सध्या आपण अशा युगात राहतो आहोत जिथे करोना हा भीतीदायक शब्द आपल्या लहानग्यांच्या शब्दकोशात नव्याने घुसला आहे.

अशी आशा करू या की तो त्यांनी प्रथम उच्च्चारलेल्या शब्दातला तो एक नसेल.भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की १० वर्षाखालच्या मुलांना सध्या घरातच राहू द्या. ही फारच गंभीर बाब आहे.पण मग फक्त लहान मुलेच कां? कारण लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती पूर्ण विकसित झालेली नसते त्यामुळे ते या रोगाला चटकन बळी पडू शकतात.

अंतर्गत रोगप्रतिकारशक्ती

खरे तर आपली रोगप्रतिकारशक्ती तिचे काम अतिशय चोख पार पाडत असते.आपल्या पांढऱ्या रक्तपेशी कुठल्याही प्रकारच्या रोगजंतूंशी लढा देऊन त्यांना नामोहरम करण्यास समर्थ असतात. 

मग आपल्याला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची गरजच काय?

कारण आपण अशा जगात राहतो जिथे करोडो जीव, जंतू,पेशी एकत्र नांदतात , ज्यांच्यातल्या काही आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. विशेषत: छोटी मुले त्यांच्या वाढीच्या वयात या संसर्गाने बाधित होण्याची खूप शक्यता असते.

छोटया मुलांची रोगप्रतिकारशक्ती कशामुळे कमी होते

  • चुकीची आहार पद्धत
  • कमी झोप किंवा पुरेशी विश्रांती न होणे
  • व्यायाम न करणे
  • अनुवंशिकता
  • ताण
  • दीर्घ आजारपण

असं म्हणतात की रोगाला प्रतिबंध करणे हा उत्तम (आणि एकमेव) मार्ग आहे. विशेषत: या परिस्थितीत जेंव्हा नवीन बनवलेली लस ही फक्त साथीची तीव्रता कमी करण्यासाठीच उपयोगी आहे असे दिसते आहे.रोगापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपण आपली रोग प्रतिकारशक्ती मजबूत करणे हेच गरजेचे आहे.

आपल्या छोटया मुलांची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवता येईल त्याची आता चर्चा करुया.

मुलांची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवता येईल

हे जग सध्या जणू काही ठप्प झाले आहे. आपल्या मुलाबाळाबरोबर आपण घरातल्या चार भिंतीत डांबून घेतल्यासारखे झालो आहोत.जर मुलांबद्दल काही गोष्टी तुम्हाला ठाऊक असतील तर तुम्हांला जाणवेल की मुलांची अवस्था सध्या मधमाशीच्या पोवळ्याभोवती दिवसभर अस्वस्थपणे घोंघावणाऱ्या मधमाशीसारखी झाली आहे.(आणि जास्त काळ निर्बंध घातल्यामुळे मुळात शांत असणारी मुले पण चळवळी बनली आहेत.) त्यामुळे मुलांचं भरकटलेलं मन आणि शरीर ताळ्यावर आणायला काहीतरी व्यायाम त्यांना शिकवायला हवा ज्यामुळे त्यांच्याकडे असलेली उर्जा योग्य दिशेने प्रवाहित होईल आणि शरीराला व्यायाम मिळेल.

घरच्या घरी करण्यासारखा कोणता बरे व्यायाम प्रकार आहे? घरातल्या चार भिंतीच्या आत अगदी कमीतकमी जागेत योगासनांसारखा उत्तम व्यायाम नाही.योगासाने करून तरतरी येते, विश्राम मिळतो,ती करणे आव्हानात्मक पण असते आणि शांतता मिळवून देणारे सुद्धा.फक्त लहरी बनलेल्या मुलांसाठी योग्य आसने निवडायला हवीत.

इथे १० सोप्या योगासनांची माहिती दिली आहे ज्यायोगे तुमच्या छोटया मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवता येईल 

मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योगासने

ही योगासने केल्याने मुलांचा श्वसनमार्ग मोकळा होईल, त्यांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढेल आणि श्वसनमार्गाच्या विकारांना प्रतिबंध केला जाईल.

सुरुवातीला संपूर्ण शरीर ताणून घ्या,ज्यामुळे ही आसने करण्यासाठी तुमचे शरीर सज्ज होईल.

१. हस्तपादासान 

हस्तपादासानाचे फायदे :

  • या आसनामुळे मेंदू आणि सायनसच्या जागी रक्ताभिसरण वाढते, त्यामुळे रक्त साकळत नाही.
  • आपल्या मज्जा संस्थेच्या ठिकाणचे रक्ताभिसरण वाढते त्यामुळे शरीराची ताकद वाढते आणि रोग प्रतिकार शक्ती वाढायला मदत होते.

२. उष्ट्रासन

ustrasana - inline
  • ह्या आसनामुळे तुमची छाती मोकळी होते. ऋतू बदलल्यामुळे तुमच्या छातीत जर कफ अडकून राहिला असेल तर तो मोकळा होतो.
  • तुमची पचनशक्ती सुधारते. या शिवाय तुम्ही योग्य आहार घेतलात तर तुमच्या रोगप्रतिकार शक्तीत कमालीचा बदल घडून येतो.
    उष्ट्रासनाबद्दल अधिक जाणून घ्या.

३. मत्स्यासन 

Matsyasana- inline
  • या आसनामुळे उदरातले अवयव ताणले जातात ज्यामुळे त्या भागात होणाऱ्या संसर्गाला टक्कर द्यायला आपण सक्षम होतो.
  • या आसनामुळे छाती ताणली जाते आणि दीर्घ श्वास घेतला जातो.नाकाचा मार्ग मोकळा होतो.अस्थमा, ब्रोन्कायटीस या सारख्या श्वसन मार्गात अडथळे आल्यामुळे होणाऱ्या विकारांवरचे हे प्रभावी शस्त्र आहे.
  • मान आणि खांद्यात जे जडत्व येते, ते या आसनामुळे कमी होते आणि सुरळीत श्वसन व्हायला मदत होते. 
  • मत्स्यासनाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

४. सेतुबंधासन

Setu Bandhasana - inline
  • या आसनामुळे सुद्धा खांदे,छाती आणि फुफ्फुसाचा मार्ग मोकळा होतो,ज्यामुळे अस्थम्याची लक्षणे आणि थायरॉईड मुळे होणारे त्रास कमी व्हायला मदत होते.
  • मान आणि खांद्यात जे जडत्व येते, ते या आसनामुळे कमी होते आणि सुरळीत श्वसन व्हायला मदत होते. मान आणि खांदे यांना खूप चांगला ताण बसल्यामुळे पाठ मजबूत होतें आणि शरीराला आराम मिळतो.
    सेतुबंधासनाबद्दल अधिक जाणून घ्या.

५. धनुरासन

Dhanurasana - inline

धनुरासनाचे फायदे:

  • या आसनामुळे सुद्धा खांदे, छाती मोकळे होतात, ज्यामुळे श्वसनमार्ग सुरळीत व्हायला मदत होते.
  • या आसनामुळे मांड्या आणि उदराला खूप चांगला ताण बसल्यामुळे जठरातील पाचक रस चांगल्याप्रकारे स्रवतो आणि पचन चांगले होते.
  • या आसनामुळे पाणीच कणा मजबूत होतो ,त्यामुळे आपला बांधा चांगला रहातो आणि त्यामुळे रक्ताभिसरण चांगले होऊन पर्यायाने रोग प्रतिकारशक्ती वाढते.

लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी करण्याच्या काही गोष्टी

  • मुलांना स्तनपान द्या. ते देणे म्हणजे त्याना आयुष्यभराचे आरोग्य बहाल करण्यासारखे आहे.
  • जर तुमची मुले पौगंडावस्थेतील असतील तर त्यांना सिगारेट ओढल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती करून द्या.
  • मुलांना आठ तासाची झोप मिळते आहे ना बघा, कारण त्यामुळे त्यांची उंची वाढायला मदत होते आणि त्यांचे आरोग्य सुधारते.
  • तुमची मुले खेळण्यापूर्वी व नंतर, बाहेरुन आल्यावर, खाण्याच्या आधी स्वत:चे हात धुतात ना याकडे लक्ष द्या.
  • त्यांच्या स्वच्छतेच्या सवयींकडे लक्ष द्या.ते दिवसातून दोन वेळा दात घासत आहेत ना,नखे वेळोवेळी कापत आहेत ना, रोज आंघोळ करता आहेत ना हे बघा.

६. अधोमुखश्वानासन

adho mukh shwanasana inline
  • या आसनामुळे रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे होतो. लढाऊ पांढऱ्या रक्त पेशींचा सगळीकडे संचार झाल्यामुळे आपल्या शरीराचा संसर्गापासून बचाव होतो.
  • या आसनामुळे सायनसच्या जागा मोकळ्या होतात आणि श्वास जास्त सुलभ आणि सहजतेने घेता येतो.
    अधोमुखश्वानासनाबद्दल अधिक जाणून घ्या.

