कडाक्याची थंडी संपून वसंत ऋतुची शीतलता जाणवायला लागते, कडक उन्हाळा संपून आल्हाददायक पावसाळा सुरू होतो. निसर्गात जेव्हा ऋतुबदल होत असतो तेव्हा किती सुंदर वातावरण असतं! सगळीकडे उल्हास असतो, पण काही जणांसाठी मात्र हा सर्दी खोकल्याचा ऋतू असतो!
रोगप्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी योगासने (Yoga Poses for Immunity Increase)
या ऋतुबदलामुळे होणाऱ्या आजारापासून दूर रहाण्याचा उपाय म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणे ! योगासनामुळे थायमस ग्रंथी उत्तेजित होते व आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते. छाती जवळच्या भागात ही ग्रंथी असते. ज्या आसनांमुळे छातीचा भाग रुंदावतो, अशी आसने केल्यावर थायमस ग्रंथी सक्रिय होते. अशी काही आसने खाली दिली आहेत:
सेतुबंधासन
सेतू बंधासनाचे फायदे.
- छाती, गळा आणि पाठीचा कणा ताणला जातो.
- फुफ्फुसे मोकळी होतात.
- अस्थमा, उच्च रक्तदाब आणि सायनस (कपाळानजिक पोकळीत दुखणे) कमी होतात.
हस्तपादासान
- यामुळे डोक्याकडे रक्तप्रवाह वाढतो.
- सायनस मुळे होणारी कपाळदुखी थांबते.
- चेतासंस्था चांगल्या प्रकारे काम करते.
- शरीरातील ताण नाहीसा होतो.
हस्तपादासनाबद्दल अधिक वाचा.
मत्स्यासन
मत्स्यासन कसे करावे.
- छाती व गळ्या जवळील भाग ताणला जातो.
- श्वसनाच्या विकारापासून आराम मिळतो.
- पॅराथायरॉईड, पिट्यूटरी व पीनियल (शंकूच्या आकाराच्या) ग्रंथींचे काम सुधारते.
धनुरासन
धनुरासनाचे फायदे.
- छाती, गळा आणि खांदे हे भाग विस्तारित होतात.
- बद्धकोष्ठता आणि मासिक पाळीचे त्रास थांबतात.
- मूत्रपिंडाच्या कार्यातील अनियमितता कमी होण्यास मदत होते.
विपरित करणी
- डोक्याचा रक्तप्रवाह सुधारतो.
- मन शांत करते.
- डोकेदुखी आणि पाठदुखीवर मात करण्यास मदत करते.
भुजंगासन
भुजंगासन कसे करावे ते वाचा.
- छातीचा भाग विस्तार पावतो.
- रक्ताभिसरण सुधारते.
- ताण व थकवा कमी होतो.
सर्दी, खोकला आणि सायनसचे आजारा पासून संरक्षक प्राणायाम
योगासनांशिवाय प्राणायाम किंवा श्वसनाच्या तंत्रांमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढायला चांगली मदत होते. काही श्वसनाची तंत्रे अशी आहेत की त्यामुळे श्वसन मार्ग मोकळा होतोच आणि जंतुसंसर्गापासून संरक्षण देते.
नाडीशोधन प्राणायाम
- चोंदलेले नाक मोकळे होते.
- फुफ्फुसाना प्राणवायूचा अधिक पुरवठा होतो.
- सर्दी झाल्यास या प्राणायामाच्या ७ ते ८ फेऱ्या दिवसातून दोन किंवा तीन वेळा कराव्यात.
कपालभाती
श्वसन मार्ग मोकळा होतो.
रक्ताभिसरण सुधारते.मनाला उभारी येते.
दिवसातून दोन तीन वेळा कपालभातीच्या फेऱ्या करा आणि सर्दी-पडशापासून आराम मिळवा.
कपालभाती बद्दल अधिक जाणून घ्या.
श्वसन मार्ग मोकळा होतो.
रक्ताभिसरण सुधारते.मनाला उभारी येते.
दिवसातून दोन तीन वेळा कपालभातीच्या फेऱ्या करा आणि सर्दी-पडशापासून आराम मिळवा.
भस्त्रिका प्राणायाम
- जोरात श्वास बाहेर सोडल्याने श्वसनमार्ग मोकळा होतो.
भस्त्रिका प्राणायामाचे फायदे.
उज्जयी प्राणायाम
- फुफ्फुसांची क्षमता वाढते.
- प्रत्येक बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर जास्तीत जास्त विषद्रव्ये शरीराबाहेर टाकली जातात.
जलनेती (Jal Neti)
नाकाचा मार्ग स्वच्छ करण्याचे जलनेती हे एक उत्तम तंत्र आहे. यामुळे सर्दी,खोकला आणि सायनसचा त्रास नाहीसा होतो. नाकाचा मार्ग स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी वापरतात. त्यामुळे नाकातील साठलेला मळ ( श्लेश्मा ) निघून जातो. एकदा मार्ग स्वच्छ झाला की जंतुसंसर्ग होण्याची भीती रहात नाही.
योग नियमित केल्याने रोगप्रतिकार प्रणाली मजबूत होते. तसेच विषाणूंशी सामना करण्याची क्षमता वाढते. प्राचीन आयुर्वेदाच्या नैसर्गिक व समग्र औषधप्रणाली मुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते.