घड्याळ टिक टिक करत आहे, दोन्ही बाजूंना समान गुण आहेत. तुमच्या प्रत्येक हालचालीवर, प्रत्येक अभिव्यक्तीवर सर्वांच्या नजरा खिळून असल्याने तणाव स्पष्ट आहे. तुमच्या भोवतीच्या संपूर्ण वातावरणात तुम्हाला आशा, भीती, उत्साह आणि अपेक्षा जाणवत आहे. आर्जवं, घोषणाबाजी, उत्साही आरोळ्या, किंकाळ्या, खिजवणं हा सगळा कोलाहल तुम्हाला थांबवायचा आहे. अशावेळी तुम्ही एकाग्रचित्त असायला हवे,द्विधा मनस्थिती असता कामा नये.तुम्ही आता काय करता त्यावर तुमचं भविष्य ठरेल ….

खेळाडू म्हणून कधीतरी तुम्हाला या परिस्तिथीचा सामना करावा लागेल. मिळणारा मोबदला निरनिराळा असेल आणि प्रत्येक वेळी आवाहन वेगळं असेल तरीही,ध्येय एकच रहातं- सर्व अडचणींना तोंड देत उत्कृष्ट कामगिरी करणे. खंबीर आणि शांत मनाने राहून हे करणं म्हणजे सोन्याहून पिवळं. कोणत्याही टप्प्यावर हे एक मोठे आव्हान आहे आणि ह्यात योगाची भूमिका महत्वाची आहे.

योग हा क्रीडापटूंच्या प्रशिक्षणाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. तुम्ही मैदानी खेळ, जलतरण, टेनिस किंवा बॉलचे खेळ यापैकी कोणत्याही क्रीडा प्रकारात असलात, तरीही खेळामध्ये योगाची भूमिका अपरिहार्य आहे. जर तुम्ही विचार करत असाल की असे कां, तर योगामुळे खेळांसाठी होणारे व्यापक फायदे जाणून घ्या.

क्रीडापटूंसाठी योगाचे फायदे

खेळाच्या प्रकारानुसार क्रीडापटूंना, शरीराला पीळ देणे, वळणे, जोरात झेप घेणे, उडी मारणे, धावणे, खेचणे आणि वाकणे या गोष्टी अचानक आणि पटकन कराव्या लागतात. कधीतरी, विचित्रपणे सुद्धा. अशावेळी चुकीची हालचाल होण्याची शक्यता वाढवते. यासाठी उपाय म्हणून योग करा!

योग तुम्हाला संतुलित, समतोल आणि शिस्तबद्ध रहायला शिकवतो. तुमचे शरीर या हालचाली करण्यासाठी पुरेसे तंदुरुस्त बनविते. हे तुमच्या मनाला संयम राखण्याचे आणि स्थिर राहण्याचे प्रशिक्षण देते. ते कसं काय? पुढे वाचा.

  1. योगामुळे शरीरावरील ताण आणि मुरगळणे टाळण्यास मदत होते: कडक स्नायूंना विश्राम देण्यास योगामुळे मदत होते. त्याने शरीराच्या विविध भागांना व्यायाम होतो व ते मजबूत होतात. पार्श्वभाग पाठ आणि छाती मोकळी होते. विविध प्रकारे वाकणे आणि खेचणे, शरीराची झीज, स्नायूंचा ताण आणि मुरगळण्याची शक्यता कमी होते.
  2. योगा मुळे लवकर बरे वाटते : झोप आणि आराम फक्त हे पुरेसे नाही दीर्घ आणि त्रासदायक शारीरिक सत्र झाल्यानंतर. दीर्घ आणि त्रासदायक शारीरिक सत्र झाल्यावर झोप आणि आराम एवढेच पुरेसे होत नाही. थकलेल्या शरीराला व मनाला विश्रांती मिळण्याचा शांततापूर्ण व प्रभावी मार्ग म्हणजे योग! आसने पद्धतशीरपणे आणि सुंदरपणे केली जातात. तुमच्या शरीरातील तणाव काढला जातो व जलद बरे व्हायला मदत होते.
  3. योगामुळे तुमचा समतोल वाढतो: आसने जसे की वृक्षासन किंवा वृक्ष स्तिथी आणि वीर भद्रासन किंवा योद्धा पोझेस तुम्हाला समतोल साधण्यास मदत करतात शांतता आणि समतोल हे मनासाठी आणि शरीरासाठी आवश्यक आहेत. योगामुळे कसरत, तिरंदाजी व नेमबाजीसाठी आवश्यक असणारी शरीराची ठेवण व स्थैर्य प्राप्त होते.

योग तुमच्या मनाचा निश्चय बळकट करण्यात आणि मनातील नकारात्मक विचार थांबण्यात मदत करते. शरीरापेक्षा मनाची शक्ती मोठी आहे, यावर तुमचा विश्वास बसतो.

