सूर्य नमस्कार म्हणजे काय?
सूर्य नमस्कार हा बारा प्रभावी योगासनांचा क्रम आहे. सूर्यनमस्कार हृदय रक्तवाहिन्यासाठी उत्तम व्यायाम तर आहेच , पण ह्याचा शरीरावर आणि मनावर खूप सकारात्मक प्रभाव पडतो.
सकाळी लवकर रिकाम्या पोटी सूर्यनमस्काराचा सराव करणे चांगले. सूर्य नमस्काराच्या प्रत्येक फेरीत दोन संच असतात आणि प्रत्येक संच बारा योगासनांचा असतो. सूर्य नमस्काराचा सराव कसा करावा याच्या अनेक पद्धती तुम्हाला सापडतील. तथापि, सर्वोत्तम परिणामांसाठी एका विशिष्ट पद्धतीला धरून नियमितपणे सराव करणे उचित आहे.
उत्तम आरोग्यासोबतच, सूर्य नमस्कारामुळे या ग्रहावर जीवन टिकवून ठेवल्याबद्दल सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते.
सूर्य नमस्काराचा क्रम
क्रम १. प्रणामासन

आपल्या चटईच्या काठावर उभे रहा, आपले पाय एकत्र ठेवा आणि दोन्ही पायांवर आपले वजन सम प्रमाणात संतुलित करा. आपल्या छातीचे प्रसरण करा आणि खांदे सैल सोडा. श्वास घेताना, हात दोन्ही बाजूंनी वर उचला आणि श्वास सोडत, आपले तळहात प्रार्थना मुद्रेत छातीसमोर एकत्र आणा..
क्रम २. हस्तउत्तानासन

श्वास घेत, हात वर आणि मागे घ्या, दंड कानाजवळ ठेवा. या स्थितीत, संपूर्ण शरीर टाचांपासून बोटांच्या टोकापर्यंत ताणण्याचा प्रयत्न केला जातो.
ह्या योगासनात अनुभव अधिक सखोल करण्यासाठी टीप:
तुमचा कटी भाग थोडा पुढे ढकलू शकता. मागे वाकण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तुम्ही बोटांनी वर जात आहात याची खात्री करा
क्रम ३. हस्तपादासन

श्वास सोडत, पाठीचा कणा ताठ ठेवून कंबरेपासून पुढे वाका. पूर्ण श्वास सोडत, हात, पायांच्या बाजूला जमिनीवर आणा.
या योगासनाचा अनुभव अधिक सखोल करण्यासाठी टीप:
तळहात जमिनीवर आणण्यासाठी, आवश्यक असल्यास, आपण गुडघे वाकवू शकता. आता गुडघे सरळ करण्याचा हलकासा प्रयत्न करा. या स्थितीत हात स्थिर ठेवणे आणि क्रम पूर्ण होईपर्यंत त्यांना न हलवणे चांगले.
क्रम ४. अश्व संचालनासन

श्वास घेत, तुमचा उजवा पाय शक्य तितक्या मागे घ्या. उजवा गुडघा जमिनीवर आणा आणि वर बघा..
टीप: ह्या स्थितीचा अनुभव कसा वाढवायचा?
डावा पाय तळहातांच्या मध्यभागी असल्याची खात्री करा.
क्रम ५. दंडासन

श्वास घेत डावा पाय मागे घ्या आणि संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत आणा.
ह्या स्थितीचा अनुभव अधिक सखोल करण्यासाठी टीप:
आपले हात जमिनीवर सरळ काटकोनात ठेवा.
क्रम ६. अष्टांग नमस्कार

हळूवारपणे आपले गुडघे जमिनीवर आणा आणि श्वास सोडा. नितंब किंचित मागे घ्या , पुढे सरका, तुमची छाती आणि हनुवटी जमिनीवर ठेवा. तुमचा मागचा भाग थोडा उचला. दोन हात, दोन पाय, दोन गुडघे, छाती आणि हनुवटी (शरीराचे आठ भाग) यांचा जमिनीला स्पर्श व्हायला हवा.
.
क्रम ७. भुजंगासन

पुढे सरका आणि नागाप्रमाणे छाती वर उचला. या मुद्रेत तुम्ही तुमचे कोपर वाकवून खांदे कानांपासून दूर ठेवू शकता. वर पहा
ह्या योगासनाचा अनुभव अधिक सखोल करण्यासाठी टीप:
श्वास घेताना, छाती पुढे ढकलण्याचा सौम्य प्रयत्न करा; तुम्ही श्वास सोडत असताना, नाभी खाली ढकलण्याचा हलका प्रयत्न करा. पायाची बोटे खाली जमवून ठेवा. तुम्ही शरीरावर सक्ती न करता शक्य तितकेच शरीर ताणता आहात याची खात्री करा.
क्रम ८. अधो मुख श्वानासन

