वजन घटवण्यासाठी सूर्य नमस्काराला परिपूर्ण शारीरिक व्यायाम प्रकार म्हणतात. १२ सूर्य नमस्काराच्या संचामध्ये १२ ते १५ मिनिटाच्या कालावधीत २८८ प्रभावी योगासने होतात, असे योग तज्ञांचे म्हणणे आहे. ‘उत्कृष्ट गोष्टी लहान पॅकेजेस मधून मिळत असतात,’ याचे हे आणखी एक उदाहरण आहे.

वजन घटवण्यासाठी परिपूर्ण व्यायाम प्रकार

वेळ खूप कमी आहे? निरोगी जगायचेय, पण कसे ते माहित नाही? सूर्य नमस्काराच्य जगतामध्ये आपले स्वागत आहे. सूर्य नमस्कारामध्ये क्रमशः १२ योगासनांचा समावेश आहे. सूर्य नमस्काराबद्धल एक चांगली गोष्ट म्हणजे जे अतिशय व्यस्त असतात , त्यांची सतत तक्रार असते की योगासने करायला पुरेसा वेळ मिळत नाही. त्यांच्यासाठी हे खूप चांगले आहे. खास करून सूर्योदयाच्या वेळी सूर्य नमस्काराचे जलद १२ सेट करणे हा हृदय बळकटीसाठी उत्तम व्यायाम आहे. हीच आसने संथ गतीने केल्याने स्नायू बळकट बनून ध्यान लागण्यास मदत होऊन गहन विश्रांती प्राप्त होते. आणखी म्हणजे यामुळे निर्माण होणाऱ्या स्नायूंच्या ताणाचा आनंद मिळून शरीर लवचिक झाल्याचे जाणवते.

सूर्य नमस्कार जरी उत्तम व्यायाम प्रकार असला तरी तो सुरुवातीला शरीर मोकळे करणारे व्यायाम प्रकार आणि गहन योगासने या दोन्ही मधील दुवा आहे. आपली पहाटेची योग साधना शरीराचा आखडलेपणा कमी करण्यासाठी शरीर शिथिल करणाऱ्या व्यायाम प्रकाराने करा. मग काही संच सूर्य नमस्काराचे करा, ज्यामुळे शरीराची लवचिकता वाढण्यास मदत होईल. मग प्रभावी आसनांमध्ये शरीर आणखी ताणण्यास मदत होईल.

सूर्य नमस्कार कां उत्कृष्ठ आहेत

पण हे म्हणजेच सारे काही नव्हे. सूर्यनमस्काराचे अनेक मनोरंजक फायदे आहेत, सूर्य नमस्काराच्या सातत्याने केलेल्या सरावाचा शरीरातील प्रत्येक अवयवाला खूप लक्षणीय लाभ होतो. ह्यातील शक्तिशाली योगासनांचा हृदय, यकृत, आंतडी, पोट, छाती, गळा आणि पाय म्हणजे नखशिखांत असा शरीरावर उत्कृष्ट परिणाम होतो. हे केल्यामुळे रक्ताची शुद्धी होऊन शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि पोटाचे कार्य, आतडी आणि मज्जा संस्थाचे कार्य खात्रीने सुधारते. सूर्य नमस्काराच्या दैनंदिन सरावामुळे ज्यापासून हे शरीर बनले आहे त्या वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांमध्ये समतोल प्राप्त होण्यास मदत होते.

१२ मिनिटांच्या सूर्य नमस्कारामध्ये बरेचसे योगासने होतात

सूर्य नमस्काराच्या एका फेरीमध्ये १२ आसने असतात.

एका संचा मध्ये सूर्य नमस्काराच्या २ फेऱ्या असतात. पहिल्या फेरीत उजव्या बाजूने मग डाव्या बाजूने ताण देता.

म्हणजे जेंव्हा तुम्ही सूर्य नमस्काराचे १२ सेट करता तेंव्हा १२ सेट * २ फेऱ्या, प्रत्येक फेरीमध्ये * १२ आसने = २८८ आसने, तेही १२ ते १५ मिनिटात.

प्रत्येक सूर्य नमस्कारामध्ये जळणारे उष्मांक

सर्वसाधारण वजन असणाऱ्या व्यक्तीचे एका सूर्य नमस्कारामुळे सरासरी १३.९० उष्मांक जळतात. आत्ता आपण स्वतःचे लक्ष्य ठरवू शकता. हळूहळू आपण सूर्य नमस्काराच्या १०८ फेऱ्या पर्यंत वाढवू शकता. या लक्ष्यापर्यंत पोहोचेपर्यंत आपण सडपातळ झाला आहात, हे जाणवेल.

३०-मिनिटे व्यायामाची उष्मांक मोजणी

चला तर, आपल्या ३० मिनिटे व्यायाम केल्याने किती उष्मांक जळतात पाहूया.

वेट लिफ्टिंग = १९९ उष्मांक
टेनिस = २३२ उष्मांक
बास्केटबॉल = २६५ उष्मांक
बीच हॉलीबॉल = २६५ उष्मांक
फुटबॉल = २९८ उष्मांक
सायकलिंग (१४ – १५.९ मैल प्रति तास) = ३३१ उष्मांक
रॉक क्लाईबिंग = ३६४ उष्मांक
धावणे (७.५ मैल प्रति तास) = ४१४ उष्मांक
सूर्य नमस्कार = ४१७ उष्मांक

इतर व्यायामांच्या तुलनेत सूर्य नमस्कारामुळे सर्वात जास्त उष्मांक जाळणे शक्य आहे.

योगाने कृतज्ञ राहू

सूर्यामुळे या ग्रहावर जीवन कसे शक्य झाले आहे, हे शाळेतील धडे लक्षात आहेत नां? तो सोनेरी गोळा सर्वत्र चमक, प्रकाश प्रसारित करतो, अंधकार पळवून लावतो, चराचरामध्ये प्राण फुंकतो, हे सर्व लहानपणी आपण शिकलोय. आता आपल्या सर्वात जवळच्या या ताऱ्याला ‘धन्यवाद’ देण्याची आपली पाळी आहे. सूर्य नमस्कारामुळे ती संधी प्राप्त होतेय. सूर्य नमस्कार हा त्या प्राणदात्या ‘सूर्या’ प्रती सन्माननीय कृतज्ञता व्यक्त करत संपूर्ण शरीराचा व्यायाम करण्याचा उत्कृष्ट मार्ग आहे.

वजन घटवण्यासाठी सूर्य नमस्कार करण्यास उत्सुक आहात नां? सूर्य नमस्कार कसे करावे, यासाठी ही साधी पावले उचला. एवढेच करा की योगा मॅटवर या, डौलदारपणे एका मागून एक आसने करा, प्रसन्न रहा आणि स्नायू खिचावांची मजा घ्या. आपल्या सूर्य नमस्कार साधनेला आणखी पवित्र आणि लाभदायक बनवण्यासाठी कृतज्ञतेची जोड द्या. आपला प्रवास आता निरोगी शरीर आणि शांत मन प्राप्त करण्याकडे सुरु झाला आहे.

१०८ सूर्य नमस्कार घालणे , कसे घालावे, हे शिकण्यासाठी भेट द्या. १०८ एका सत्रात सूर्यनमस्कार.

सूर्यनमस्कार व्हिडिओ

श्री श्री योग प्रशिक्षकाकडून निर्दोष सूर्य नमस्कार शिकण्यासाठी आपल्या नजीकच्या श्री श्री योग शिबीराचा शोध घ्या. आपले प्रश्न आणि शंका येथे पाठवा. info@srisriyoga.in आपल्या योग साधनेमध्ये मदत करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *