संपत्तीचा उद्देश आनंद आणि आराम मिळवणे आहे. योग ही संपत्ती आहे कारण योग पूर्ण आराम देतो. योग ही मानवजातीची सर्वात मोठी संपत्ती आहे. योग आपल्याला ताणमुक्त आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी साधने आणि तंत्रे प्रदान करतो. योगाचे फायदे अनेकविध आहेत.
रोगमुक्त शरीर, हिंसामुक्त समाज, न गोंधळलेले मन, प्रतिबंधहीन सकारात्मक बुद्धी, कशानेही न ग्रासलेली स्मृति, दुःखमुक्त आत्मा आणि कंपनरहित श्वास या गोष्टी आपल्या आयुष्यात योगाच्या सहाय्याने प्राप्त होऊ शकतात.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
योग आपणास अधिक कुशल बनवते
योगामुळे स्वतःमध्ये कौशल्ये विकसित होण्यास मदत होते. योगाचे प्रवर्तक, भगवान कृष्णाने भगवद्गीतेत म्हटले आहे: “योग हे कृतीचे कौशल्य आहे”. योग म्हणजे केवळ व्यायाम नाही. योग म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपण किती कुशलतेने संवाद साधू शकतो आणि कृती करू शकतो. नवकल्पना, अंतर्ज्ञान, कौशल्ये आणि उत्तम संवाद: हे सर्व योगाचे परिणाम आहेत. योग नेहमी विविधतेमध्ये सुसंवाद वृद्धींगत करतो.
आपल्यातील शांतता, स्तब्धता ही सर्व कौशल्यांची जननी आहे. योग ही परिपूर्णतेची जननी आहे. कृती ही कधीच परिपूर्णतेची जननी नसते. कृती कौशल्य आणत नाही. कौशल्य आणते ते योग आहे.
तुम्हाला माहीत आहे कां आपण योगासने कां करावीत? तुम्ही शांत कां असावे? आपण ध्यान कां करावे? या जगाचा आनंद घेण्यासाठी आपणास अंतर्मनात जावे लागते, त्यासाठी योगाची गरज आहे. योगामुळे कृतीत कौशल्य येते, योगामुळे तुमच्यातील परिपूर्णता आणि आनंदाची उत्तम गुणवत्ता येते.
योगाभ्यासाचा नियमित अभ्यास केल्याने अंतर्मन शुद्ध आणि उन्नत होण्यास मदत होते.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
योग संवाद कौशल्य सुधारते
एखाद्या व्यक्तीच्या तणावाच्या पातळीवर त्याचे वर्तन अवलंबून असते. योगामुळे लोकांमध्ये मैत्रीपूर्ण स्वभाव आणि अतिशय आनंददायी वातावरण निर्माण होते. योगामुळे आपली कंपने सुधारण्यास मदत होते. आपण आपल्या उपस्थितीद्वारे बरेच काही व्यक्त करतो, आपल्या शब्दांपेक्षाही जास्त.
क्वांटम फिजिक्सच्या अनुसार बोलायचे झाले तर, आपण सर्व कंपन किंवा व्हेवलेन्थ उत्सर्जित करत असतो. जेंव्हा संवाद तुटतो तेंव्हा आपण अनेकदा म्हणतो, ‘आपली व्हेवलेन्थ जुळत नाही’.
आपली संवाद साधण्याची क्षमता इतरांकडून संदेश प्राप्त करण्याच्या आपल्या क्षमतेवर अवलंबून असते. योगामुळे आपले मन स्वच्छ राहण्यास मदत होते.
तणावमुक्त राहण्यास मदत करते
योग आपल्याला ताणमुक्त आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी साधने आणि तंत्रे प्रदान करतो. आपल्या दैनंदिन जीवनात आपण कितीही ताण, तणाव किंवा कोणत्याही परिस्थितींना तोंड देत आहोत, याची पर्वा न करता आपल्या चेहऱ्यावर हास्य आणणे हा योगाचा उद्देश आहे. तणाव खूप जास्त आहे, खूप कमी वेळ आहे आणि ऊर्जा नाही.
तणावातून मुक्त कसे व्हावे?
- कामाचा ताण कमी करून – आजकाल ही शक्यता दिसत नाही.
- वेळ वाढवून – हे आपण करू शकत नाही. हे पक्के आहे, किंवा आपण दुसऱ्या ग्रहावर गेलो तर शक्य आहे.
- आपल्यातील ऊर्जेची पातळी वाढवून – हा एकमेव पर्याय आपल्याजवळ उरतो.
जेंव्हा आपल्याकडे पुरेशी ऊर्जा आणि उत्साह असतो, तेंव्हा आपण कोणतेही आव्हान हाताळण्यास सक्षम असतो.
योगामुळे आपल्या भावना कोमल आणि अधिक शांत होतात आणि
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
आपल्यातील भावना फुलून येतात.
आपला निर्देशांक सुधारतो
अनेकदा आपल्या नकारात्मक भावनांबद्दल आपल्याला असहाय्य वाटते. आपल्या नकारात्मक भावनांना कसे हाताळायचे हे शाळेत किंवा घरी कोणीही आपल्याला शिकवत नाही. जर आपण अस्वस्थ असलो, तर आपण अस्वस्थ राहता किंवा ते बरे होण्यासाठी वेळेची प्रतीक्षा करतो. या मनःस्थितीला वळण लावण्याचे रहस्य योगामध्ये आहे. आपल्या स्वतःच्या भावनांचा बळी होण्याऐवजी आपणास कोणत्याही वेळी आपल्याला जसे वाटायचे आहे तसे अनुभवण्याचे ते आपणास सामर्थ्य देते. योग आपणास स्वतंत्र बनवतो.
जेंव्हा ऊर्जा (प्राण) कमी होते, तेंव्हा आत्महत्येची प्रवृत्ती येते. प्राणायाम तंत्रे आणि योगासने यांच्या मदतीने आपण या प्रवृत्तींवर काही वेळात मात करू शकता.
योगामुळे आपल्या भावना कोमल आणि शांत होतात. हे आपल्या अभिव्यक्ती आणि विचार पद्धतींमध्ये स्वातंत्र्य आणते. ही योगाची खरी लक्षणे आहेत.
योग केवळ शरीराच्या लवचिकतेसाठी नाही. अर्थात तोही योगाचाच एक भाग आहे. शरीर लवचिक बनते आणि मन विश्वास आणि दृढनिश्चयाने वाढते. हे सर्व घडले तर ही योगाची देणगी आहे हे जाणून घ्या आणि स्वतःला योगी समजा.
योगामुळे वैयक्तिक प्रगती होण्यास मदत होते
योगाचा अर्थ फक्त योगासने असा नाही. तो खरं तर योगाचा एक छोटासा भाग आहेत. मुख्य भाग आत्मा, चैतन्य याबद्दल आहे. हा एक अत्यंत बौद्धिक व्यायाम आहे आणि बारीकसारीक मुद्दे उचलण्यासाठी आपण खरोखरच तीक्ष्ण आणि सतर्क असले पाहिजे. म्हणूनच मी योगाला ‘चेतनेचे विज्ञान’ म्हणतो.
आपण योगाकडे एक शास्त्र – कल्याणाचे शास्त्र म्हणून पाहिले पाहिजे. योगामुळे आपले लोकांशी असलेले नाते आणि लोकांसोबतचे आपले वर्तन सुधारू शकते. हे आपल्या भावनांना खूप स्थिर करते आणि आपली अंतर्ज्ञानाची क्षमता खूप मजबूत बनवते.
प्रत्येक व्यावसायिकाला अंतर्ज्ञानाची क्षमता आणि उद्योजकता आवश्यक असते. योग ते देऊ शकतो.
योग हे मानवजातीला एक असे वरदान आहे की त्यापासून कोणीही वंचित राहू नये. प्रत्येकाला शांततेचा अधिकार आहे; प्रत्येकाला गहन प्रेमात राहण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला निरोगी राहण्याचा अधिकार आहे. आपण स्वतः असलेल्या त्या प्रेमाच्या सागरात प्रवेश करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.
विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर
योगामुळे मन एकाग्र होते, विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हे उपयुक्त आहे. त्यांच्यासाठी अभ्यास ही एक सहज प्रक्रिया बनते. आपणास शिकण्यासाठी संघर्ष करण्याची गरज राहत नाही. आपली स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. बुद्धी तल्लख होते आणि एकूणच आपली ऊर्जा खूप सकारात्मक होते.
नैसर्गिक स्वरूपात सकारात्मक नशेचे कार्य करतो
आपले अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जात आहेत. त्याऐवजी त्यांनी योगाचा मार्ग स्वीकारला, तर एक वेगळीच नशा आणि उर्जा त्यांच्या आतून उत्कर्ष पावते आणि त्यांना उच्च स्थानावर घेऊन जाते. योग हा देखील एक प्रकारचा नशा आहे, पण तोच आपणास उन्नत करतो आणि आपणास प्रगतीकडे नेतो. योगामुळे आपले अज्ञान आणि नकारात्मकतेत पडणे टाळते. त्यातून समाजात एकोपा आणि आपुलकीची लाट येते.
योग असा आहे जो संपूर्ण जगाला हलवून जागृत करू शकतो. योग हा असा आहे की जो व्यक्तीला मोठ्या चेतनेने, मोठ्या वैश्विक वास्तवाशी जोडतो. योगामुळे आत्म्याचे ईश्वराशी मिलन होते.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
योग व्यक्तींना आध्यात्मिकरित्या विकसित करतो
योग हा असा आहे जो व्यक्तीला मोठ्या चेतनेसह, मोठ्या वैश्विक वास्तवाशी जोडतो. योगामुळे आत्म्याचे ईश्वराशी मिलन होते. देव उंच स्वर्गात कुठेतरी बसलेला नाही. देव ही सर्वव्यापी परम ऊर्जा आहे जी आपल्या सर्वांमध्ये खोलवर दडलेली आहे. त्या दैवी शक्तीला जागृत करण्याची कला म्हणजे योग.
योग आपल्या वातावरणात सुसंवाद आणतो. हे वैश्विक आत्म्याबरोबर व्यक्तीचे झालेले प्रमाणबद्धता आहे.सर्वांशी एकरूपता जाणवणे आणि अश्रू पुसून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करणे – हाच खऱ्या अर्थाने योग आहे. हे वसुदैव कुटुंबकम आहे.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
पृथ्वीला राहण्यासाठी एक चांगले ठिकाण बनवते
‘माझ्यामध्ये देव वास करतो (अहं ब्रह्मास्मि)’ ते वसुधैव कुटुंबकम् (आपण सर्व एक आहोत) या जाणिवेचा प्रवास म्हणजे योग. सर्वांशी एकरूपता जाणवणे आणि अश्रू पुसून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करणे – हाच खऱ्या अर्थाने योग आहे. हे वसुदैव कुटुंबकम आहे.
योगाचे प्रवर्तक पतंजली यांनी त्यांच्या योगसूत्रांमध्ये योगाचा उद्देश स्पष्ट केला आहे. ‘हेयं दुखम अनागतम्’. दुःख येण्याआधीच दुःखाला थांबणे हा योगाचा उद्देश आहे.
जेंव्हा कोठेतरी संघर्ष खदखदत असेल तेंव्हा लोकांना प्राणायाम करण्यास सांगा, एकत्र बसा आणि चांगला संवाद साधावयास सांगा. आपणास दिसेल की आपण त्या संघर्षाला मुळापासून उपटून फेकून देऊ शकता. लोभ असो, मत्सर असो, राग असो, द्वेष असो, की निराशा असो, या सर्व नकारात्मक भावना योगाद्वारे बऱ्या होऊ शकतात किंवा त्यांना पुनर्दिशानिदेशित करू शकता.
योगामुळे परस्परातील संवाद सुधारतो
अनेक प्रकारचे पूर्वग्रह – विशिष्ट धर्म, वंश, लिंग, वर्ग, शैक्षणिक दर्जा, आर्थिक स्थिती इत्यादींबद्दलचे पूर्वग्रह – या विविध प्रकारच्या पूर्वग्रहांनी लोकांची मने ग्रासली आहेत. त्यामुळे समाजात संघर्ष निर्माण होतो. पूर्वाग्रहामुळे निर्माण झालेला संघर्ष दूर करण्यासाठी योग आपल्याला मदत करतो. उत्स्फूर्तपणे आणि नैसर्गिकरित्या योगामुळे आपले मन पूर्वग्रहांपासून मुक्त होते.
योग नेहमीच विविधतेत सुसंवाद वाढवतो. तो विविधतेला प्रोत्साहन देतो. ‘योग’ या शब्दाचाच अर्थ ‘एकता’ (अस्तित्वाच्या, जीवनाच्या विविध पैलूंना एकत्र करणे) असा होतो.
समंजसपणा, आपुलकी आणि सामायिकता वाढवतो
योग लोकांना अधिक जबाबदार होण्यास आणि त्यांच्या जीवनात अधिक जबाबदारी घेण्यास मदत करतो. यालाच कर्मयोग म्हणतात. कर्मयोगी तो असतो जो जबाबदारी घेतो.
आपण सर्वजण आपल्या आयुष्यात अनेक भूमिका बजावत असतो. आपल्याकडे एकतर योगी किंवा गैर-योगी म्हणून भूमिका करण्याचा पर्याय आहे; जो जबाबदार आहे किंवा जो इतका-जबाबदार नाही. तुम्ही एक जबाबदार शिक्षक, एक जबाबदार डॉक्टर किंवा एक काळजी घेणारा व्यापारी असू शकता.
काळजी घेणे, सामायिक करणे आणि जबाबदारी ही अशी पात्रे आहेत जी योगाचे आपल्या आत जतन करतात.
योगाच्या फायद्या विषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न
( न्याहरी, नाष्टा ) एक दोन तासांनी व जड जेवणानंतर चार तासांनी करणे फायद्याचे आहे.