  1. योग तुमच्या मनातील भीतीवर मात करण्यास तुम्हाला मदत करतो: क्रिडा हा पूर्णपणे केवळ शारीरिक व्यायाम नाही. एक खूप विशाल मानसिक युद्ध आहे, ज्यासाठी तुम्हाला तयारी करायला हवी. जेव्हा तुम्ही तणावग्रस्त असता, योग तुम्हाला तुमच्या नसा मजबूत करण्यास मदत करते.
  2. योग तुम्हाला प्रतिभावान आणि एकाग्र चित्त बनवतो: खेळात असे बरेच प्रसंग येतात जिथे उभ्या-उभ्या पटकन विचार करणे आवश्यक असते. तुमची पूर्वतयारी आणि अंदाज चुकू शकतात आणि तुम्हाला शून्या पासून सुरुवात करावी लागू शकते. अशा वेळी तुमची पुढची चाल ठरवण्यासाठी तुमचे डोके तयार हवे. योगाची शिस्त वस्तुनिष्ठ विचार करण्यास सक्षम करते.
  3. योग तुम्हाला श्वासोश्वासावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो: बऱ्याच क्रीडा प्रकारात तुमची दमछाक होते. श्वासोछ्वास करताना तुमच्यात किती प्राणवायू जातो यावर तुमची तग धरण्याची क्षमता अवलंबून असते, प्राणायाम तुम्हाला तुमचा श्वास नियंत्रित करायला शिकवतो. जेव्हा तुम्ही पाण्याखालून पोहत असता अथवा मॅराथॉनच्या अंतिम रेषेकडे लक्ष ठेऊन असता, त्यावेळी हे एक सुलभ साधन ठरते.
  4. योग तुमची शरीरयष्टी सुधारण्यास मदत करतो: योगामुळे शरीर सुडौल, हलके आणि लवचिक बनते. त्यामुळे प्रशिक्षण देणे सोपे जाते. योग वजन कमी करण्यास मदत करतो, ज्याने तुम्हाला जलद हालचाल करण्यास मदत होते.
  5. योग तुमच्या बाह्य आणि अंतस्थ स्वत्वाला जोडतो: फक्त तुमची गती आणि प्रतिक्षिप्त क्रिया सुधारण्यापेक्षा, योग खूप काही करतो. योगाची अंतिम भूमिका, मन, शरीर आणि आत्मा यांची जोडणी करणे ही आहे. त्यामुळे तुम्ही केंद्रीत होता आणि अचूकता वाढते.

योग आणि खेळाडू : कोण कोण योगसाधना करतात?

  • ॲण्डी मूरे
  • टॉमी हस
  • ॲना इवॅनौविक
  • लीन डॅन
  • पी. व्ही. सिंधु
  • सायना नेहवाल
  • किडंबी श्रीकांथ
  • शाकिल ओ ‘ नील
  • लबॉन जेम्स

खेळताना अचानक येणाऱ्या संकटांसाठी योग कसा उपयुक्त आहे ?

कुठल्याही खेळाडूला विचारा की त्याला किंवा तिला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? आणि तुम्हाला सर्वांचे एकवाक्य ऐकू येईल – दुखापतीची!! चॅम्पियनशिप सुरु असताना तुम्ही निमुटपणे एका बाकावर बसले आहात अथवा हॉस्पिटल मध्ये झोपले आहात, ह्या पेक्षा आणखी काहीच भयानक असू शकत नाही. योग हा त्यावर उत्तम उपाय आहे,म्हणूनच योग आणि खेळ यांची जोडी जमली आहे.

अडचणीतून हसत खेळत पूर्वपदावर यायला योगाची चांगली मदत होते.

क्रीडाजगातून काही महिने बाहेर राहणं म्हणजे अनेक वर्ष मागे गेल्या सारखे आहे. तुमच्या शरीराला दुखण्यातून बरे होण्यासाठी आणि पुनः त्रास होऊ नये आणि वाढू नये यासाठी वेळ हवा असतो. बर्‍याचदा, तुमचे शरीर मूळ स्थितीमध्ये परत येण्यासाठी आणि तंदुरुस्त रहाण्यासाठी फक्त विश्रांती पुरेशी नसते.

योगासोबत, क्रिडा पटू हळूहळू त्यांचे शरीर टोन आणि मजबूत बनवू शकतात. योग तुम्हाला खेळण्याच्या सर्वोत्तम वर्षांपैकी काही गमावण्याच्या मानसिक दबावाचा सामना करण्यास देखील मदत करतो. तो तुमच्या मनाला शिकवत वस्तुस्थितीला मान्य करुन आणि तुम्हाला जोरदार पुनरागमन साठी प्रेरित करतो.

योगाचे महत्त्व टिकाऊ क्रीडा प्रदर्शन करण्यासाठी किती महत्वाचे आहे ह्याबद्दल प्रश्नच नाही. तरीसुद्धा काहीतरी रात्रीतून जादू होण्याची वाट पाहू नका. काहीतरी मिळवणेसाठी वेळ आणि संयम लागतो. योगाचे फायदे सारखे आहेत ते कालांतराने प्रकट होते. त्याचे योग्य परिणाम मिळण्यासाठी तुमाचा नियमित आणि सुसंगत सराव हवा.

श्री श्री योगाद्वारे काही योगासने तुमची शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती वाढविणेसाठी तुम्ही सुरू करू शकता. ह्या कार्यशाळेत प्राणायाम आणि ध्यान पण आहेत , ज्यामुळे सर्वांगीण व सक्षम विकास होतो.

World Meditation Day

● Live with Gurudev Sri Sri Ravi Shankar

● Live at 8:00 pm IST on 21st December

Sign up for free!