सर्व्हायकल स्पॉण्डिलायसिस किंवा सर्व्हायकल ऑस्टिओआर्थरायटिस ही अशी शारीरिक स्थिती आहे की जी मानेतील हाडें व उपास्थी यांच्या झिजेमुळे होते. हाडें व उपास्थींचा त्रास माने चे दुखणे व साध्या दैनंदिन हालचालीस अडचणी आणू शकते.

अमेरिकन अकादमीच्या ऑर्थोपेडिक सर्जन्सचे मतानुसार सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस हा एक अत्यंत सामान्य असा आजार असून ६० वर्षे वया वरील ८५ % पेक्षा जास्त लोकांमध्ये आढळतो. सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस ५० ते ६० वयोगटातील लोकांना शारीरिक झिजेमुळे होऊ शकतो. तथापि वयाचे कारणा व्यतिरिक्त सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस हा इतर कारणांमुळेही होऊ शकतो.

तरुणांमध्ये सुद्धा हा आजार जीवनशैलीत बदल किंवा बैठ्या जीवनशैली मुळे होऊ शकतो. कामाचे जास्त तास, शारीरिक व्यायामाचा अभाव व वाढलेला ताण हे दीर्घकाळात तीव्र आरोग्य समस्या निर्माण करतात. आरामदायक नसलेल्या स्थितीत जास्त काळ बसणे, कामाचे स्वरूपामुळे मानेतील होणारा ताण, पाठीच्या किंवा मानेच्या दुखापती, स्लिप डिस्क व लठ्ठपणा हे देखील मानेच्या दुखण्यास कारणीभूत होतात. कुटुंबात जर हा आजार असेल तर त्या कुटुंबातील व्यक्तींना देखील तो होण्याची जास्त शक्यता असते.

सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस ची लक्षणे

  • मानेतील तीव्र दुखणे
  • खांद्यातील वेदना
  • मानेतील ताठरपणा
  • डोक्याचे मागील भागात दुखणे

सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस पासून बचावाचे उपाय

  1. मानेवर ताण येईल अशा हालचाली टाळणे.
  2. जड वस्तू उचलणे टाळावे.
  3. मानेला आराम मिळावा म्हणून कामातून छोटे छोटे ब्रेक घेणे.
  4. रोजचे आहारात कॅल्शियम चा पुरेसा वापर करणे.
  5. भरपूर पाणी पिणे.
  6. फळे व हिरव्या भाज्यांचे सेवन करणे.
  7. दैनंदिन व्यायाम करणे परंतु योग्य काळजी घेऊनच.

सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस करिता योगाभ्यास

योग हा सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस वरील नैसर्गिक व समग्र उपाय होय. ह्या प्राचीन वैज्ञानिक प्रक्रियेचे नियमित अभ्यासाने लवचिक शरीर, शांत मन, व जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन साध्य करता येतो. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या निष्णात श्री श्री योग प्रशिक्षकांचे मार्गदर्शना खाली योग्य आसनाने वेदना कशा दूर करता येतील हे सहज शिकून घेता येते

या योगासनांचे अभ्यासाने तुमच्या वेदना रहित प्रवासाला सुरुवात करा:

  • भुजंगासन
  • अर्धमत्स्येंद्रासन
  • धनुरासन
  • मार्जरीआसन
  • सेतू बंधासन
  • मत्स्यासन

भुजंगासन

हे आसन छाती विस्तृत करते व पाठीचा कणा बळकट करते. हे सायटिका पासून आराम मिळवण्यात देखील मदत करते.

अर्धमत्स्येन्द्रियासन

अर्ध मत्स्येंद्रासनाचे फायदे.

हे केल्याने मान व खांदे ताणले जातात आणि पाठीच्या कण्याला बळकटी येते.

धनुरासन

हे आसन मानेला ताण व उत्तेजन देते.

धनुरासनाबद्दल अधिक जाणून घ्या

मार्जरीआसन

हे आसन मानेला ताण देते व पाठीचे दुखणे दूर करते.

सेतुबंधासन

सेतू बंधनासनाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी

हे आसन डोक्याचे भागात रक्त संचार वाढविते व डोकेदुखी थांबविते आणि मानेला ताण देते.

मत्स्यासन

मत्स्यासन कसे करावे ते शिका

हे आसन पाठ व मान यांना बळकटी देते व तसेच गळा व मान याना ताण व उत्तेजना देते.

वेदनारहित मार्ग

बऱ्याच सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसच्या केसेसचा उपचार शस्त्रक्रिये शिवायही करता येतो. योग्य वैद्यकीय देखरेख, काळजी व नियमित व्यायाम बरेचदा उपयुक्त ठरतात. डॉक्टर सुचवितात त्या काही इतर उपाय योजना म्हणजे फिजियोथेरपि, वेदनाशामक औषधे, व नैराश्यावरील औषधोपचार होत. या शिवाय आपला पवित्रा जाणीवपूर्वक सुधारणा करणे यानेही माने वरील ताण कमी होण्यास व परिणामी वेदना कमी होण्यास मदत होते. डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांमध्ये बदल करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

यॊगाभ्यासाने शरीर व मनाचे विकासास गती प्राप्त होते. तथापि औषधींना पर्याय नाही. फक्त प्रशिक्षित योग शिक्षकांचे देखरेखी खालीच योग शिकणे व अभ्यास करणे गरजेचे असते. कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास आपले डॉक्टर व श्री श्री योग शिक्षकांचे सल्यानुसारच योग साधना करावी.

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity


    *
    *
    *
    *
    *