आपल्या कार्यालयातील सहकारी फुटबॉल सामन्याचे आयोजन करत आहेत आणि आपण त्यात सहभागी व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. हि एक रोमांचक अपेक्षाच आहे, परंतु आपण त्यांना नकार देता आणि फक्त प्रेक्षकांच्या कक्षात बसून त्यांना पाठिंबा देता.
आपण भूतकाळात अनेक वेळा अशाच परिस्थितींना आपला मार्ग अडवू दिला असेल आणि तसे होऊ दिले असेल. असे काय आहे जे आपणास मागे ठेवते आहे ? दम्याचा आणखी एक अटॅक येण्याची भीती आपल्याला आपला आवडता खेळ खेळण्यापासून किंवा आपल्या जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यापासून रोखत आहे कां ?
या क्षणापर्यंत, आपण कदाचित दम्याला चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी बरेच प्रयत्न केले असतील. पण आपण सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय – म्हणजे योगाचा विचार केला आहे कां ? हे जुने विज्ञान दम्याचा परिणाम कमी करण्यास आणि काही व्यक्तीबाबतीत तो पूर्णपणे बरा करण्यास मदत करण्यास सक्षम आहे.
दम्यासाठी योगासने
आपणास दम्याचा अधिक प्रभावीपणे सामना करण्यास मदत करण्यासाठी योगासनांची आणि काही प्राणायामांची यादी येथे देत आहे:
- नाडी शोधन प्राणायाम
- कपाल भाती
- अर्ध मत्स्येंद्रासन
- पवनमुक्तासन
- सेतुबंधासन
- भुजंगासन
- अधो मुख श्वानासन
- बद्धकोनासन
- पूर्वोत्तानासन
- शवासन
१. नाडी शोधन प्राणायाम
आपले मन शांत होण्यासाठी आणि शरीरात साचलेल्या तणावापासून मुक्त करण्यासाठी नाडी शोधन प्राणायामाने सुरुवात करूया. हि श्वसन प्रक्रिया अनेक श्वसन आणि रक्ताभिसरण समस्यांवर प्रभावी उपचार आहे.
२. कपालभाती
कपालभाती हे श्वास घेण्याचे तंत्र आहे जे मनाला आराम देते आणि मज्जासंस्थेला ऊर्जा देते. हे सर्व नाड्या (ऊर्जा वाहिन्या) साफ करते आणि रक्ताभिसरण सुधारते.
३. अर्ध मत्स्येंद्रासन
छाती उघडते आणि फुफ्फुसांना ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो, ज्यामुळे आपल्याला दम्याचा प्रतिबंध होण्याची शक्यता वाढते.
अर्ध मत्स्येंद्रासनाबद्दल अधिक वाचा.
४. पवनमुक्तासन
पवनमुक्तासन दमा असलेल्या लोकांसाठी चांगले आहे कारण ते ओटीपोटाच्या अवयवांना मालिश करते आणि पचनास आणि गॅस सोडण्यास मदत करते.
५. सेतुबंधासन
सेतुबंधासन छाती आणि फुफ्फुस उघडते आणि थायरॉईडची समस्या कमी करते. पचन सुधारते आणि दम्याच्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहे.
६. भुजंगासन
भुजंगासन छातीचा विस्तार करते, रक्ताभिसरण सुधारते आणि दमा असलेल्या लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
७. अधो मुख श्वानासन
अधो मुख श्वानासन मनाला शांत करते आणि तणाव दूर करते आणि दमा आणि सायनस सायटिस ग्रस्त लोकांसाठी योग्य आहे.
८. बद्धकोनासन
बद्धकोनासन रक्ताभिसरण उत्तेजित करते आणि सुधारते, थकवा दूर करते आणि दम्यावर उपचारात्मक प्रभाव पाडते.
९. पूर्वोत्तानासन
पूर्वोत्तानासन श्वसन संस्था सुधारते, थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करते आणि मनगट, हात, पाठ आणि मणक्याला बळकट करते.
१०. शवासन
शवासनामध्ये काही मिनिटे झोपून आपला योगाभ्यास संपवा. हे आसन शरीराला ध्यानाच्या अवस्थेत आणते, आपणास ताजेतवाने करते आणि चिंता आणि दबाव कमी करण्यास मदत करते. दम्याचा सामना करण्यासाठी शांत आणि आरामशीर शरीर आणि मानसिकता आवश्यक आहे.
दम्यासाठी या आसनांचा आणि श्वसन प्रक्रियांचा १५- २० मिनिटांचा रोजचा सराव आपणास दम्याचा झटका येण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी करेल आणि आपली त्यापासून मुक्त होण्यास मदतही होऊ शकेल. ध्यान करण्यात घालवलेली काही मिनिटे आपला अनुभव वाढवतील आणि आपले मन शांत करण्यात मदत करेल. हॅपीनेस प्रोग्राममध्ये आपण योग आणि ध्यानाचे फायदे अनुभवू शकता.
दम्यावर आपले नियंत्रण असेल तर आपणास आपल्या जीवनाचा आनंद घेता येईल. मजबूत ढालीसारख्या योगाने, आपल्या परिपूर्ण जीवनाचा अनुभव घेऊ शकता आणि निश्चिंत राहू शकता. योग आपणास आपली क्षमता वाढवण्यास आणि परिपूर्ण जीवन जगण्यास सक्षम करते.