तुम्हाला कुठल्या प्रकारचा व्यायाम हवाय? जोरदार, मध्यम की हळुवार? व्यायाम करण्याची तुमची कल्पना यापैकी कोणती आहे?
योगामध्ये प्रत्येकासाठी काही ना काही आहेच.
अशी आसनं आहेत की काही मागे झुकून करायची, काही पुढे झुकून तर काही शरीराला वळण देऊन!
तसेच आपण उभे राहून, बसून किंवा आडवं होऊन सुद्धा काही आसनं करु शकतो!
रोबिक (हृदय गती वाढून, जादा प्राणवायू देणारा) व्यायाम करायचा आहे? तर, जलद सूर्यनमस्कार घाला! थोडा आळस आलाय? मग, अंथरुणातच काही योग प्रकार करु शकता!!
आता काही पाठीवर झोपून करायची आसनं पाहू. यात शरीराला ताण देणारी आसनं आहेत तशी आराम देणारी सुद्धा आहेत.
विष्णु आसन
- ओटीपोटाच्या भागातील स्नायूंना ताण मिळतो.
- गुडघ्यातील शिरांची शक्ती वाढते.
नटराजासन
- पाठीचा कणा व मांड्यांच्या स्नायूंना ताण मिळतो.
- पाठीला आराम मिळतो.
- शारीरिक व मानसिक सखोल विश्रांती होते.
नौकासन
- पाठीचा भाग मजबूत होतो.
- दंड आणि पायाचे स्नायू मजबूत होतात.
- पोटाची चरबी कमी होते.
- पोटाच्या भागातील स्नायू मजबूत होतात.
- पचनक्रिया सुधारते.
- मधुमेहावर उपयोगी.
- साखरेची पातळी योग्य राखली जाते
मत्स्यासन
- छातीच्या भागाला ताण मिळतो.
- गळा, घसा व खांद्यातील ताण कमी व्हायला मदत होते.
- मान व पाठीच्या वरचा भाग मजबूत होतो.
- दीर्घ श्वसन होते व त्यामुळे श्वसन संस्थेसंबंधीचे आजार बरे व्हायला मदत होते.
- पॅराथायरॉईड, पिट्यूटरी व पीनल ग्रंथींचे कार्य चांगले होते.
- ताणतणाव कमी होतात.
पवनमुक्तासन
- मोठ्या आतड्यात साठलेला वात निघून जातो.
- पचनक्रिया सुधारते.
- ओटीपोटासाठी हा चांगला व्यायाम आहे.
- पुनरुत्पादन संस्थेतील अवयव व ओटीपोटाच्या भागाला मसाज होतो.
- मासिक पाळीच्या तक्रारी कमी व्हायला मदत होते.
शवासन
- शवासनामुळे सखोल ध्यानाची स्थिती अनुभवता येऊन विश्रांती मिळते.
- पेशींमधील दोष नाहीसे होण्यास मदत होते.
- रक्तदाब नियमित होतो. चिंता कमी होते.
- निद्रानाश कमी होतो.
- शरीरातील वाताचे असंतुलन नियमित करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी आसन आहे.
- शवासनात चांगली विश्रांती मिळून त्यानंतरची योगासने छान होतात.
- जलदगतीने केलेल्या आसनांनंतर विश्रांतीसाठी सर्वात शेवटी हे आसन करणे उत्तम आहे.
सेतुबंधासन
- पाठीचे स्नायू मजबूत होतात.
- पाठीवर आलेल्या ताणापासून त्वरित आराम
- मिळतो.
- छाती, गळा व पाठीचा कणा या भागांना चांगला ताण मिळतो.
- फुफ्फुसे मोकळी होतात.
- मेंदूला विश्रांती मिळते. चिंता, ताण व नैराश्य कमी होते.
- थायरॉइडच्या (गलग्रंथी ) तक्रारी कमी होतात.
- पचनक्रिया सुधारते.
- मासिक पाळीच्या तक्रारी कमी होतात.
- रजोनिवृत्तीच्या काळात त्रास होत नाही.
- अस्थमा, उच्च रक्तदाब, हाडांचे व सर्दीचे (सायनस) आजार बरे व्हायला मदत होते.
हलासन
- पायांचे आरोग्य चांगले होते.
- मान, खांदे व पाठीचे स्नायू मोकळे होतात.
- चांगली भूक लागते, पचन सुधारते.
- ओटीपोटाचे स्नायू बळकट होतात.
- पाठीचा कणा लवचिक राहतो.
- थायरॉईड ग्रंथी उत्तेजित होतात.
- प्रतिकार शक्ती वाढते.
- रजोनिवृत्तीच्या तक्रारी कमी होतात.
- ताण व थकवा नाहीसा होतो.
- मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत होते.
- मधुमेहींसाठी हे चांगले आसन आहे.
सर्वांगासन
- मेंदूकडे व मध्यवर्ती मज्जासंस्थेकडे जाणारा रक्तप्रवाह वाढतो.
- थायरॉइड (गलग्रंथी), पॅराथायरॉईड व
- चयापचय क्रिया संतुलित होते.
- प्रतिकार शक्ती वाढते.
- खांदे व बाहू मजबूत होतात.
- पाठीचा कणा लवचिक रहातो.
- मलावरोध व अपचनाचा त्रास कमी होतो.
- सुजणाऱ्या नसा(व्हेरिकोज व्हेन्स) बऱ्या होतात.
- नैराश्य कमी होते.
- मलावरोध व त्यामुळे होणारी डोकेदुखी कमी होते.
- ताणतणाव कमी होतात.
- विश्रांती मिळते, उर्जेत वाढ होते.
पाठीवर झोपून केलेल्या या आसनांमुळे चांगली विश्रांती मिळू शकते. म्हणजेच थकवा घालवण्यासाठी आपण ही आसने करू शकतो. आजारातून बरे होताना प्रकृती चांगली होण्यासाठी ही आसने अवश्य करावी. या आसनांमुळे शक्ती वाढते व लवचिकता सुद्धा वाढते. आपण ही आसने नियमित केलीत की फरक लक्षात येईल.म्हणजेच पडल्यापडल्या ही आसने करुन तुम्ही हे फायदे मिळवू शकता.
योगाचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत.जरी औषधाला पर्याय म्हणून योग नसला तरी शरीर व मनाचा विकास होण्यासाठी योगाची खूप मदत होते. महत्त्वाचे म्हणजे प्रशिक्षित योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली ही आसने शिकावीत. आपण जर आजारी असाल तर आपले डॉक्टर व श्री श्री योग प्रशिक्षक यांच्याशी सल्लामसलत करुन योगसाधना करा.
तुमच्या जवळच्या आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरमध्ये “श्री श्री योग शिबिर” शोधा.