श्वास सोडत, नितंब आणि माकड हाड उचलून शरीराला उलट्या ‘V’ मुद्रेत आणा.
ह्या आसनाचा अनुभव अधिक सखोल करण्यासाठी टीप:
शक्य असल्यास, टाचा जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आसनात खोलवर जात माकड हाड वर उचलण्याचा हलका प्रयत्न करा.
क्रम ९. अश्व संचालनासन

श्वास घेत उजवा पाय दोन हातांच्या मधे पुढे आणा. डावा गुडघा जमिनीवर खाली जाईल. नितंब खाली दाबा आणि वर पहा.
ह्या आसनाचा अनुभव अधिक सखोल करण्यासाठी टीप:
उजवा पाय दोन हातांच्या मधे आणि उजवी पोटरी जमिनीवर लंबकोणाप्रमाणे ठेवा. या स्थितीत, खोल जाण्यासाठी नितंबांना खाली जमिनीच्या दिशेने ढकलण्याचा, ह्या स्थितीत खोल जाण्यासाठी हळुच प्रयत्न करा.
क्रम १०. हस्तपादासन

श्वास सोडत डावा पाय पुढे आणा. तळहात जमिनीवर ठेवा. आवश्यक असल्यास, गुडघे वाकवू शकता.
ह्या योगासनाचा अनुभव अधिक सखोल करण्यासाठी टीप:
हळुवारपणे गुडघे सरळ करा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुमचे नाक गुडघ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत रहा.
क्रम ११. हस्तउत्तानासन

श्वास आत घेत, पाठीचा कणा वर करा. हात वर करा आणि थोडेसे मागे वाकून नितंबांना किंचित बाहेर ढकलून घ्या
ह्या योगासनाचा अनुभव अधिक सखोल करण्यासाठी टीप:
तुमचे दंड तुमच्या कानाजवळ असल्याची खात्री करा. मागे ताणण्यापेक्षा शरीर वर जास्त ताणणे आवश्यक आहे.
क्रम १२. ताडासन

श्वास सोडत प्रथम शरीर सरळ करा, नंतर हात खाली आणा. या स्थितीत आराम करा आणि तुमच्या शरीरातील संवेदनांकडे लक्ष ध्या.
अश्या प्रकारे सूर्यनमस्काराचा एक संच पूर्ण होतो. क्रमाची पुनरावृत्ती करून फेरी पूर्ण करा. फक्त यावेळी, चवथ्या क्रमात डावा पाय मागे घेऊन आणि नवव्या क्रमात डावा पाय पुढे नेण्यास सुरुवात करा. असे केल्यावर, तुमची सूर्यनमस्काराची एक फेरी पूर्ण होईल.
सूर्य नमस्कार व्हिडिओ
सराव १: पुढील १० दिवस सूर्य नमस्काराच्या १२ फेऱ्या करा, त्यानंतर इतर योगासने करा, आणि नंतर योग निद्रेने (गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे विश्रांती देणारे मार्गदर्शित ध्यान) आराम करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा साधा मंत्र तुम्हाला दिवसभर निरोगी, आनंदी आणि शांत राहण्यास मदत करेल.
सूर्यनमस्काराचे फायदे
- हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य राखण्यास मदत करते
- मज्जासंस्थेला चालना देते
- स्नायूंना ताणायला, आकुंचन करायला आणि कसण्यात मदत करते
- वजन कमी करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यायाम
- रोगप्रतिकारक शक्ती बळकट करते
- गहन आकलन क्षमता वाढवते
- एकूणच आरोग्य सुधारते, शरीर दृढ होते आणि मनाला विश्रांती मिळते
सूर्य नमस्कार चे अधिक फायदे तसेच सूर्य नमस्कार करताना म्हणायचे मंत्र व त्यांचे अर्थ जाणून घ्या.
सूर्यनमस्काराबद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न
हृदय मजबूत करते. ओटीपोटाचे स्नायू, श्वसन प्रणाली, लिम्फॅटिक सिस्टम, पाठीच्या नसा, आणि इतर अंतर्गत अवयव
मणका, मान, खांदा, हात, हात, मनगट, पाठ आणि पायांच्या स्नायूंना टोन करते, ज्यामुळे एकूणच लवचिकतेला चालना मिळते. मनोवैज्ञानिकदृष्ट्या, ते शरीर, श्वास आणि मन यांच्या परस्पर संबंधांचे नियमन करते आणि व्यक्तीला शांत करते आणि सजगतेने ऊर्जा वाढवते , वजन कमी करण्यास मदत करते, त्वचेची आणि केसांची निगा राखण्यात मदत करते