पद्मसाधना म्हणजे काय?

साधारणपणे कमळ म्हटले की आपल्या मनात काय येते ? एक पूर्ण पणे विकसित पुष्प ज्याची एक एक पाकळी आकाशाकडे उमललेली आहे. मात्र विचार करा, ते कमळ कोठे उगवते ? चिखलात ! तरीही त्या पुष्पाला चिखल चिकटलेले नसते किंवा डाग वगैरे नसतात. कल्पना करा की आपणही असेच या कमल पुष्पा सारखे झालो तर – किती छान – दैनंदिन जीवनातील घटनांचा स्पर्श न होता, पूर्णतः फुललेले व्यक्तिमत्व, प्रेम व आनंदानं अंतर्भूत. पद्मसाधना हा असा सराव आहे की ज्यायोगे अशी अवस्था प्राप्त करणे सहज शक्य आहे. गुरुदेव श्री श्री रवि शंकर यांनी विकसित केलेली एक सुंदर योग प्रक्रिया आहे ज्यामध्ये क्रमा क्रमाने साध्यासोप्या योग मुद्रा, नाडीशोधन ही श्वसन प्रक्रिया आणि ध्यान यांचा समावेश होतो. 

पद्मसाधने द्वारा आपली क्षमता उदघाटीत करा

गुरुदेव श्री श्री रवि शंकर म्हणतात “पद्मसाधना ही आंतरिक शक्ती पर्यंत पोहचण्यास मदत करते. नियमित अभ्यास केल्यास या ४५ मिनिटांच्या योग्य आसनांच्या क्रमिक व्यायामाने शांत मन, निरोगी शरीर व शांती चा अनुभव होतो. या डौलदार आसनांचा उपयोग शरीर व मन गहन ध्यानासाठी तयार करण्यास होतो. या करीता एक सूचना अशी देता येईल की संपूर्ण साधना तणाव न घेता सहजतेने करावी. सुदर्शन क्रियेपूर्वी पद्मसाधना केल्याने आजूबाजूच्या घटनांचा दुष्प्रभावाशिवाय. क्रिया जास्त प्रभावी होते व आपण संपूर्ण दिवस उत्साही राहता.”

पद्म म्हणजे कमळ व साधना म्हणजे आपले प्रयास वा अभ्यास. पद्मसाधने चा अभ्यास म्हणूनच अगदी हळुवारपणे व सहजतेने करावा. साधना म्हणजे चटई वर जाण्यासाठी हलकासा धक्का आणि पद्म म्हणजे एक एक पदर आपल्या क्षमतांना उलगडत जाणे.

५ घटक आनंददायी पद्म साधनेसाठी

“आगम परंपरेनुसार असे मानतात की देवी ही पाच स्तरांच्या आसनावर स्थित आहे. या आसनाचा पाय कासव आहे जे स्थिरता दर्शवते. पण फक्त स्थिरता आवश्यक नाही तर जागरुकता देखील आवश्यक आहे. म्हणून दुसरा स्तर साप म्हणजे जागरुकता. जागरुकतेमुळे मनातील क्रियाकलाप होऊ शकतो, म्हणून सापा पुढचा स्तर सिंह. हे म्हणजे कृपा. पुढचा स्तर म्हणजे सिद्ध, परिपूर्ण ऋषी. आणि सिद्धापुढील स्तर म्हणजे कमळ पूर्ण बहरलेला. जेंव्हा योगासनात हे ५ घटक येतात – स्थिरता, जागरुकता, कृपा, पूर्णता आणि बहार मग आपल्यात देवत्व उदयास येते आणि याला पदमसाधना म्हणतात.

पद्मसाधना विडिओ

आर्ट ऑफ सायलेन्स किंवा डीएसएन कोर्सेस मधून आपण पद्मसाधना शिकू शकता.

वजन कमी करण्यास उपयुक्त

मानसिक व भावनात्मक उपयोगा व्यतिरिक्त पद्मसाधने ची निर्मिती संपूर्ण शारीरिक व्यायामासाठी केलेली आहे. दीर्घ काळपर्यंत आसन स्थितीत राहिल्याने शरीराची दृढता वाढते. हा व्यायाम केवळ २० मिनिटं केला जातो परंतू याचा परिणाम व्यायामानंतरही आणखी २० मिनिटे सुरु राहतो. त्यामुळे व्यायामानंतरही शरीरातील उष्मांक ज्वलन होत रहाते.

पद्मसाधनेचे फायदे:

  1. शरीरात ताकद आणि लवचिकता आणते
  2. झोपेची गुणवत्ता आणि रोगप्रतिकार शक्ती सुधारते
  3. तणाव कमी करण्यास, विश्राम मिळण्यास आणि प्रणालीला ऊर्जा देण्यास मदत करते
  4. मानसिक स्पष्टता आणि भावनिक स्थिरता आणते
  5. एकूणच आरोग्य आणि सर्जनशीलता सुधारते

पद्म साधना हा एक गहन आणि प्रभावी सराव आहे जो अशांत असणाऱ्या मनाला शांत करण्यास आणि आपल्याला वर्तमान क्षणात आणण्यास मदत करते जेथे शरीराची प्रत्येक पेशी उत्साही आणि पुनःप्रभारित होऊ शकते. त्याचा परिणाम आपल्या अस्तित्वातील सत्त्वगुण वाढण्यातही होतो. सत्त्व हा सकारात्मकता, उत्साह आणि समरसतेचा गुण आहे. नियमितपणे सराव केल्यास व्यक्तीमध्ये सत्वगुण, चांगले आरोग्य आणि आनंद वाढवते.

पद्मसाधना आपल्या पहाटेच्या आणि सायंसाधनेत अंतर्भूत करा आणि आपल्या आंतरिक ऊर्जेचे स्त्रोत मोकळे करून घ्या.

*आगम परंपरा ही मंदिरातील सामूहिक पूजा अर्चनेचा भाग आहे.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *