माझ्या किशोरवयात जेव्हा मी जमिनीवरून काही जड सामान उचलायचो तेव्हा माझी आजी मला नेहमी माझी शरीराची ठेवण सुधारण्याची सूचना देत असे. मला ते तिचे सांगणे अजिबात आवडत नसायचे. मी विचार करत असे की शरीराची ठेवण योग्य ठेवणे हे एवढे कां महत्वाचे आहे? आता वयाच्या ४० व्या वर्षी, माझ्या लक्षात आले आहे की खरोखरच शरीराची ठेवण योग्य ठेवणे का गरजेचे आहे. कारण जर ती योग्य नसेल तर कंबर दुखीचा त्रास सुरु होऊ शकतो.
वस्तुस्थिती दर्शवणाऱ्या काही गोष्टी
भारतात, कंबरदुखीचे प्रमाण जास्त आहे, जवळपास ६०% ते ८०% व्यक्तींना कधी ना कधी लक्षणीय पाठदुखी होते. कंबरदुखी हे ओमिक्राँन विषाणू संसर्गाचे सर्वसामान्य लक्षण आहे.
कंबर दुखी पासून मुक्त कसे व्हावे ?
सोप्या गोष्टी, योग्यरित्या केल्या गेल्यास, कंबरदुखी पासून आराम मिळतो आणि डॉक्टरांकडे जाणे किंवा रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी होते. येथे आपण त्यापैकी पाच गोष्टींचा विचार करू.
थेरपी बॉलवर (योग बॉल) बसणे
तुम्ही तुमच्या ऑफिस किंवा घरगुती कामाच्या दरम्यान सोफ्यावर बसण्याऐवजी थेरपी बॉलवर बसू शकता. पाठदुखीच्या समस्यांसाठी थेरपी बॉल वर बसणे हा व्यायामाद्वारे उपचार करण्याचा एक पर्याय आहे. हा व्यायाम कंबरदुखीचे प्रमाण कमी करत पुढच्या होणाऱ्या त्रासाला आळा घालतो तसेच उपचारा मधील एक महत्वपूर्ण भाग आहे.
नियंत्रित हालचाली करुन आपल्या शरीराचा बांधा सुधारा.
योग्य प्रकारे शरीराचे ठेवण ठेऊन थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने केलेल्या हालचालींमुळे कंबर दुखीचा समस्या टाळण्यात आणि तीव्र वेदनेपासून दिलासा देण्यास मदत होते. उभे रहाताना, आपले डोके वर-उंच ठेवा (मानेवर ताण न देता), खांदे सरळ आणि हलके छातीच्या आतील बाजूस वक्र न करता, छाती पुढे, दोन्ही पायांवर समान वजन आणि पार्श्वभाग आतील बाजूस ओढले जातील असे ठेवणे महत्वाचे आहे.
हालचाल ही तुमच्या पाठीला औषधासारखी आहे: नियंत्रित हालचाली किंवा व्यायामामुळे शरीराच्या एकाच प्रकारच्या ठेवणी मुळे आलेल्या जडत्वा पासून दिलासा मिळतो.
तुमची खोलवर रुजलेली खराब सवय ओळखा आणि जागरुकतेने ती दुरुस्त करा: तुमच्या शरीराची ठेवण कशी आहे याबद्दल जागरुक राहा. मानवी शरीराचं हे वैशिष्ठय आहे की, चुकीची ठेवण ते सहजपणे सुधारते. ज्यावेळी मी ज्या क्षणी पाठ सरळ आणि ताठ ठेवून बसण्यास सुरुवात केली, माझा मुलगा ताठ बसू लागला.
तुम्हाला जास्त वेळ उभे राहावे लागेल असे वाटत असल्यास, बरोबर नेता येईल असे स्टूल किंवा खुर्ची घेऊन जाण्यास प्राधान्य द्या. एकाच स्थितीत जास्त वेळ उभे राहणे टाळा. दोन्ही पायांवर वजन समान प्रमाणात संतुलित करा.
तुम्ही ज्या टेबलवर बसून काम करतातं, ते टेबल आणि खूर्ची तुमच्या सोयीनुसार ठेवा. कंबरेला आराम पडेल अशी त्याची रचना करा.
खुर्चीला पाठीच्या खालच्या बाजूचा स्पर्श होईल अशा प्रकारे (जेथे पाठीचा कणा सुरू होतो) खुर्चीवर बसा. तुम्ही पाठीला आधार घेऊन बसू शकता (उशी किंवा गुंडाळलेला टॉवेल) आणि ते तुमच्या कंबरेच्या वक्र भागाशी एकरूप होईल असे ठेवू शकता. तुमचे पाय जमिनीवर सपाट ठेवण्याचे लक्षात ठेवा किंवा स्टूल किंवा फूटरेस्टसह उंची सोयीनुसार करा, बऱ्याच वेळेपर्यंत आपले पाय एकावर एक ठेऊ नका. मांड्या आणि गुडघे काटकोनात येतील हे बघा. शक्यतो तुमच्या खुर्चीची रुंदी तुम्हाला गुडघ्याखाली स्पर्श करेल अशी पाहिजे.
कधी एका कुशीवर झोपा आणि कधीकधी आपल्या पाठीवर. एका कुशीवर झोपताना, दोन्ही पायांची टाच आणि पायांची बोटं एकमेकांना स्पर्श करू द्या. आपले गुडघे किंचित वाकवा. एक हात नितंबावर कडेला ठेवा आणि दुसऱ्या हाताचे वाकलेले कोपर उशीजवळ ठेवा.
पाठदुखीची दीर्घकालीन बद्धकोष्ठता किंवा संधिवात (ऑस्टियोआर्थरायटिस) किंवा एंडोमेट्रिओसिस सारख्या आजाराशी संबंधित आहे का? निदान परिवर्जना मध्ये आपण मूळ कारणाला हात घालतो. आपण आपल्या शरीराची प्रकृती (रचना) आणि विकृती जाणून घेतल्यास, आपण कंबरेच्या वेदना टाळू शकतो किंवा त्यांना दिलासा देऊ शकतो
वात असंतुलनामुळे होणाऱ्या कंबरदुखीवर उपचार करण्यासाठी महानारायण तेल, कर्पूरादी, मुरीवेण्णा, कोट्टमचुक्कादी किंवा धनवंतरं तेल लावून अभ्यंग करणे प्रभावी ठरते.
वैद्यकीय पद्धतीने तयार केलेले औषध कंबरेवर ओतणे किंवा शाही स्नान करणे हे देखील अत्यंत प्रभावी उपचार आहेत.
पाठीच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी योगिक स्ट्रेच (ताणणे)
पद्म साधना हा तुमच्या पाठीच्या संपूर्ण स्नायूंना बळकट करण्यासाठी आणि तुमच्या वेदना कमी करण्यासाठी पाठदुखीच्या व्यायामाचा (स्ट्रेच) पुरेसा डोस आहे. मार्जारासन, शिशु आसन, भुजंगासन, आनंदी बाळाची मुद्रा, हस्तपादासन, पश्चिमोत्तानासन आणि उत्तानासन यांचा फायदा खालच्या पाठीला होतो आणि हे सगळे व्यायाम पाठीच्या सगळ्या भागांचा व्यायाम करवतात.
ध्यान
चांगल्या पचनासाठी, गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या समवेत ध्यान करा आणि कंबर दुखणाऱ्या वात असंतुलनापासून मुक्त व्हा. ध्यान सुरु करा.
सारांश
तुम्ही तुमची जीवनशैली पूर्णपणे बदलू शकत नाही, परंत्तू तुम्ही तुमच्या पाठीच्या कण्याची काळजी घेण्यासाठी नकीच थोडा वेळ वर दिलेल्या गोष्टी पाळण्यासाठी देऊ शकता.
अभिप्राय
“श्री श्री योगाने माझ्या पाठीच्या आणि खांद्याच्या दुखण्यावर जादू केल्यासारखे काम केले. मी आता खूप मजबूत आणि तंदुरुस्त आहे!”. कृतिका कृष्णन, वय २८, पी आर एक्झिक्युटिव्ह