आरोग्य म्हणजे फक्त रोगाचा अभाव नाही ; तर आपण आयुष्यात किती आनंदी, प्रेमळ आणि उत्साही आहोत याची अभिव्यक्ती होय.

गुरुदेव श्री श्री रवि शंकर

जी व्यक्ती स्वास्थपूर्ण आहे आणि स्वतःमध्ये स्थित आहे तिला स्वस्थ म्हणता येईल. म्हणजेच स्वस्थ व्यक्तीची ओळख ही फक्त शारिरीक स्वास्थ्यापुरती मर्यादित नाहीतर त्यापेक्षाही महत्वाचे मानसिक स्वास्थ्य आहे. “ मी स्वस्थ आहे परंतु मला आयुष्यात काही रस नाही” असे कोणी म्हणू शकत नाही. आयुष्याप्रतीचा उत्साह आपण किती स्वस्थ आहोत हे दर्शविते.

आजाराचे कारण किंवा अस्वास्थ्य जे सामान्यतः नोंदवले जाते ते म्हणजे अशुद्धी – मन, शरीर आणि वाचेच्या स्तरावरील. आपल्या स्वतःच्या वाचेमुळे आपणास स्वतःला आणि इतरांना त्रास होऊ शकतो. अगदी त्रास किंवा अस्वस्थता आजार म्हणून निदान केले जाते.

शरीर, मन आणि आत्मा हे एका तिपाई प्रमाणे आहेत. त्यातला एक घटक जरी बिघडला तरी आपल्या आयुष्याचा समतोल बिघडतो आणि आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. परिणामी आपले स्वास्थ्य बिघडते. आयुर्वेदाचा एक घटक असलेला योग या तिन्ही घटकांना संरेखित करून त्यामध्ये सुसंगती स्थापित करतो, ही सुसंगतता आयुष्याला आधार देते.

योग आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. आपल्या मनातून अनेक दूषित गोष्टी बाहेर काढून टाकून, योग मनाला आत्म्याशी जोडतो. उदाहरणार्थ, निद्रानाश हा ताण, चिंता किंवा नैराश्याशी निगडित असू शकतो. आपल्याला या कारणांवर उपचार करणे जास्त महत्वाचे ठरते. फक्त औषधे घेऊन विकार बरे होत नाही. योगमुळे आपणास आपले मन, शरीर, विचार आणि भावना यांच्याविषयी जास्त समज येते.जास्त स्पष्टता येते. त्यामुळे तुम्ही आपली प्राणशक्ती सकारात्मकतेकडे वळवून आयुष्यात प्रगती करु शकतो.

योग सराव आपण कधीही सुरु करू शकतो. आपण ध्यानाने सुरुवात करु शकता किंवा आसने न करता थेट प्राणायामाने सुरुवात करू शकता. योगासनांचा सराव करत असताना फक्त शरीरावरच नाही तर मनावर देखीन लक्ष दया, कारण शरिर आणि मन दोन्हीचा समन्वय असावा लागतो. योगासने करत असताना दूरदर्शन पाहू नका किंवा वर्तमानपत्र वाचू नका. कारण जर आपण सजगपणे आसने केली नाहीत, तर त्त्या आसनांचा फारसा परिणाम होणार नाही. जर आपले प्रत्येक आसन श्वास आणि सजगता त्यांच्या एकतेमधून असेल तर आपला सराव योगाभ्यास बनतो.

स्वास्थ्यामध्ये आहाराची भूमिका

हिमालयात राहणारे योगी अन्नाशिवाय जगू शकतात कारण त्यांचे शरीर प्राणशक्तीवर चालते, त्यांना अन्नाची गरज नसते. परंतु आपल्याला अन्नाची आणि निरोगी आहाराची गरज असते.

आपणास माहित आहे कां आपल्या पुढच्या दिवसाची सुरुवात ही आद‌ल्या दिवशीच्या रात्रीच्या जेवणापासून झालेली असते? आपण काय खातो, कोणत्या वेळी खातो आणि किती प्रमाणात खातो याचा परिणाम आपली झोप, सकाळ आणि संपूर्ण दिवसावर होतो.

आहाराचा आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम होतो हे सर्वश्रुत आहेच. वात, पित्त आणि कफ ह्या त्रिदोषांच्या असंतुलनामुळे विकार निर्माण होतात. समजा एखादया व्यक्तीच्या शरीरात पित्त जास्त असेल, त्याने पित्त वाढवणारे अन्न खाल्ले तर त्यामुळे बेचैनी, चिंता वाटणे, झोप न येणे असा त्रास होवू शकतो. त्यामुळे आयुर्वेदिक वैद्याकडून नाडीपरीक्षा करून कोणते अन्न शरीरा‌ला आणि मनाला योग्य आहे हे जाणून घेणे महत्वाचे ठरते.

आरोग्याचा दुसरा महत्वपूर्ण पैलू

विहार (दिनचर्या) आपली आरोग्यपूर्णता ठरविण्यात मोठी भूमिका बजावते. आपल्या आयुष्यासाठी काय योग्य आहे याची साधकाला माहिती असायला हवी.

आपल्या शरीराचा कल स्वास्थ्यपूर्ण राहण्याकडे असतो. एका पातळीवर आपल्या शरीराची अंतर्गत बुद्धिमत्ता आपल्याला संदेश देत असते, परंतु आपण आपले मन आणि भावना यांच्या आहारी जाऊन आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. जेव्हा आपण आपल्या मन आणि भावनांचे शिकार बनतो, तेंव्हा ही शारिरीक बुद्धिमत्ता निष्क्रिय ठरून शारिरीक स्तरावर त्रास निर्माण होतात आणि लवकरच याचा एक आकृतीबंध तयार होतो.

डोकेदुखी हा एक आजार नसून कोणत्या तरी मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते. जेंव्हा आपण वेदनाशामक औषधे घेऊन डोकेदुखी तात्पुरती थांबवतो, तेंव्हा काही काळाने मूळ आजार खूप मोठ्या स्वरुपात समोर येतो.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *