सध्याची पिढी अनेक रोगांच्या विळख्यात अडकली आहे.त्यामुळेच अखेर या पिढीला स्वास्थ्यपूर्ण राहणीचं महत्त्व पटलं आहे. तंदुरुस्त रहाण्यासाठी लोक आता योग , ताई-ची (पुरातन चिनी तंत्र) या सारख्या प्राचीन मार्गांकडे वळू लागले आहेत.एवढेच नाही तर ताबडतोब वजन कसं कमी होईल यासाठी उपाय शोधत आहेत. एक लक्षात घ्या की , ‘ वजन कमी होणं ‘ हा एक प्रवास आहे म्हणून घाई करु नका ! जेव्हा लगेचच फळ मिळतय असं वाटतं, तिथे धोका आहे.वजन कमी होण्याची प्रक्रिया तिच्या गतीनं होऊ द्या ! अजिबात घाई करु नका ! अध्यात्मिक मार्ग हा वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. कारण अध्यात्मामुळे शरीर व मन एकरूप होतात. मनाला अध्यात्माची जोड मिळते, मन शरीराला दिशा देत असतं.ही बदलाची प्रक्रिया होत असताना मन सजग असतं.
अध्यात्माचं उद्दिष्ट आहे , आनंदी होणं,असा आनंद; जो तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही!
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
अध्यात्मिक मार्गाने वजन कसं कमी करायचं
मनावर ताबा ठेवा!
तुम्हाला भुकेचं शास्त्र माहीत आहे का ? आपल्याला वाटतं पोटातून भूक लागते ! पण तुम्ही जेव्हा खाद्यपदार्थ पहाता, तेव्हा ते तुम्हाला मनातून हवेहवेसे वाटतात. तुमची भूक चाळवते (अर्थात नेहमीच असे होईल असं नाही!) वारंवार लागणाऱ्या भुकेच्या संवेदनेसाठी मनावर ताबा ठेवणे हाच अध्यात्मिक मार्ग आहे. ध्यान व मनातून केलेला निश्चय यामुळे आपल्याला वस्तुस्थितीचं ज्ञान होतं, आणि आपण आत्ता खावं का, काय खावं, किती खावं याबद्दल जागरुक होतो.
दृढनिश्चय न करणारे मन दुःखी असतं .निश्र्चयी मनाला कधीकधी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो, पण त्याचं चांगलं फळ मिळतच!
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
कृतज्ञ रहा
सभोवताली आपण काही कमनशिबी लोक पहातो,तेव्हा काय वाटतं ? आपल्याबद्दल कृतकृत्य भाव ! बरोबर ? लक्षात ठेवा की आपल्याला मिळालेलं जीवन ही मोठी कृपा आहे, आशीर्वाद आहे.आपल्याला शरीर व मन मिळालंय याबद्दल आभारी रहा. ही नम्रता, ही लीनता तुम्हाला कोणतीही अनारोग्यकारक सवय लागण्यापासून परावृत्त करेल.
जीवनात सर्व अंगांनी बहरुन येणे , म्हणजेच अध्यात्मिक दृष्ट्या बहरुन येणे ! आनंदी राहणे, स्वतःशी व आजूबाजूच्या प्रत्येकाशी सहजगत्या आनंदी राहणे!
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
आपली चक्रं जागृत करा
आपल्या शरीरामध्ये सात चक्रं म्हणजे ऊर्जा केंद्रं असतात. या चक्रांवर जेव्हा आपण काम करतो, तेव्हा मन,शरीरतील अवयय,,बुद्धी एकरूप होतात. सुदर्शन क्रिया, ध्यान व योग यामुळे ही चक्रं हळुवारपणे ,सुरक्षितपणे जागरुक होतात. यामुळे आपल्यात शारीरिक व भावनिक बदल होतात.अवाजवी खाण्याची इच्छा कमी होते आणि परिणामी वजन कमी व्हायला लगेचच सुरुवात होते.
ध्यानामुळे आपण रोगमुक्त होऊ शकतो. जेव्हा मन शांत असतं, सजग असतं,एकदम तृप्त असतं, त्यावेळी ते एखाद्या लेसर किरणासारखं असतं. अशा खंबीर,प्रबळ मनामुळे आजार बरे होऊ शकतात
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
थोड्या थोड्या कालावधीच्या अंतराने उपवास करणे
बऱ्याच धार्मिक परंपरांमध्ये उपवासाला एक अनन्यसाधारण स्थान आहे.यात ठराविक काळासाठी उपवास करायचा व सोडायचा अशी पद्धत असते. नियमित व थोडंसं खाऊन केलेला उपास, मधल्या वेळी थोडंसं खाणे किंवा अजिबात न खाणे असाही प्रकार असतो.काही काळानंतर अशा उपासांमुळे वजन कमी होण्याचा फायदा होतो, हे अभ्यासातून सिद्ध झालं आहे.
योग्य प्रमाणात खाणे व तेही जाणीवपूर्वक
सावकाश व जाणीवपूर्वक अन्न खाल्ल्याने पचन चांगलं होतं, सहाजिकपणे वजनही कमी होतं.सावकाश खाल्ल्याने ‘आपण काय खातो आहोत, ते आरोग्यासाठी किती चांगलं आहे ‘ असा विचार करायची सवय लागते. अन्नाचं महत्त्व कळतं. हलका आहार घेतला व झोपायच्या वेळी पोट रिकामं असलं की झोप व्यवस्थित होते व शरीर शुद्धीही होते. अनावश्यक खाणं टाळलं की आपली चयापचय क्रिया चांगली होते आणि आपलं वजन कमी व्हायला मदत होते.
योगसाधना करताना शरीराची स्थिती आणि मुद्रा
तब्बल सात हजार वर्ष जुना असलेला “योग”! वजन घटवायचे असेल तर हा एक मार्ग आहे, अगदी अचंबित करणारा ! योगामुळे शरीराला आणि मनाला विश्रांती मिळतेच,पण त्याच बरोबर वजनावर पण नियंत्रण रहातं. वजन आटोक्यात आणण्यासाठी काही उपयुक्त योगासने आहेत. उदा. सूर्यनमस्कार,धनुरासन, उत्कटासन (खुर्ची आसन) इत्यादी. मात्र योगामुळे वजनात सावकाश, हळुहळू घट होते. योगमुद्रांमुळे शरीरातील ऊर्जेच्या पातळीला चालना मिळते.त्यामुळे आजार बरे होण्यास व वजन कमी होण्याच्या प्रक्रियेला गती मिळते. प्रत्येक मुद्रेचं वेगवेगळं कार्य आहे — आदिमुद्रेमुळे फुप्पुसांची क्षमता वाढते व शरीरात प्राणवायूचा पुरवठा वाढतो. चिन्मयी मुद्रेमुळे मनाला विश्रांती मिळते,आपण स्वतःबद्दल जागरुक होतो. चिन मुद्रेमुळे एकाग्रता वाढते. इत्यादी.
योगसाधनेमुळे सात्विक आहाराचं महत्व पटतं. (सात्विक आहार म्हणजे भाज्या, फळे, कडधान्ये, सुकामेवा इत्यादीने युक्त आहार). सात्विक अन्नात प्राणशक्ती भरपूर असते.त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी सात्विक आहाराचा उपयोग होतो.वजन घटविण्याकरिता योग कसा करावा?
हा दुःखाचा नाश करणारा योग , यथायोग्य आहार व विहार करणाऱ्याला, यथायोग्य कार्य करणाऱ्याला, पुरेशी झोप घेणाऱ्या, योग्य निद्रा आणि जागरुक असणाऱ्याला साध्य होतो .
– भगवद्गीता
प्रक्रियेवर विश्वास ठेवा
जेव्हा आपण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे अध्यात्मिक मार्ग अवलंबितो, तेव्हा शास्त्रावर विश्वास ठेवून प्रक्रिया करणे निर्णायक ठरत असते. स्वतःवरचा विश्वास हाच तुम्हाला, अवास्तव अपेक्षा न ठेवता, पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करत असतो.
“आपलं वजन कमी होत आहे”, असं काल्पनिक दृश्य डोळ्यापुढे आणून सुद्धा,आपल्या खाण्याच्या अयोग्य; स्वास्थ्यासाठी हानिकारक सवयी सोडण्यास प्रवृत्त होत असतो !”
मन आणि वर्तनावर नियंत्रण ठेवणं , हीच मुक्ती आहे! आणि ही मुक्ती तुम्ही स्वतःलाच जाणून मिळवू शकता.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
जर तुम्हाला खाण्यापिण्याच्या सवयींवर ताबा ठेवायला शिकायचं असेल तर आमच्या ‘ध्यान आणि श्वास’ यावरील कार्यशाळेत भाग घ्या आणि मनावर ताबा मिळवा.