आपल्या शारीरिक दिसण्यामध्ये उंची असणे अत्यावश्यक आहे आणि तिचा आपल्या आत्मविश्वासावर आणि आत्मसन्मानावर लक्षणीय प्रभाव पडतो. आपल्या उंचीसाठी अनुवांशिकतेची भूमिका महत्वाची असली तरी आपली उंची तिच्या क्षमतेइतकी वाढण्यासाठी बरेचसे नैसर्गिक मार्ग उपलब्ध आहेत. योगासनांच्या सहाय्याने उंची वाढवणे हा सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे.

मग उंची नैसर्गिकरित्या कशी वाढवावी? उंची वाढवण्यासाठी काय करावे, शोधात आहात ना?

स्वाभाविकपणे उंची कशी वाढवावी, हे शोधत असाल तर योगासने हा उत्कृष्ट मार्ग आहे. योगासनांच्या दैनंदिन सरावामुळे पाठीचा मणका ताणण्यास, त्याची लांबी वाढण्यास, लवचिकता वाढण्यास आणि वाढीच्या संप्रेरकांच्या स्त्रवण्यास सुरवात होते. या सत्रमध्ये उंची वाढण्यास काही परिणामकारक योगासनांची चर्चा करू.

उंची वाढण्यासाठी योगासने

भुजंगासन

Bhujangasana cobra pose - inline

उंची वाढवण्यासाठी उत्कृष्ट आसनांपैकी एक आहे, भुजंगासन. या आसनामध्ये उंची वाढण्यासाठी पाठीच्या कण्याला ताण बसतो. या ताणामुळे आपली ठेवण सुधारते, पाठीच्या कण्याची लवचिकता सुधारते आणि कालांतराने उंची वाढण्यास मदत होते. शिवाय उंची वाढण्यासाठी आवश्यक संप्रेरकांच्या स्त्रवण्यास भुजंगासनामुळे उत्तेजना मिळते. भुजंगासनाच्या सातत्यपूर्ण सरावामुळे आपले शारीरिक आरोग्य सर्वार्थाने सुधारण्यास मदत होते.

नटराजासन

Natarajasana dance pose - inline

उंची वाढवणाऱ्या आसनांमध्ये नटराजासन येते. हे आसन करण्यासाठी समतोल, लवचिकता आणि सामर्थ्य हवे असते. या आसनामुळे कण्याची लांबी वाढण्यास तसेच पायातील आणि कटीप्रदेशातील स्नायू, अस्थिबंध आणि स्नायूबंधांचा ताण वाढण्यास मदत होते. शिवाय नटराजासनामुळे आपण आंतून बळकट होऊन आपल्या शरीराचा बांधा सुधारतो. नटराजासनाच्या नियमित सरावामुळे एकंदरीत उंची वाढण्यास आणि शरीराची मजबुती, लवचिकता आणि समतोल सुधारण्यास मदत होते.

ताडासन

उभे राहून करायच्या आसनांमध्ये ताडासन हे उभ्याने करावयाचे मूळ आसन आहे. आपली उंची वाढण्यासाठी तसेच आपली ठेवण ताठ आणि सरळ होण्यासाठी या उत्तम आसनाचा आपल्या योग साधनेमध्ये समावेश करणे उत्तम. ताडासन हे आपले शरीर आणि श्वसन यांच्याप्रती सजग होण्यासाठी मदत करणारे सोपे, सुलभ आणि शक्तिशाली आसन आहे.

मार्जरीआसन

Marjariasna cat pose -inline

नैसर्गिकरित्या उंची वाढवण्यास मदत करणारे योगासन आहे मार्जरीआसन (मांजरी सारखी स्थिती). या आसनामध्ये पाठीच्या कण्याची कमान आणि वर्तुळ होत असल्याने पाठीचे स्नायू, अस्थिबंध आणि स्नायुबंध हे लवचिक आणि मजबूत होतात. कण्याला मिळणाऱ्या या ताण आणि मसाजामुळे आपली ठेवण सुधारण्यास, लवचिकता वाढण्यास आणि उंची कायमची वाढण्यास मदत होते.

सूर्य नमस्कार

सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि आपली उंची स्वाभाविकपणे वाढण्यास उत्तम उत्तर म्हणजे बारा आसनांचा संच, सूर्य नमस्कार हेच आहे. सूर्य नमस्काराचा उत्तम सराव केल्याने आपले शरीर, श्वास आणि मन यात सुसंवाद होऊ शकतो. यातील पुढे आणि मागे झुकणे तसेच खाली आणि वर अशा होणाऱ्या हालचालीमुळे शरीरात चैतन्याचा संचार, रक्ताभिसरण सुधारणे, पचनक्रिया सुधारणे आणि संप्रेरकांचे स्त्रवणे सुधारते. तसेच उंची वाढण्यास आवश्यक असणारी शरीराची ठेवण, समतोल आणि लवचिकता सुधारण्यास सूर्य नमस्काराची मदत होते. सूर्य नमस्कारामधील प्रभावी ताणांमुळे उंची आपाद मस्तक वाढते. हा निव्वळ स्नायू आणि सांध्यांना मिळणारा नाहीतर सर्व अवयवांना मिळणारा उत्कृष्ट व्यायाम आहे.

जर आपण आपल्या उंची वाढीबाबतीत समाधानी नसाल तर येथे दिलेल्या योगासनांसोबत विशिष्ट सकस आहार घ्या. ही योगासने केल्याने उंची वाढण्यासाठी पाठीच्या कण्याला ताण मिळतो. यांच्या सहाय्याने अडकलेली विषारी द्रव्ये मुक्त होऊन पेशींची आणि संप्रेरकांची निरोगी वाढ होण्यास सहाय्य होते. मात्र योग्य ठेवण राखणे आणि परिणामकारक योगासनांचा सराव करण्यास समर्पित असणे निर्णायक ठरते.

मार्गदर्शनाखालील सराव

वाढत्या वयामध्येच उंची वाढण्यासाठी विशेषतः योगासने उपयुक्त ठरतात. तसेच प्रशिक्षित योग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योग साधना करणे उत्तम. सुरुवात करणाऱ्यांसाठी आमचे आठ तासांचे “श्री श्री योग” हे एक परिपूर्ण असे शिबीर आहे. यामुळे आपले मन, शरीर आणि श्वास यांच्यातील संबंध बळकट होण्यास मदत होते. यामध्ये निर्माण झालेला ताण तवाण नाहीसा करण्यासाठी विविध आसनांचे व्यावसायिक मार्गदर्शन केले जाते. तसेच आपल्या शरीर आणि जीवनशैलीला अनुकूल असा योगाचा नित्यपाठ बनवण्यासाठी श्री श्री योग प्रशिक्षक मदत करतील.

    Wait!

    Don’t miss this Once-In-A-lifetime opportunity to join the Global Happiness Program with Gurudev!

    Have questions? Let us call you back

     
    *
    *
    *
    *
    *