७. शिशुआसन

Shishuasana - inline

या आसनामुळे चेहऱ्याचे रक्ताभिसरण वाढते.आपली मज्जासंस्था सहजतेने काम करू शकते आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. शिशुआसनाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

८. गोमुखासन

गोमुखासनाचे फायदे :

या आसनामुळे पाठीचा कणा ताठ होतो. खांदे आणि मांड्या यांना खूप चांगला पीळ बसल्यामुळे रक्तप्रवाह चांगला होतो आणि आपल्या हाताच्या आणि पायाच्या बोटांच्या अगदी शेवटच्या भागापर्यंत रक्त पोचते.यामुळे तुम्हाला उत्साही वाटते आणि कुठल्याही प्रकारच्या रोगाला टक्कर देण्यासाठी शरीर सक्षम बनते.

९. भुजंगासन

Bhujangasana - inline
  • या आसनामुळे छाती आणि हृदयाचा भाग मोकळा होतो. म्हणजेच छातीचा आतला भाग उत्तेजित होतो. त्यामुळे श्वसनसंस्था मजबूत होते.
  • हे मान आणि खांदे उघडते आणि पाठीला लवचिक करते, घट्टपणा सैल करण्यास मदत करते. यामुळे शरीराला आराम मिळतो आणि मन उन्नत होते.
    भुजंगासनाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

१०. विपरीत करणी

  • या आसनात तुमचे डोके खाली आणि पाय वर असतात,त्यामुळे पायांकडे रक्त खेचून घेतले जाते.
  • आपल्या पाठीचे आणि गुडघ्यांचे वजन ,उलट स्थितीमुळे जाणवत नाही,त्यामुळे मोकळे आणि ताणमुक्त वाटते.
  • मज्जातंतुंची जोडणी घट्ट करते आणि शरीराला ऊर्जा देते.
  • खूप आरामदायी अनुभव मिळतो ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

तुम्हाला आरामात राहून संसर्गजंतूशी लढा द्यायळा तयार व्हायचे आहे का? दीर्घ काल फायदा मिळण्यासाठीवरील दिलेल्या आसनांचा तुमच्या जीवनशैलीमध्ये समावेश करा.तथापि, रोम एका दिवसात बांधले गेले नाही, हे सुद्धा लक्षात घ्या !!

शरीर संरक्षणाची उत्तम अस्त्रे

आपलं शरीर संपर्क उतींनी आतून बाहेरून खूप सुंदर धाग्यांनी विणलं गेलं आहे, शरीराचा प्रत्येक भाग, रक्त पेशी, नसा, स्नायू, हाडं, स्नायू बंध या उतीनी जोडले गेले आहेत. आपल्या शरीराच्या पोषणामध्ये, उत्सर्जन प्रक्रियेत, संदेशवहन यंत्रणेत ते महत्वाची भूमिका बजावतात. हे सगळे व्यवस्थित सांभाळणे हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

या असानांच्या द्वारे आपले स्नायू ताणले गेल्याचा फायदा होतो.ही आसन स्थिती उज्जेयी श्वासाबरोबर काही काळ ग्रहण केली, त्याच्या जोडीला प्राणायाम आणि ध्यान यांची पण जोड दिली तर आपली शरीराची संरक्षण संस्था मजबूत होईल.

डॉक्टर स्पंदन कट्टी, क्रेनिओसेक्रल थेरपिस्ट

आसनांमुळे आपल्या अवयवांची कार्यक्षमता वाढते तर प्राणायामामुळे शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढते. 

प्राणायाम: 

  1. कपालभाती प्राणायाम : शरीरातली उर्जा प्रवाह स्वच्छ करतो आणि आपले शरीर शुद्ध करतो.
  2. नाडी शोधन प्राणायाम: शरीराची झीज भरून काढतो आणि आपल्या मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागाचे संतुलन राखतो.
  3. भस्त्रिका प्राणायाम: श्वसन मार्गातल्या आजारांवर उपयोगी आहे आणि चिंतामुक्त व्हायला मदत करतो.

तुमच्या मुलांसाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारातल्या सवयी

  • कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी रोज पिणे.
  • रोज ताजी आणि त्या त्या ऋतूमध्ये मिळणारी फळे आणि भाज्या खाणे.(आंबट फळांमध्ये क जीवन सत्व भरपूर असते.)
  • आपल्या आहारातून पांढरे अन्न, जसे की साखर,मैदा,पॉलिश आणि प्रक्रिया केलेले वगळणे.

महत्वाचे म्हणजे तुमच्या मुलांना ध्यानाकडे वळवणे.

योग ही एक जीवनपद्धती आहे.फक्त काहीतरी आजार बरे करण्याचा शारीरिक व्यायाम नाहीये. इथे श्री श्री योगाचा रोग प्रतिकारशक्ती वाढवणारी आसने कशी करायची याचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता.

ध्यान, श्वास आणि योग करून तंदुरुस्त रहा तणावमुक्त रहा. येथे अधिक जाणून घ्या.

वरील लिखाण आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक श्री कमलेश बरवाल, यांनी दिलेल्या माहिती वरुन संकलित केले आहे.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *