आज अनेक लोक नैराश्याला बळी पडत आहेत. याचे कारण म्हणजे सध्याची धकाधकीची आणि आरोग्यास हानिकारक अशी जीवनशैली, हार्मोनचे / संप्रेरकांचे असंतुलन, तणाव आणि जीवनातील अत्यंत क्लेशकारक अशा अनुभवांना सामोरे जाण्याची असमर्थता ही असू शकतात. नैराश्याची लक्षणे ही तीव्रतेनुसार आणि व्यक्तीनुसार बदलू शकतात. त्या व्यक्तीकरिता आणि आजूबाजूच्या लोकांसाठी हा एक कठीण अनुभव असतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जागतिक स्तरावर, सर्व वयोगटातील ३० कोटीहून अधिक लोक नैराश्याने ग्रस्त आहेत.

चांगली बातमी: योग, ध्यान आणि खाण्याच्या चांगल्या सवयी यासारखे काही साधे जीवनशैलीमधील बदल नैराश्याच्या भावनांवर मात करण्यास मदत करू शकतात. हे सगळे  कसे काम करते? आयुर्वेदानुसार, नैराश्य म्हणजे शरीर-मनाच्या मिश्रणामध्ये प्राण किंवा जीवनशक्ती खालावण्याचे लक्षण आहे. प्राण हा उत्साह, आनंद आणि शांतीसाठी जबाबदार आहे. योग आणि ध्यानाचा नियमित सराव प्राणाची पातळी वाढवण्यास मदत करतो, ज्यामुळे नैराश्याची लक्षणे दूर होतात. वास्तविक पाहता, अनेक वैज्ञानिक अभ्यासांमध्ये नैराश्यग्रस्त लोकांवर योगाचा प्रभाव हा नैराश्य निवारण करणारा असल्याचे आढळून आले आहे.

”एखादी व्यक्ती आजारातून बरे होण्याच्या दिशेने प्रवास करत असते, तेव्हा त्या व्यक्तीने आशावादी राहणे आणि विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे.” गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात:“जीवन हे सुख आणि दुःखाचे मिश्रण आहे. वेदना अपरिहार्य आहेत , परंतु व्यथित होणे ही ज्याची त्याची निवड आहे. जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टीकोन तुम्हाला वेदनादायक काळातून पुढे जाण्याचे बळ देतो. हे लक्षात घ्या की या जगाला तुमची खूप गरज आहे. आपल्या सर्व प्रकारच्या अनंत शक्यता संभाव्य असणारे हे जीवन म्हणजे एक अनमोल भेट आहे. कारण ते केवळ स्वतःसाठीच नाही तर इतर अनेकांसाठी देखील हर्ष आणि आनंदाचा झरा बनू शकते.”

नैराश्य कमी करण्यासाठी योगासने

शिशुआसन

  1. गहन आराम देऊ करते
  2. मज्जासंस्थेला शांत करते, तणाव आणि चिंता कमी करते.

शिशुआसन बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी.

हलासन

  1. मज्जासंस्था शांत करते, तणाव आणि थकवा कमी करते
  2. थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करते, तुमची मनोदशा आणि ऊर्जेची पातळी सुधारण्यास मदत करते

हलासन करण्याचे लाभ जाणून घ्या.

शवासन

  1. एक खोल आणि ध्यानात्मक विश्रांती घेण्यास सक्षम करते, नैराश्याचे प्रमुख कारण असलेल्या तणावापासून मुक्त करते
  2. वात दोषामुळे (वायू घटकाचे असंतुलन झाल्यामुळे) तुम्हाला निराशा आणि चिंता वाटू शकते. हे असंतुलन कमी करण्यास मदत करते
  3. तुम्हाला ताजेतवाने आणि टवटवीत करण्यास मदत करते

शवासन बद्दल अधिक जाणून घ्या.

अधोमुख श्वानासन

अधोमुख श्वानासन कसे करावे यासाठी इथे क्लिक करा.

  1. शरीराला ऊर्जा देते आणि नवचैतन्य प्रदान करते
  2. मेंदूतील रक्ताभिसरण वाढवते, ज्यामुळे तुमची मनस्थिति सुधारण्यात मदत होते
  3. डोकेदुखी, निद्रानाश आणि थकवा दूर करण्यास मदत करते

सेतु बंधासन

  1. मेंदूला शांत करते, चिंता आणि नैराश्य कमी करते
  2. फुफ्फुस उघडते. थायरॉईडमुळे सतत मनस्थिति बदलत राहणे आणि नैराश्य येणे या समस्या होतात त्यांना कमी करते आणि नियंत्रणात आणते

सेतु बंधासन बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

श्वासोच्छवासाचे व्यायाम

श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि प्राणायाम हे विशेषतः नैराश्यावर मात करण्यासाठी प्रभावी तंत्रे आहेत.

भ्रामरी प्राणायाम

  • क्षुब्ध मन शांत करण्यास मदत होते
  • आत्मविश्वास निर्माण करते

भ्रामरी प्राणायाम विषयी अधिक जाणून घ्या.

नाडी शोधन प्राणायाम

नाडी शोधन प्राणायाम कसा करावा जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

  • भूतकाळातील आणि भविष्यातील अनावश्यक विचार काढून टाकून मनाला वर्तमानात आणण्यास मदत करते
  • नाड्या- ऊर्जा वाहिन्या, शुद्ध करण्यास मदत करते , व प्राणाचा संचार सुरळीत होणे सुनिश्चित करते
  • जमा झालेल्या तणावापासून मुक्ती मिळण्यास आणि नैराश्य दूर करण्यास मदत करते

एक डझनहून अधिक प्रकाशित अभ्यासांनी नोंद केली आहे की सुदर्शन क्रिया™ आणि त्या सोबतची श्वासोच्छवासाची तंत्रे (SKY) शिकलेल्या आणि सराव करणाऱ्या व्यक्तींना नैराश्यापासून लक्षणीय आराम मिळाला आहे. या अभ्यासांनी सप्रमाण सिद्ध केले की नैराश्याची तीव्रता कितीही जरी असली तरी नैराश्यापासून मुक्त होण्यात यशस्वी होण्याचे प्रमाण ६७ ते ७३ % इतके प्रमाण आहे.

काही बोनस टिपा

  • समाज सेवेत सामील व्हा: ‘मी समाजासाठी काय करू शकतो’, असा विचार करून, एखाद्या मोठ्या कारणात गुंतून राहिल्याने जीवनाचे संपूर्ण लक्ष दुसरीकडे वळते आणि ‘माझ्याबद्दल काय’ या सततच्या विचाराच्या चाकोरीतून बाहेर पडू शकतो.
  • जसे अन्न तसे मन: तुम्ही काय खाता ते पाहणे देखील खूप महत्वाचे आहे. ज्या पदार्थांमध्ये प्राणाचे प्रमाण जास्त आहे आणि आरोग्यदायी आहे , ते मन आणि शरीर यांना आनंदित करणारे असतात.
  • काही मंत्रांचा जप करा: जप केल्याने ऊर्जा वाढते आणि मन शांत होते.

योगाभ्यास शरीर आणि मनाचा विकास करण्यास मदत करतो आणि त्याचबरोबर तो आरोग्यासाठी फायदेशीर असतो. तरीपण तो औषधाला पर्याय नाही. प्रशिक्षित श्री श्री योग शिक्षकांच्या देखरेखीखाली योगासने शिकणे आणि सराव करणे महत्वाचे आहे. कोणत्याही वैद्यकीय समस्येच्या बाबतीत डॉक्टर आणि श्री श्री योग शिक्षक यांचा सल्ला घेतल्यानंतरच योगासनांचा सराव करा

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *