पाठीच्या मणक्याचा खालचा भाग संपूर्ण शरीराला आधार देतो आणि त्या भागात झालेली दुखापत किंवा सतत बराच वेळ कॉम्प्युटरवर काम केल्यामुळे होणारी ईजा, यामुळे संपूर्ण शरीर प्रणालीच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. असेही म्हटले जाते की अंदाजे ८० टक्के लोकांना त्यांच्या आयुष्यात एकदा तरी पाठदुखी किंवा मणक्याच्या दुखापतींचा त्रास होत असतो. यावर इलाज करण्यासाठी आपण योगाची मदत घेऊन नैसर्गिकपणे पाठीच्या खालच्या भागाला बळकट करू शकतो.

कंबरदुखीसाठी योगासने:

आपण सहज आणि नैसर्गिकपणे मणक्याच्या कनिष्ठ कंबरेच्या योगासनांचा नियमित अभ्यास करून स्वतःला कसे मजबूत आणि निरोगी बनवू शकतो ते पाहू या.

१. धनुरासन

Dhanurasana - inline

हे आसन पाठीच्या खालच्या भागाचे आणि पोटाचे स्नायू मजबूत करते, तसेच संपूर्ण पाठ लवचिक ठेवते.

धनुरासनाबद्दल अधिक जाणून घ्या.

२. नटराजासन

Natarajasana - inline

हे आसन नितंब आणि पोटाच्या स्नायूंसह पाठीच्या खालच्या भागाला ताण देते आणि मजबूत करते, ज्यामुळे पाठीचा कणा लवचिक राहतो.

३. सेतू बंधासन

Setu Bandhasana - inline

या आसनाने पाठीचा खालचा भाग मजबूत होतो आणि पाठदुखीपासून आराम मिळतो.
सेतू बंधनासन कसे करावे यासाठी येथे क्लिक करा.

४. मत्स्यासन

Matsyasana- inline

या आसनाने नितंबाच्या सांध्यामध्ये रक्ताचा संचार वाढतो, आणि पाठीच्या खालच्या भागात तणाव कमी होतो.
मत्स्यासनाबद्दल अधिक जाणून घ्या.

५. नौकासन

Naukasana - inline

नौकासनाचे फायदे :

हे आसन पोटाच्या स्नायूंसह पाठ मजबूत करते.

६. मार्जरासन

Yoga Cat stretch (Marjariasana) inline

मार्जरी आसन कसे करावे ते शिका:
हे आसन पाठीच्या खालच्या आणि वरच्या भागाला ताणते आणि संपूर्ण पाठीच्या कण्याला लवचिकता देते.

खालच्या भागातल्या कंबरदुखीचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे आपल्या शरीराची ढब किंवा चालण्या बसण्यातील आपला पवित्रा. आपण कुबड काढून बसलो आणि खांदे झुकलेले असले तर पाठीच्या खालच्या भागातील स्नायू दुबळे होऊ शकतात. आपल्या शरीराच्या पवित्र्याचा होणारा परिणाम फक्त बसण्यापुरता मर्यादित नाही. आपण ज्या प्रकारे उभे राहतो, चालतो आणि अगदी झोपतोदेखील, त्यामुळे देखील पाठीत वेदना वाढू शकतात. हे टाळण्यासाठी, आपल्या शरीराची ढब सुधारण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. खाली घसरत्या स्थितीत बसणे किंवा पाठ वाकवून चालणे टाळा.

कामाच्या ठिकाणी, आपल्या पाठीला आधार देणारी आणि आपले पाय जमीनीवर टेकवून नीट बसू शकाल अशी खुर्ची वापरा. तसेच, दर एक दोन तासांनी उठून थोड्या फेऱ्या मारा. यामुळे पाठीचा तणाव दूर होण्यास मदत होईल, पायांच्या स्नायूंना ताण मिळेल आणि डोळ्यांना आराम मिळेल. ऑफिस योग केल्याने वेदना कमी होतील आणि आपणास आरामात काम करता येईल.

याहून उत्तम परिणामांसाठी, आपला योगाभ्यास संपल्यानंतर २० मिनिटे ध्यान करणे खूप उपयुक्त आहे. यामुळे आपले मन शांत आणि एकाग्र राहील आणि आपली उत्पादकता वाढण्यास मदत होईल.

पोहणे आणि नियमित चालणे यासारखे इतर शारीरिक व्यायामदेखील पाठदुखी दूर करण्यास सहाय्यक ठरतात. पोहण्यात विशेषत: बॅकस्ट्रोक आणि क्रॉलस्ट्रोकचा सराव केल्याने आपली संपूर्ण पाठ मजबूत होते. त्यामुळे दररोज ३० मिनिटे पोहणे आपल्याला पाठीच्या समस्यांपासून दूर ठेवू शकते. आपली पाठ बळकट करण्यासाठी चालणे हा सुद्धा एक उत्तम व्यायाम मानला जातो. ज्यांना नेहमी वेळेची कमतरता असते, त्यांच्यासाठी प्रत्येक जेवणानंतर पाच ते दहा मिनिटे चालणे हा एक चांगला पर्याय आहे. पुढच्या वेळी आपण चालाल तेंव्हा पाठ सरळ ठेवून चालण्याचे मात्र लक्षात ठेवा.

लठ्ठपणामुळे पाठीच्या खालच्या भागावर ताण येतो आणि त्यामुळे तुम्हाला पाठीच्या खालच्या भागात दुखापत होण्याचा अधिक धोका निर्माण होतो. त्यामुळे आरोग्यदायी आहाराची सवय लावणेही महत्त्वाचे आहे. त्यासोबतच, योगाच्या नियमित सरावासह आयुर्वेदिक जीवनशैलीचा अवलंब केल्यास पाठदुखी लवकर बरी होण्यास मदत होऊ शकते.

ही योगासने अत्यंत फायदेशीर असली तरी, पाठदुखी किंवा स्लीप डिस्कचा त्रास असलेल्या लोकांनी यापैकी कोणत्याही योगासनांचा किंवा इतर शारीरिक व्यायामाचा सराव करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

योगाभ्यासामुळे शरीर आणि मनाचा उत्तम विकास होण्यास मदत होते आणि त्यामुळे आरोग्याचे अनेक फायदे मिळतात. तरीही हा औषधाचा पर्याय नाही. प्रशिक्षित श्री श्री योग शिक्षकाच्या देखरेखीमध्येच योगाभ्यास शिकणे आणि त्याचा सराव करणे महत्वाचे आहे. कोणतीही वैद्यकीय समस्या असल्यास, डॉक्टर आणि श्री श्री योग शिक्षकांचा सल्ला घेतल्यानंतरच योगाभ्यास करा. आपल्या जवळच्या आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर मध्ये श्री श्री योग कार्यक्रम शोधा. जर आपल्याला कार्यक्रमांबद्दल माहिती हवी असेल किंवा अभिप्राय द्यायचा असेल तर आम्हाला info@srisriyoga.in वर अवश्य लिहा.

    Wait!

    Don’t miss this Once-In-A-lifetime opportunity to join the Global Happiness Program with Gurudev!

    Have questions? Let us call you back

     
    *
    *
    *
    *
    *