आपण उत्तम प्रकारे निरोगी असाल. परंतु आरोग्य सदैव उत्तम ठेवावे लागते. जीवनशैलीमधील काही किरकोळ बदल आपल्या संपूर्ण शरीरास सामर्थ्य आणि चैतन्य प्रदान करतील. हे बदल अत्यंत लाभदायक असले तरी आपल्या शरीरातील सर्व अवयवांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शेवटी सर्व अवयव मिळून पूर्ण शरीर होते, हो ना? अशीच एक अवयवांची जोडी जिच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे: मूत्रपिंड.

रक्तातून टाकाऊ पदार्थ गाळून रक्त शुध्दिकरणाचे महत्वाचे कार्य मूत्रपिंडे करत असतात. तसेच मूत्रमार्गाच्या कार्यामध्ये, संप्रेरकांच्या स्त्रवणामध्ये आणि शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात मूत्रपिंडे मदत करतात. शरीरात अचानक होणारे बदल निरस्त करून परिस्थिती जैसे थे राखण्याचे तसेच शरीरातील सर्व आम्लांचे आणि अल्कधर्मी द्रव्यांचे प्रमाण नियंत्रित करण्याचे अतिरिक्त कार्य देखील मूत्रपिंडांना करावे लागते. म्हणून हे स्पष्ट आहे कि मूत्रपिंडे ही शरीरातील अत्यंत महत्वाचे अवयव आहेत आणि त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.

मूत्रपिंडे काय करतात

  • चयापचय क्रियेदरम्यानचा टाकावू पदार्थ काढून टाकतात
  • गरजेच्या पोषक द्रव्यांचे शोषण करतात
  • आम्लधर्मी आणि अल्कधर्मी द्रव्यांचे शरीरातील प्रमाण योग्य संतुलनात ठेवतात
  • रक्त गाळण्यास मदत करतात
  • संप्रेरकांची निर्मिती करतात

आपल्या मुत्रापिंडांची काळजी

प्रगतशील देशांमध्ये मुत्रपिंडाशी संबंधित आजार अधिक आढळतात, ज्यात कुपोषण, ताण तणाव आणि आरोग्यास घटक जीवनशैली इत्यादीमुळे मुत्राशयाशी संबंधित आजारांनी भर घातली आहे. जागतिक आरोग्य संघटना(WHO) च्या संशोधनामध्ये समजले आहे की जगभरात प्रतिवर्षी अंदाजे दहा लाख लोकांचे मृत्यू मूत्रपिंड आणि मुत्रवाहिनी यांच्या संबंधित बिघाडामुळे होतात. शिवाय उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे विकार परिस्थिती आणखी बिघडवणारे आहेत.

आधुनिक औषधे आणि प्रगत वैद्यकीय उपकरणे यांच्या मदतीने मुत्रपिंडामुळे होणाऱ्या नुकसानीवर ताबा मिळवण्यात डॉक्टरांनी बरेच यश मिळवले आहे. याशिवाय मुत्रापिंडाच्या आरोग्यासाठी योगासारखे नैसर्गिक पर्याय परिणामकारक आणि सुलभ आहेत.

आसने, ध्यान आणि आयुर्वेद यांच्या माध्यमातून परिपूर्ण जीवनासाठी निरोगी जीवनशैली प्राप्त करून देणारी योग ही प्राचीन ज्ञानशाखा आहे. मुख्य म्हणजे योगोपचार हा पूर्ण नैसर्गिक आणि कोणताही दुष्परिणाम नसलेला आहे.

निरोगी मूत्रपिंडासाठी योग

योगासनांमुळे विविध अवयवांना मसाज मिळाल्याने ते उत्तेजित होऊन शरीराला उत्तम परिस्थितीमध्ये येण्यास मदत होते. आपल्या मूत्रपिंडाच्या आरोग्याची खात्री करण्यासाठी या सोप्या योगासनांनी सुरवात करा. या आसनांचा उपयुक्त परिणाम शरीराच्या इतर अवयवांवरदेखील होतो. म्हणजे मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी योगासने करताना आपण संपूर्ण शरीराला देखील मदत करत असतो. खऱ्या आरोग्याची येथून सुरवात होते.

Salamba Bhujangasana pose - inline

सलंब भुजंगासन

या आसनामुळे शरीराला खेचले जाऊन विस्तार प्राप्त होतो, ज्यामुळे पोटातील अवयव मजबूत होतात. यामुळे शरीरातील रोग प्रतिकार शक्ती देखील वाढते.

Ardha matsyendrasana

अर्ध मत्स्येन्द्रासन

अर्ध मत्स्येन्द्रासनमुळे मूत्रपिंड आणि यकृत उत्तेजित होतात. शिवाय शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते.

Bhujangasana-inline

भुजंगासन

भुजंगासनामुळे पोटातील अवयव उत्तेजित होऊन शरीरातील ताण तणाव आणि आळस निघून जातो. हे आसन रोग प्रतिकार शक्ती वृद्धिंगत करणारे म्हणून सुद्धा ओळखले जाते.

Paschimottanasana inline

पश्चिमोत्तानासन

या आसनामुळे मूत्रपिंडे उत्तेजित होतात, पचन क्रिया सुधारते आणि मासिक पाळीतील अस्वस्थता कमी होते.

Setu-Bandhasana

सेतू बंधासन

या आसनामुळे पोटातले अवयव उत्तेजित होतात. यामुळे वाढलेला रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते आणि शरीरातील ताण तणाव निघून जातो.

Naukasana Boat pose inline image

नौकासन

या आसनामुळे पोटातील अवयव उत्तेजीत होऊन बळकट होतात. पचन क्रिया सुधारून ताण कमी होण्यास मदत होते.

मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी योग कसा कार्य करतो

योगासने ही विश्राम देणारी असतात. शरीरातील जलधारण क्षमता नियंत्रित करण्यास मदत मिळते. गाढ झोपेचा कालावधी वाढल्यामुळे अधिक विश्रांती मिळते. एक चांगले विश्राम पावलेले शरीर हे शरीरातील जल नियोजन आणि हृदयाचे ठोके स्थिर ठेवण्यासारखी कार्ये अधिक चांगली करू शकते.

योगासनांमुळे अंतर्गत अवयव निरोगी रहातात, शरीरातील विविध प्रणाली संतुलित राहतात आणि शरीर आणि मनातील ताण तणाव परिणामकारक नियंत्रित होतात. काही योगासने आणि प्राणायाम मुळे अंतर्गत शुद्धीकरण विधी सुलभ होऊन शरीरातील विषारी द्रव्यांचे उत्सर्जन चांगले होते. यामुळे शरीरातील विविध अवयवामधील रक्त प्रवाह योग्य होऊन शरीर ताजेतवाने आणि ऊर्जावान राहते. मग आपण म्हणाल का, की मूत्रपिंडाच्या आरोग्याचा योगाशी संबंधच नाही!

मूत्रपिंडे निरोगी राखण्यासाठी काही सूचना

निरोगी मूत्रपिंडासाठी योगासनाअतिरिक्त जीवनशैलीमध्ये आणखी काही बदल आपण करू शकता:

  • घरात बनवलेले अन्न खा, बाहेरचे अन्न टाळा.
  • आपल्या आहारात फळे आणि हिरव्या पालेभाजांचे प्रमाण वाढवा.
  • पोटॅशियमचे प्रमाण अधिक असणारे अन्न टाळा आणि जास्त लोह असणारे अन्न पदार्थ आहारात वाढवा.
  • ज्यादा पौष्टिकतेसाठी आयुर्वेदिक आहाराकडे वळा.
  • भरपूर पाणी प्या आणि दररोज ६ – ८ तासांची झोप घ्या.

निरोगी मुत्रापिंडासाठी नियमित योगासने आणि ध्यान करा, सकस आहार घ्या आणि उत्तम विश्रांती घ्या. तणावग्रस्त शरीरापेक्षा तणाव मुक्त शरीर उपचाराला अधिक सकारात्मक प्रतिसाद देते. सर्वात महत्वाचे म्हणजे सकारात्मक रहा आणि आपल्या जीवनाचा सर्वार्थाने आनंद घ्या.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *