रा घोरणे कमी करुन मेंदूला विश्रांती देण्यासाठी, अंजली मुद्रा सकारात्मक विचारांसाठी, प्राण मुद्रा उपचारांसाठी, वरुण मुद्रा संपर्कातील स्पष्टतेसाठी, अपानवायु मुद्रा तणाव मुक्तीसाठी, सूर्यमुद्रा उत्तम चयापचयासाठी, अश्विनी मुद्रा बद्धकोष्ठतेसाठी आणि हकिनी मुद्रा मनासाठी आहे.
होय, योग मुद्रा प्रभावी आहे. तुमच्या हाताच्या बोटांचा तुमच्या मेंदूशी (मज्जासंस्था उद्दिपित झाल्यामुळे) चांगला संबंध असतो. प्रत्येक मुद्रा, मुद्रेशी संबंधित ऊर्जा संरेखित करण्यासाठी एक बंधन म्हणून कार्य करते.
पृथ्वी मुद्रा (शक्ती आणते आणि मन स्थिर करते), प्राण मुद्रा (चैतन्य), गणेश मुद्रा (अडथळे दूर करणे), अंजली मुद्रा (शांतीसाठी), काली मुद्रा (अडचण दूर करणे) आणि लिंग मुद्रा फुफ्फुसांना बळकट करण्यासाठी आणि श्वसनाच्या समस्यांवर मात करण्यासाठी आहे.
जेव्हा बोटांची टोकं किंवा बोटं विशिष्ट स्थितीत ठेवतो (वाकवून,एकमेकावर किंवा एकमेकांना लागून) तेव्हा विद्युत सर्किट तयार होऊन मेंदूला उत्तेजना मिळते.मेंदूला मिळालेल्या इशाऱ्यामुळे शरीर, मन, भावना यातील ऊर्जेचा आकृतीबंध बदलण्यास मदत होते.

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity


    *
    *
    *
    *
    *